महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील ज्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नगरमध्ये येणार आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर मधील संत निरंकारी भवन मैदानावर सभा होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी झाली असून नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनात केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत गंभीर चिंतेची बाब निदर्शनास आणून देण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
आठ तारखेपासून शरद नगर, पुणे , सातारा बीड च्या दौऱ्यावर...
उमेदवाराच्या प्रचारार्थ घेणार सभाचां धडाका.
काल शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर घेतला होता ब्रेक.
मात्र उद्या बारामतीत मतदान केल्यानंतर आठ तारखेपासून शरद पवार पुन्हा सभा घेणार.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपने सोशल मीडिया पोस्टद्वारे एससी-एसटी समुदायाच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. कुटुबियांना हत्येचे सीसीटीव्ही फुटेज दाखवा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत.
- आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं सारं काही कुटुंबियांना दिल्याचा पोलिसांचा दावा
- घटनेशी संबंधित सारं फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेतल्याचा पोलिसांचा दावा
- 90 दिवसांची मुदत असताना 60 दिवसांत मुंबई पोलीसांनी तपास पूर्ण करून दाखल केलंय आरोपपत्र, कुुटुंबियांचा आरोप
- मूळ तक्रारदार आणि अभिषेकची पत्नी तेजस्वीचं म्हणणं नीट ऐकून घेतलं नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप
- तर, तक्रारदार रोज काहीतरी नवी कागदपत्र सादर करत असल्याची पोलिसांकडून कोर्टाची तक्रार
सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. अपक्ष उमेदवार संदीप देवकाते यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. प्रचाराची सांगता झाल्यानंतरही सुळेंनी त्यांच्या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. सुप्रिया सुळेंनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यासाठी उद्या मतदान होत असताना राहुल गांधींचं काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र
ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. ही आपली लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे.
जोपर्यंत काँग्रेसचा एकेक कार्यकर्ता सत्याच्या बाजूने उभा आहे; तोपर्यंत भारतात द्वेष जिंकू शकत नाही.
आपण एक नाही, आपण करोडो आहोत. आपण एकत्र लढू, जिंकू आणि देशाची परिस्थिती बदलू.
या लढाईत मी माझं सर्व काही देत आहे आणि मी हीच अपेक्षा तुमच्याकडून करत आहे, अशी भावनिक साद राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना घातली.
रत्नागिरीत निवडणूक आयोगने मोठी कारवाई केलीय. तब्बल ३ कोटी रुपयांची रोकड जप्त केलीय. रत्नागिरी-सिंधुदूर्ग या मतदारसंघात ही कारवाई करण्यात आलीय.
डॉक्टरांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. शरद पवारांनी आजचे कार्यक्रम रद्द केले होते. मात्र पवार कुटुंबातील सदस्य येवून शरद पवारांची भेट घेतायत. उद्या मतदान आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील सदस्य सगळ्या यंत्रणेचा आढावा घेत आहेत.
पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत.
माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना भागीरथ भालके यांचा पाठिंबा. भालके गटाची आज पंढरपुरात बैठक पार पडली. बैठकीत मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भालकें यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. अभिजीत पाटील यांचे भगीरथ भालके हे विरोधक आहेत.
मोदींनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था 18 व्यां क्रमांकावरून 5 क्रमांकावर आणली
मोदी तिसऱ्यादा निवडूण आणल्या नंतर मोदी आपल्या देशाची अर्थव्यवस्था पहिल्या तीन अर्थ व्यवस्थेच्या क्रमांकावर आणणारं आहेत.
