Mahayuti Saam Tv News
महाराष्ट्र

Love Jihad: लव्ह जिहाद कायद्यावरून महायुतीत धुसफूस? केंद्रीय मंत्र्यांचा विरोध, अजित पवार गटाच्या आमदाराचा पाठिंबा

Political Rift in Mahayuti over Love Jihad: महायुतीमधील २ नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याबाबत वेगवेगळी भूमिका मांडल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे का? महायुतीत कुठेतरी बिनसतंय, अशी चर्चा होऊ लागली आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात महायुती सरकार लव्ह जिहाद कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू केला जाणार असल्याचं सांगितलं. यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मात्र, आरपीआय पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लव्ह जिहाद कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी कायद्याच्या समर्थनात भूमिका दर्शवली आहे. या प्रकरणात महायुतीमधील २ नेत्यांनी वेगवेगळी भूमिका मांडल्यानं महायुतीत बिनसलं आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

रामदास आठवले यांची भूमिका

आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये लव्ह जिहाद कायद्याला विरोध असल्याची भूमिका दर्शवली होती. हिंदू- मुस्लिम, दलित - सुवर्ण मुलं मुली एकत्र येतात. अशा वेळी लव्ह जिहाद कायद्याने केलेली कारवाई चुकीचे ठरू शकते, असं रामदास आठवले म्हणालेत.

लव्ह जिहादवर संग्राम जगताप काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लव्ह जिहाद कायदा होण्यासाठी आमची आग्रही भूमिका राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 'मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी विवाह आणि त्यानंतर बळजबरीने धर्मांतर करणे, यासह आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादसारख्या घटनांना रोखण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे', असं जगताप म्हणाले.

महायुतीमधील २ वेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याबाबत वेगवेगळी भूमिका मांडल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे का? महायुतीत कुठेतरी बिनसतंय, अशी चर्चा होऊ लागली आहे. आगामी काळात जिहाद कायद्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

SCROLL FOR NEXT