Maharashtra exit poll 2024 : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra exit poll 2024 : राज्यात मविआ आणि महायुतीला किती जागा मिळणार? एक्झिट पोलचा अंदाज काय?

maharashtra exit poll update: महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या जागेचे अंदाज समोर आले आहेत. काही एक्झिट पोलमधून महाविकास आघाडीला अधिक जागा दाखवण्यात येत आहे. तर महायुतीला कमी जागा दाखवण्यात येत आहे. काही एक्झिट पोलमध्ये उलटं चित्र दिसत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारतात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. देशात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असणाऱ्या महाराष्ट्राकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघ असून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. याचदरम्यान राज्यातील एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. राज्यात काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा दाखवत आहेत. तर काही पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा दाखवण्यात येत आहे. त्यामुळे खरा निकाल ४ जूनला समोर येणार आहे.

पोल ऑफ पोल

महायुती - २६

महाविकास आघाडी - २१

इतर - ०१

टीव्ही ९ पोलस्टॅट

महायुती - २२

महाविकास आघाडी - २५

इतर - १

चाणक्य

महायुती - ३३

महाविकास आघाडी - १५

इतर - ००

एबीपी- सीव्होटर

महायुती - ३३

महाविकास आघाडी - २३

इतर - ००

महाराष्ट्राचा पोल ऑफ पोल

भाजप - १७

शिवसेना शिंदे - ७

अजित पवार गट - १

काँग्रेस - ८

शिवसेना ठाकरे - ९

राष्ट्रवादी पवार गट - ७

महायुतीचा ४५ पारचा नारा हुकणार?

दरम्यान, टीव्ही ९ पोलस्ट्रॅटनुसार, कोल्हापुरात शाहू महाराज आघाडीवर आहेत. त्यामुळे कोल्हापुरात संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत. तर उज्ज्वल निकम पिछाडीवर आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर आघाडीवर आहेत. महायुतीने राज्यात ४५ पारचा नारा दिला होता, मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजामुळे त्यांना नारा हुकण्याची शक्यता आहे. एबीपी सी-व्होटरने महाविकास आघाडीला २०-२३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT