Radhakrishna Vikhe Patil Saam TV
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर विखे पाटलांनी साधला निशाणा; म्हणाले, स्वतःला जाणता राजा...

Political News : तसेच स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी असाच प्रयोग करून पाहिला होता, निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर विखे पाटलांनी साधला निशाणा.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Maharashtra Election :

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात दौऱ्यावर होते. यावेळी थोरात समर्थक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ठिकठिकाणी विखे पाटलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काल दिवसभर निलेश लंके आणि शरद पवारांची भेट चर्चेत राहिली होती. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी या भेटीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे.

संगमनेर तालुक्यातील विविध गावात तब्बल 145 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन विखे पाटलांनी काल केलं. खांबे येथील सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना निलेश लंके आणि शरद पवार यांच्या भेटीवर देखील भाषणातून निशाणा साधलाय. तसेच स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी पाच वर्षांपूर्वी असाच प्रयोग करून पाहिला होता, अशी टीका देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

समोर कोण उभं राहिलं याचा मी फार विचार करत नाही. पाच वर्षांपूर्वी सुद्धा स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी हा प्रयोग करून पाहिलाय. त्यावेळी तर आमच्या थोरल्या बंधूंना आमच्या विरोधात भाषण करायला लावली. लोकांचे घर फोडायचा यांचा धंदा आहे. मात्र आज त्यांचच घर फुटलं.परमेश्वराच्या दारात हे फेडावच लागतं. लोक विखे पाटलांना पाहून नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाला पाहून मतदान करतात, असं विखे पाटील म्हणाले.

2019 च्या निवडणुकीत जनतेने भाजपा -शिवसेना युतीला मतदान केलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं.विश्वासघाताचं राजकारण केलं. मात्र नियतीने वेगळंच ठरवलं होतं त्यामुळे आज सत्ता आपली आली, अशा शब्दांत विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पुढे विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. संगमनेर तालुक्यात आम्ही केलेल्या कामांचं काहीजण भूमिपूजन उद्घाटन करतायत. पण जनतेला सगळं माहिती आहे. संगमनेरचे मॉडेल राज्याने घ्यावं असे इथले नेते सांगतात. या तालुक्यात 50 टँकर चालू आहे, हे मॉडेल राज्याने घ्यायचं का? आम्ही विकासाचं राजकारण करतो. रोजगारासाठी कधी या तालुक्यात मेळावा झाला का ?, असा सवाल यावेळी विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच नाव न घेता थोरात यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT