Today's Live Batmya in Marathi 16 February 2024 Latest Update on Manoj Jarange, Farmer Protest and on overall Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Today's Marathi News Live : बोरिवलीत पार्किंगमधील 25 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक

Maharashtra Latest News and Update in Marathi (16 February 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची संक्षिप्त आढावा.

प्रविण वाकचौरे

बोरिवलीत पार्किंगमधील 25 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक

दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई नक्की होणार; गुहाघरमधील प्रकारानंतर शंभूराजे देसाई यांचा इशारा

कोकणात जे काही घडलं त्याबद्दल मला माहिती नाही

कायदा हातात घेऊन जर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई नक्की होणार

संपूर्ण माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही

राज्यातील कायदा व्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे

महेश जाधव करणार राष्ट्रवादीत प्रवेश, अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा केला होतो आरोप

पुणे शहरात पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड मध्ये बॉम्बस्फोट करण्यची धमकी

पुणे पोलिसांना कॉल करत पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

पुण्यासह मुंबईत देखील बॉम्बस्फोट घडवण्याची कॉल करून माथेफिरू कडून देण्यात आली होती धमकी

कॉल करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांकडून अटक

काँग्रेस आणि शिवसेनेच्या अधिवेशनांमध्ये आयडॉलॉजीचा फरक, मिलिंद देवरा

Attack On Nilesh Rane's Cars : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक, भास्कर जाधव निलेश राणेंचे कार्यकर्ते आमनेसामने

पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

निलेश राणेंच्या सभेपूर्वीच वातावरण तापलं

भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, कार्यालयासमोर ऑडी उभ्या केल्यामुळे गोंधळ

निलेश राणे यांची सभा काही वेळातच गुहागर मध्ये चालू होणार आहे, भास्कर जाधव यांचे कार्यालय मुंबई गोवा मार्गावर असल्यामुळे निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरूनच जाणार आहे, महामार्गावर जाणाऱ्या गाड्या भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर ऑडी उभ्या केल्यामुळे भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

मुंबईत काँग्रेस जिंकली तर महत्त्वाचा टप्पा मानला जाईल, मल्लिकार्जुन खरगे

निवडणुकीच्या रणनीती, पक्षाची मूल्य आणि महत्त्व या शिबिरातून पोहचायला हवी

काँग्रेस पक्ष मुंबईत तयार झाला आहे. काँग्रेस नेहमी एकता आणि संविधान सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे

मुंबईत जर काँग्रेस जिंकली तर महत्त्वाचा टप्पा मानला जाईल

लोकसभा निवडणूक सगळ्यांनी एकत्र येऊन लढायची आहे

ज्या लोकांना पक्षाकडून सगळं मिळतं ते लोकं घर सोडून जातात

२४ फेब्रुवारीला इंडिया आघाडीचा पुण्यात मेळावा, शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले राहणार उपस्थितीत

२४ तारखेला इंडिया आघाडीचा पुण्यात होणार मेळावा

मेळाव्याला शरद पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले राहणार उपस्थितीत

पुण्यातील काँग्रेस भवन येथे होणार इंडिया आघाडीचा मेळावा

इंडिया फ्रंट चे सर्व नेते उपस्थित राहणार

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचा मेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, सभा उधळून लावण्याची भाषा केली, नितेश राणे यांचं जरांगेंना प्रत्युत्तर

राणे साहेबानी आणि राणे कुटूंबियांनी मराठा समाजासाठी काय केलं हे आम्हाला सांगायची गरज नाही

समाजासाठी आम्ही काही करू शकलो तर ते आम्ही आमचे कर्तव्य मानतो

मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे हीच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे

यासाठी या प्रवासात आम्ही सहभाग घेतलेला आहे

संघर्ष केलाय आणि लढलोही आहे

फक्त आम्ही पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे यांना सांगतोय तुम्ही राजकीय टीका करू नका

आंदोलन कुठेही भरकटता कामा नये

महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज नाहीच, आणखी २-३ दिवस सुरू राहणार उपचार

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल; अजित पवार यांची माहिती

बारामती लोणंद रोड येथे सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून लागले बॅनर

बारामती लोणंद रोड येथे सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून लागले बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार याचं नाव चर्चेत

बारामती लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होण्याची शक्यता

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समजाचं आंदोलन

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समजाचं आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात सकल मराठा समाजाचं आंदोलन

