Saam Tv Breaking News Live Updates In Marathi Maharashtra SAAM TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: पालघरमध्ये मनसेचा काँग्रेसला झटका, सचिन शिंगडांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Namdeo Kumbhar

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच घंटानाद आणि रास्ता रोको आंदोलन

पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं असून सरकार बदला सरकार वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आली मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या बाबतीत सरकारने निष्काळजीपणा दाखवला असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला आहे.. नीट परीक्षा परीक्षेत घोटाळा झाला त्याची चौकशी करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे पुण्यातील गुडलक चौकात हे रास्ता रोकोआंदोलन करण्यात आलं..

आरपीआय सचिन खरात महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीबरोबर जाणार

Mumbai News:  गोरेगावमध्ये ऑइलच्या टँकरला भीषण आग,  सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात ऑइलच्या टँकरला मोठी आग

सुदैवाने जीवितहानी नाही

दुपारी साडेबाराच्या सुमारा घडली घटना

प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट समोरून जाताना टँकरला आग लागली

Palghar News: पालघरमध्ये मनसेचा काँग्रेसला झटका, सचिन शिंगडांनी घेतली राज ठाकरेंची भेट

पालघरमध्ये मनसेचा काँग्रेसला झटका.

काँग्रेसचे माजी दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा आणि काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी नरेश कोरडा यांनी राज ठाकरेंची घेतली भेट

13 तारखेला सचिन शिंगडा आणि नरेश कोरडा मनसेत पक्षप्रवेश करणार .

Nashik News: छगन भुजबळांनी समीर भुजबळांना नांदगाव मनमाड मतदार संघासाठी दिल्या शुभेच्छा

छगन भुजबळांच समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्वीट

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना नांदगाव मनमाड मतदार संघासाठी दिल्या शुभेच्छा

नांदगाव मनमाड मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास कांदे आहेत आमदार

नांदगाव मनमाड मतदारसंघात उमेदवारीसाठी समीर भुजबळांची तयारी

समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे सर्वच कार्यक्रम नाशिक आणि येवला ऐवजी नांदगाव मध्ये

समीर भुजबळ यांनी नांदगाव मधून उमेदवारीवर दावा केल्याने नांदगाव मनमाड मतदार संघात शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने येणार

Pune News: पुण्यातील कोथरूड स्टॅन्डसमोर तरुणीला डंपरने चिरडले

पुण्यातील कोथरूड स्टॅन्ड समोर तरुणीला डंपरने उडवले

रस्ता क्रॉस करत असताना तरुणीला डंपरने दिली धडक

डोक्यावरून मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू

घटनास्थळी पोलिस दाखल

Pune News: पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

पुण्यात ⁠राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

⁠आज पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार

निसर्ग मंगल कार्यालयात होत आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे निसर्ग कार्यालयात मोठी गर्दी

Pune News: शिवाजीनगर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सात उमेदवार इच्छुक

पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सात उमेदवार इच्छुक.

सात उमेदवारांनी आज दिली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेसकडे.

2019 मध्ये काँग्रेसने या ठिकाणावरून निवडणूक लढवली होती.

तर वडगाव शेरी मधून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली मुलाखत .

बापूसाहेब पठारे यांनी नुकताच भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस.

Mumbai News: मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली लाखों रुपयांची फसवणूक, दोघांना अटक 

मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली लाखों रुपयांची फसवणूक.

लिपिक पदाचे बोगस नियुक्ती पत्र देऊन चार लाख वीस हजार रूपये घेतले.

या प्रकरणी एका दांपत्यास भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे.

सागर कासारे, प्रिती कासारे असे या आरोपींचे नावे आहेत.

प्रिती कासारे हे बोरिवली मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच काम करतात.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

या बैठकीत सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याची शक्यता आहे

केंद्र सरकार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्यात ३ ते ४ टक्के वाढ करू शकते

सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ५० टक्के महागाई भत्ता मिळतो

Rahul  Gandhi News 

राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करा, या संदर्भात भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

या याचिकेत गृहमंत्रालयाला राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे

सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मते राहुल गांधी यांनी इग्लंडचं नागरिकत्व स्वीकारले होते त्यामुळं त्यांचे नागरिकत्व रद्द करावं

२६ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणात अलहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आम्ही या प्रकरणात सुनावणी करू शकत नाही

त्यानंतर न्यायालयाने गृहमंत्रालयाकडे या केसंच स्टेटस काय आहे याची माहिती देण्यास सांगितलं होतं

त्यानंतर आज सुनावणी होणार

Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Navi Mumbai : गॅस सिलींडरची डिलीव्हरी करणाऱ्या टेम्पो चालकाला दमदाटी करुन त्याच्याकडुन 3 हजार रुपये उकळणे नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडलेय. स्वफ्निल देवरे, विशाल दखणे आणि सचिन बोरकर अशी या तीन पोलिसांची नावे असून सदर प्रकरणात या तिघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

Mumbai Air quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली

Mumbai Air quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 238वर पोहचलाय. वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत गेली आहे.

Pune News : पुणे महापालिकेतील १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार

पुणे महापालिकेतील १८ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीचा बोनस

त्यांना दिवाळीपूर्वी ८.३३ टक्के बोनस त्याचप्रमाणे २३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार

वित्त व लेखा विभागाने यासंदर्भात काढले परिपत्रक

यासाठी अर्थसंकल्पात सुमारे १२५ कोटी रुपयांची तरतूद

लेखा व वित्त विभागाने काढलेल्या परिपत्रकात १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्याचे विभाग प्रमुखांना देण्यात आले आदेश

Shiv Sena : शिवसेनेची मुंबईत आज दसरा मेळावा आढावा बैठक

शिवसेनेची मुंबईत आज दसरा मेळावा आढावा बैठक होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बैठक घेणार आहेत.

मुंबईत सर्वच 36 विधानसभा मतदार संघांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा बैठकांचा धडाका सुरु झालाय.

मुंबईतील दसरा मेळाव्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. येत्या शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्यातील कसबा विधानसभेसाठी भाजपमध्ये चढाओढ

अक्षय बडवे, पुणे साम प्रतिनिधी

पुण्यातील कसबा विधानसभेसाठी भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी आक्रमक

कसब्यातून धीरज घाटे यांनाच उमेदवारी द्या, शहरातील काही पदाधिकाऱ्यांची थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी

पुणे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाऊन ही मागणी केली

पुणे शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत जाऊन भेट

पोटनिवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो, पदाधिकाऱ्यांचा बावनकुळे यांना विश्वास

हेमंत रासने सुद्धा कसबा विधानसभा मधून इच्छुक आहेत

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात अटक टाळण्यासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात

माझगाव कोर्टाने ऑगस्ट महिन्यात रणेंविरोधात बजावला होता अजामीनपात्र वॉरंट

वॉरंट रद्द करण्यासाठी राणे मुंबई उच्च न्यायालयात

samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर कंटेनर आणि लक्झरी ट्रॅव्हलचा अपघात

समृद्धी महामार्गावर कंटेनर आणि लक्झरी ट्रॅव्हलचा अपघात झालाय. एका जणाला गंभीर दुखापत झाली आहे, तर 16 जण किरकोळ जखमी आहेत. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर 496.6 जवळ अपघात झालाय.

लक्झरी ट्रॅव्हल्स मुंबईच्या दिशेने जात असताना समोर जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला.

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटप करताना भाजप १५५ पेक्षा जास्त जागांबद्दल ठाम

Maharashtra News : मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या त्यांचे आमदार असलेल्या जागांच्या व्यतिरिक्त जास्त जागांच्या मगणीबद्दल भाजपकडून संबंधीत मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार कोणते? याबाबात विचारणा केली जाणार असल्याची भाजप मधील सुत्रांनी माहिती दिली. "सीटिंग आमदार असलेल्या जागा व्यतिरिक्त जागा हवी असल्यास जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार सांगा मगच मतदारसंघ घ्या" अशी विचारणा करण्याची भाजपची स्ट्रेटेजी आहे. महायुतीत भाजप १५५ पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला मिळणार ६० पेक्षा जास्त जागा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar: पुढचे ४ दिवस ४ ग्रहांचं होणार बॅक-टू-बॅक गोचर; 'या' राशींच्या व्यक्ती करणार पैशांची डबल कमाई

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला जाताना अपघात; २९ महिलांना घेऊन जाणारी एसटी बस ५० फूट दरीत कोसळली

Nashik News : दांडिया खेळण्यावरून तरुणाला बेदम मारहाण; तरुणाची प्रकृती चिंताजनक, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: शेतकरी नेते रविकांत तुपकर मातोश्रीवर! 'मविआ'सोबत जाण्याबाबत ठाकरेंशी चर्चा; पडद्यामागे काय घडतंय?

Maharashtra Assembly Elections 2024: वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी जाहीर, कोणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT