अनिल अंबानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
पुणे-नाशिक रोडवर अपघात
चाकण येथे ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात
रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक
अपघातात चालक गंभीर जखमी
बीडच्या आष्टी येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात फिल्मी डायलॉगबाजी झाली. जनतेतून देवेंद्र बाहुबलीच्या घोषणा दिल्या जात होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी मी शिवगामी देवीच्या भूमिकेत असून मेरा वचन ही है मेरा शासन, असा डायलॉग केला. याच प्रश्नावर सुरेश धस यांनी कटप्पा शोधावा लागेल, असे म्हणत मिश्किल प्रतिक्रिया दिली. आष्टीतील कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित कार्यक्रमावेळी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवईच्या आय आय टी मार्केट शेजारी असणाऱ्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत थेट घराच्या छतावर बेकायदेशीररित्या जाहिरातीचे होर्डिंग उभारण्यात आले आहे. या होर्डिंग उभारणीचे काम जलद गतीने होत असून, भविष्यात हे होर्डिंग कोसळून अपघात होण्याच्या भीतीने स्थानिक रहिवाशी चिंतातूर झाले आहेत. यापूर्वीही मुंबईत होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या असून यात अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र अशा दुर्घटनानंतरही मोठ्या होर्डिंगवर ठोस अशी कारवाई केली गेली नसल्याने, या होर्डिंग मालकांनी चक्क आता झोपडपट्टी भागात आपला मोर्चा वळवला आहे.
राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थान बाहेर कालपासून आहे तगडा बंदोबस्त
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूरकर याच्या घरी गेले आहेत.
राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर कालपासून आंदोलन आणि निषेध व्यक्त केला जात आहे
राहुल सोलापूरकरांनी माफी मागण्याची केली जात आहे मागणी
या सगळ्या पार्श्वभूमीवर कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूरकरांच्या घरी.
नवी मुंबईतील शहाबाज गावातून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेय. नवी मुंबई पोलीसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई. हे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत होते. या बांगलादेशी नागरिकांनी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्येष्याने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील काढले होते. मुमताज मंडल, रेहाना मंडल आणि उज्वल मंडल अशी त्यांची नावे असून तिघांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकलाय.
मुंबई नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने जात असताना ट्रकचा अपघात झालाय. त्यामुळे वाहतूक कोंडी झालीय. महामार्गावरील पिंपळस गावाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला असून अपघातात एक जण जखमी झालाय. नाशिकच्या दिशेने वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. दोन ट्रकमध्ये धडक झाल्याने मागून येणारी कार देखील या ट्रकला धडकली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या हे ट्रक महामार्गावरून क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे. असेच एक उत्खनन नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव इथे सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली.
या माहितीची खातरजमा करून नांदेड पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून कारवाईस प्रारंभ केला. दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई चालली. स्वतः पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ही कारवाई केली आहे.
घटनास्थळी उत्खननाचे साहित्य बघून कुणाचेही डोळे पांढरे होतील असे चित्र होते. या कारवाईत पोलिसांनी एकाच ठिकाणाहून 17 इंजन 10 बोट 30 तराफे एक जेसीबी असा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या घराबाहेर पोलिसाचा मोठा बंदोबस्त
- उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 9 वर्षीय शाळकरी मुलीवर 59 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना या नराधमाने शाळकरी मुलीस बळजबरीने झाडांमागे ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याबाबत पीडितेच्या पालकांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अत्याचार प्रकरणी तात्काळ गुन्हा करत पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
इंग्लडचा स्टार क्रिकेटपटू तथा सलामी फलंदाज जॉस बटलर वर्ध्याच्या तळेगांव येथे आला होता, तळेगांव येथे असलेल्या राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याने भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी त्याचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
- नंदुरबार येथे जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत.
- हे दोघी रुग्ण आहे लहान बालक आहेत.
- दोघांपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.
- चिंताजनक असलेल्या लहान बालकाला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलेला आहे.
- ज्या गावातून हे रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणाचे पाणीचे तपासणी देखील केली जाणार आहे.
- जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क आहे.
- वीस आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत.
- जीबीएस आजारासाठी जिल्हा प्रशासनाकडून कळक अशा उपायोजना केल्या जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल, गाड्यांचे टायर, हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला आणि मुलांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
या टोळीची म्होरक्या असलेल्या महिलेने 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन धमकावून बळजबरीने चोऱ्या करायला भाग पडल्याच निष्पन्न झालंय.
आरोपींकडून 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
- मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ कारला अपघात
- चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार पलटी होऊन झाला अपघात
- मुंबईकडून महाडच्या दिशेने येणारी स्विफ्ट डिझायर कार अपघातग्रस्त
- कार मधील चार जणांना किरकोळ दुखापत
- जखमींवर महाडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु
- साताऱ्यातील फलटणनंतर पुणे, इंदापूर तालुक्यात आयटीची छापेमारी.
- नेचर डिलाइट डेअरी आणि संबंधित कंपन्यांवर छापा आयकर विभागाचा छापा.
- आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात.
- सकाळी सात वाजल्यापासून आयटीची छापेमारी.
- नेचर डिलाईट डेअरी ही अर्जुन देसाई यांच्याशी संबंधित आहे.
धाराशिवच्या तुळजापूर शहरात सोयाबीन उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडी व सामाजीक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन राज्य सरकारने सरसगट खरेदी करावे या मागणीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असुन सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले दरम्यान सर्व शेतकऱ्यांचे सरसगट सोयाबीन खरेदी करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलन शेतकऱ्यांनी दिला आहे.
सिबिडी सेक्टर 8 येथील आर्टिस्ट व्हिलेज जवळ झाला अपघात.
याठिकाणी नवी मुंबई मनपाच्या रोड मेंटेनन्सचे काम सुरु होते.
रस्ता दुरुस्तीचे साहित्य घेवून आलेल्या डंपरची विद्यार्थ्याला धडक.
डंपरची जोरदार धडक बसल्याने सायकल वरील 12 वर्षीय विद्यार्थी शिवम भट याचा जागीच दुर्दैवी मृत्यू.
बेलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येतोय.
घटनास्थळी मृतावस्थेत मुलाला पाहून आईने फोडला टाहो.
आमची अपेक्षा देवेंद्र बाहुबलीच पूर्ण करतील - सुरेश धस
मी जिवंत राहील किंवा नाही, आमदार भाजपचा राहिल - धस
फक्त फडणवीस यांच्याकडून अपेक्षा, इतरांकडून अपेक्षा नाही - धस
आष्टीमध्ये फक्त भाजपचाच आमदार राहील - धस
काही राजकारण्यांचा गुंडाना पाठिंबा - धस
देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दखल घेतली - धस
मुख्यमंत्र्यांची कणखर भूमिका सर्वांना आवडली - धस
बीडने गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा माणूस दिला - धस
राख, वाळू माफियावर मकोका लावा, धस यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
तलावासाठी मी दगड काठ्या खाल्ल्या - धस
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार आहे. तरी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रीककरिता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोईच्या तारखेला, जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे, असे आवाहन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले आहे. यासाठी आता राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आजपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
नाशिकच्या मनमाडमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाच्या इंधन टाकीतून इंधन चोरी करतांना एकाला मनमाड पोलिसांनी अटक केली. अभिषेक गडाख असे अटक करण्यात आलेल्या इसमाची नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे एक वाहन, 40 लिटर चोरीचे 6 ड्रम,नळी,स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल हस्तगत केला. यापूर्वीही त्याने वाहनातून इंधन चोरी केल्याची कबुली दिली
सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिर्वाय असल्याचा सरकारने मोठा निर्णय घेतलाय.. मात्र, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 39 व्या दीक्षांत समारंभात कृषी विद्यापीठाचे कुलगुरूसह राज्यपाल आणि इतर अधिकाऱ्यांनी इंग्रजीमध्ये भाषण केलं.. मात्र, इंग्रजीमध्ये झालेल्या भाषणाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध व्यक्त केला.. राज्य सरकारने शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषेचा अंतःर्भाव करणे अनिवार्य केले असतांना मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पाऊले उचलली असतांना, अकोल्याच्या कृषी विद्यापीठात ३९ व्या दीक्षांत समारंभावेळी राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत आदेशाची अकोला विद्यापीठात ऐसी तैसी पाहायला मिळत असल्याचे मिटकरींनी खेद व्यक्त केलीए
- भगवान गडाचे न्यायाचार्य नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानं वारकरी संतापले
- नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे, वारकरी संप्रदायाला शोभणारे नाही
- नाशिकच्या वारकरी संप्रदायाकडून नामदेव शास्त्रींचा निषेध
- आपल्या कृत्याबद्दल नामदेव शास्त्रींनी त्वरित सबंध महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांनचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमर ठोंबरे यांचा इशारा
नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाची पांढरी अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीचा वाढ झाली आहे कधी कडाक्याची थंडी,अवकाळी पाऊस आणि आता उन्हाच्या ताडाख्यामुळे उकड्याचा द्राक्ष घडांवर त्याचा परिणाम जाणवू लागला असून त्यामुळे द्राक्षाची प्रतवारी खालावली आहे,एकरी लाखोंचा खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास वाया जात असल्याने झालेला खर्च,घेतलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेत द्राक्ष उत्पादक सापडला असून बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
सोलापूर महापालिका प्रशासनाने नव्या सुधारित विकास योजनेचा प्रारूप आराखडा (डीपी) तयार करताना सातारा शहराची कॉपी केली आहे.या आराखड्यात अजिंक्यतारा फोर्ट,जलमंदिर राजवाडा,चार भिंती,बदामी - विहीर आदी गोष्टींचा समावेश आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी आणि हा आराखडा रद्द करावा,अशी खळबळजनक मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केली आहे.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी काटेकोर नियोजन करा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षेतेखाली विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपसचिव मिलिंद शेणॉय, श्रीमती विशाखा आढाव उपस्थित होते.