पुणे शहरात ठिकठिकाणी आज सकाळपासून मराठा समजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू आहेत आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आंदोलन करत मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापुरातील मराठा समाज आक्रमक

सोलापुरातील मराठा समाज झाला आक्रमक

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर मराठा समाजाचा ठिय्या

आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतः घराबाहेर येत मराठा आंदोलकांची घेतली भेट

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याच दिलं आश्वासन

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील केला फोन, मात्र तांत्रिक अडचणीमुळे संपर्क होऊ शकला नाही

नाशिक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक

नाशिक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक

भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर मराठा बांधवांचं ठिय्या आंदोलन

आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः आमदार राहुल ढिकले देखील हजार

मराठा समाज आरक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर करणार ठिय्या आंदोलन

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा कायम

माजी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा कायम

पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला होणार

मुंबई महापालिका कथित शव पिशवी घोटाळ्यात आहे पेडणेकरांचं नाव

22 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यास कोर्टाची मनाई

न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकल खंडपीठाचा निर्णय

नागपूर जिल्ह्यातील संत्रा बागांना पुन्हा एकदा वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका

नागपूर जिल्ह्यातील संत्रा बागांना पुन्हा एकदा वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका

काल सायंकाळी नरखेड तालुक्यातील सावरगाव भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मृग बहाराच्या संत्रा पिकाचे मोठे नुकसान

झाडाला लागलेली संत्री गळून पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

आठवडाभरात दुसऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना आज दिला जाणार डिस्चार्ज

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण

गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना आज दिला जाणार डिस्चार्ज

ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून दिला जाणार डिस्चार्ज, गोळीबारात महेश गायकवाड यांना ६ गोळ्या लागल्या होत्या

जमिनीच्या वादातून तसेच राजकीय वादातून झाला होता गोळीबार

पुणे पोलीस आयुक्तांचे सर्व पोलिसांना हेल्मेट वापरण्याचे आदेश

पुणे पोलीस आयुक्तांचे सर्व पोलिसांना हेल्मेट वापरण्याचे आदेश

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याना हेल्मेट वापरणे केले अनिवार्य

हेल्मेट न वापरल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांची तंबी

पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावरच कुमार यांनी हेल्मेट वापरण्याचे नागरिकांना केले होते आवाहन

त्याची सुरुवात त्यांनी पोलीस विभागातून केलीय

अजितदादा गटाकडून आज उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार

आमदार आपात्रता प्रकरणी विधिमंडळांने दिलेल्या निकाल प्रकरणी

अजितदादा गटाकडून आज उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी विधिमंडळाच्या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सावध पवित्रा

आमदार आपात्रता प्रकरणी विधिमंडळाने दोन्ही गटातील आमदारांना पात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेतली होती

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या कारणास्तव धाराशिवमध्ये एसटी सेवा बंद

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेच्या कारणास्तव धाराशिवमध्ये एसटी सेवा बंद

पुढील आदेश येईपर्यंत एसटी सेवा बंद ठेवण्याचा एसटी प्रशासनाने घेतला निर्णय

धाराशिव जिल्ह्यात काल काही बसवर झाली होती दगडफेक

जिल्ह्यात आज मराठा आंदोलन अधिकच चिघळले जाण्याची शक्यता

बसस्थानकावर लावले पुढील आदेश येईपर्यंत एसटी बंद ठेवल्याचे फलक

हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का

हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का

शिवसेनेचे नेते बी. डी. चव्हाण थोड्याच वेळात वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात बी डी चव्हाण यांचा प्रवेश होणार

मार्डच्या डाॅक्टरांचा पून्हा संपाचा इशारा

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची सुविधा, विद्यावेतनात वाढ आदी विविध मागण्या पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देऊन आठ दिवस उलटले, मात्र अद्यापही त्याबाबत अध्यादेश काढण्यात आलेला नाही

पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा संप करण्याचा इशारा डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने दिला आहे.

प्रलंबित मागण्या याबाबत कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिला

मराठा आरक्षणासंदर्भात सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित

मराठा आरक्षणासंदर्भात सरकार घोषणा करण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर उपस्थित राहणार

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

मराठा समाजाच्या मागणीनुसार कायदेतज्ञ आणि वकील यांच्याशी मुख्यमंत्री यांनी केली चर्चा

मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री करणार महत्वाची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

SCROLL FOR NEXT