LPG gas shortage in India, three villages in Dhule district saam tv
महाराष्ट्र

LPG गॅसचा वापर बंद; गॅस टंचाईदरम्यान धुळे जिल्ह्यातील ३ गावांचा ऐतिहासिक निर्णय

Historic Decision in Dhule On LPG Cylinder: भारतात एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, धुळे जिल्ह्यातील तीन गावांनी एलपीजीचा वापर थांबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Bharat Jadhav

  • पुढील ६ महिन्यांसाठी LPG गॅस वापर बंद.

  • देशहित आणि गॅस टंचाई हे मुख्य कारण.

  • ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण देशभरामध्ये एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. यावरती राज्यातील धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांनी एकत्र येत देशहिताला प्राधान्य देत एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष बैठकीत तिन्ही गावांतील ग्रामस्थ, सरपंच आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की पुढील सहा महिन्यांसाठी या तिन्ही गावांमध्ये एलपीजी गॅसचा वापर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरी भागामध्ये एलपीजी गॅसला पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश नागरिकांना गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून त्यांची गैरसोय होत आहे, आणि हीच गैरसोय टाळण्यासाठी या तीनही गावांनी हा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांकडे पारंपरिक चुली, लाकूड, गोवऱ्या यासारखे पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी शहरातील बांधवांच्या सोयीसाठी हा निर्णय स्वीकारला आहे.

बैठकीला पद्मश्री चैत्रामजी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय अधिक बळकट झाला आहे, गावकऱ्यांनी या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होताना दिसली. गावांमध्ये पर्यायी इंधनस्रोतांचा योग्य वापर कसा वाढवायचा याबाबत सखोल चर्चा करण्यात आली, महिलांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना आखण्याचेही ठरविण्यात आले, याशिवाय धूरमुक्त चुली, सेंद्रिय इंधन आणि पर्यावरणपूरक साधनांचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.

गावांमध्ये पर्यायी इंधनस्रोतांचा योग्य वापर कसा वाढवायचा याबाबत सखोल चर्चा करण्यात आली, महिलांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना आखण्याचेही ठरविण्यात आले, याशिवाय धूरमुक्त चुली, सेंद्रिय इंधन आणि पर्यावरणपूरक साधनांचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

Tea and cholesterol: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका?

SCROLL FOR NEXT