मोदींने देशांतील भ्रष्टाचार आठोक्यात आणल्या नंतर आणि जिएसटी टॅक्स चोरी थांबवून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली
वाहतूक नियंत्रण शाखा मुंबई मार्फत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. २४ एप्रिल ते ०५ मे पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
बस स्टॉप वर पार्क असलेल्या एकुण ९६५८ वाहनांवर ई-चलान कारवाई करून त्यांच्याकडून रूपये १०,२१,७१० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला
उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्यात सांगितल्याने अर्ज मागे घेतल्याची रमेश जाधव यांची माहिती
कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरच अधिकृत उमेदवार
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढू लागला असतानाच खार दंडा परिसरात भाजपा शिवसेना महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उज्वल निकम यांच्या प्रचार फेरीदरम्यान हे दोन्ही गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला.
भारती पवार आणि विरोधात बंडखोरी करत हरिचंद्र चव्हाण आणि भरला होता अपक्ष उमेदवारी अर्ज.
बंडखोरी करत लढवणार होते दिंडोरी लोकसभेतून निवडणूक
दिंडोरी लोकसभेतून अखेर हरिश्चंद्र चव्हाण यांची माघार
भाजप नेते केदा आहेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे , भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित
अखेर महाविकास आघाडीचा ठरलं
कल्याण लोकसभा मतदारसंघातून रमेश जाधव यांनी घेतली माघार
वैशाली दरेकरच ठाकरे गटाच्या उमेदवार
रवींद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
1 सार्वजनिक वाहतूक
2 ज्येष्ठ नागरिक
3 कायदा व सुव्यवस्था
4 नागरी सुरक्षा
5 आरोग्य
6 शिक्षण
7 जल व पर्यावरण
8 सांस्कृतिक पर्यटन
9 क्रीडा
10 उद्योग
11 श्रमिक असंघटित कामगार
कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात
उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कन्हैय्या कुमार यांच्या विरोधात भाजपने मनोज तिवारी यांना उमेदवारी
दिल्लीत ७ जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे
आप आणि काँग्रेस ही निवडणूक INDIA आघाडीतून लढत असून आप ४ तर काँग्रेस ३ जागा लढत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत मविआ उमेदवार निलेश लंके यांना विचारले असता, मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या विरोधात सभा घेण्यासाठी थेट देशाचे पंतप्रधान मोदी येत आहेत. माझ्यात काहीतरी आहे म्हणूनच तर मोदी येत आहेत ,असं निलेश लंके यांनी म्हटले आहे. एका मास्तरच्या पोराच्या विरोधात प्रचारासाठी मोदी, योगी , गडकरी एवढ्या मोठ्या नेत्यांसह राज्याचे निम्मे मंत्रीमंडळ येतंय, तर गरिबाची काहीतरी ताकद आहेच ना, असं लंके यांनी म्हटले आहे.
नाशिक रोड परिसरात भीषण आग
नाशिक रोड येथील हॉटेल कपालेश्वरच्या पाठीमागे बारदानाचे गोडाऊनला भीषण आग
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
आग कशामुळे लागली, त्याचं कारण अस्पष्ट
पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी फोन आला.
भाजपचे गणेश बिडकर यांना धमकीचा आला फोन
राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आली
आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला असून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागण्यात आली.
यानंतर गणेश बिडकर यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू
मागील वर्षी देखील त्यांना धमकी देण्यात आली होती
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय.
मतदानासाठी ईव्हीएम मशिन पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात
लोकसभा मतदारसंघात १४ लाख ५१ हजार ६३० मतदार
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १ हजार ९४२ मतदान केंद्र
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान केंद्र 347
मतदार 2 लाख 83 हजार 552 , रत्नागिरी जिल्ह्यात 1024 मतदान केंद्र आहेत.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 918 मतदान केंद्र
ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित राहणार, टीप टॉप हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजता बैठक
महायुतीची महत्त्वाची बैठक शिवसेना, भाजप ,मनसे, पदाधिकारी राहणार उपस्थित
नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून भाजप कार्यकर्ते होते नाराज
मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद राहणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे, मावळ ,शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडी बाजार राहणार बंद
निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
हवामान विभागाने पुढील चार दिवस यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत ताशी तीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहेत. चार दिवसाच्या कालावधीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.