मी भाजपात जाणार ह्या चर्चांना अर्थ नाही. माझी फक्त विकास कामांवर चर्चाएकनाथ खडसे
देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. आज सकाळी साडेआठ च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. महाराजांचा नुकताच टिळा देखील झाला होता. एप्रिल किंवा मे महिन्यात विवाह सोहळा होता.
बीड जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ गडावर विविध विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी मच्छिंद्रनाथ गड सज्ज झालाय. जिल्ह्यातील प्रत्येक गडाला धार्मिकसह राजकीय देखील तितकेच महत्त्व आहे. याच मच्छिंद्रनाथ गडावर भाजप आमदार सुरेश धस यांचे वर्चस्व आहे. गडावरील विकास कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धस यांनी विकास निधी मंजूर केला असून त्याच कामाचे उद्घाटन आज होते.
शक्तीपीठ महार्गाला नांदेड मध्ये मोठा विरोध होताना दिसत आहे.शक्तीपीठ महामार्गा संदर्भात शेतकऱ्यांन मध्ये दोन गट पडले आहेत.एक गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे तर दुसरा गट या महामार्गाच्या विरोधात आहे.नांदेड मध्ये आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडच्या मालेगाव येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रोखून धरला होता.नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या महामार्गात जात असल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.हा महामार्ग गुत्तेदार धार्जिना असून याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही.त्यामुळे या महामार्गाला आम्ही एक इंच ही जमीन देणार नसल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
राज्य सरकारने शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषेचा अंतःर्भाव करणे अनिवार्य केले असतांना, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पाऊले उचलली असतांना, अकोल्याच्या कृषी विद्यापीठात ३९ व्या दीक्षांत समारंभावेळी राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत आदेशाची अकोला विद्यापीठात ऐसी तैसी पाहायला मिळत असल्याचे अमोल मिटकरींनी ट्विटरद्वारे खंत व्यक्त केली..
दरम्यान, सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिर्वाय, असा फडणवीस सरकारचा मोठा निर्णय झाला होता.. मात्र, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 39 व्या दीक्षांत समारंभात.. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दीक्षांत समारंभात कुलगुरू शरद गडाखसह अन्य अधिकारी इंग्रजीमध्ये भाषण देत आहे..
मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीस्थळी 180 किलो फळांची आरास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे मंदिर गाभारा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मच्छिंद्रनाथ गडावर जोरदार तयारी करण्यात आलीय.
मंदिर आणि परिसराला फुलांच्या साहाय्याने आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली असून समाधी स्थळावर तब्बल 180 किलो फळांच्या सहाय्याने आरास करण्यात आली आहे..
प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या..
आत्महत्या करण्यामागचे कारण अस्पष्ट...
तीर्थक्षेत्र देहू गावावर कोसळला दुःखाचा डोंगर..
घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल
महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी केले रास्तारोको आंदोलन.
नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला.
नांदेड जिल्ह्यात महामार्गाला मोठा विरोध.
जालना जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तिच्याच वर्गशिक्षकाकडून छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात समोर आली आहे. जालन्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या नराधम शिक्षकाला शेवगा ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी चोप देऊन मौजपुरी पोलिसांच्या हवाली केल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सध्या याप्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे...
सोलापूर महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे.उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामादरम्यान जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महापालिकेच्या ताब्यात नसताना टेंडर काढण्यात आल्याचं प्रकार सामोरं आला आहे. सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा सवाल उपस्थित करून हा मुद्दा सामोरं आणला आहे.यावेळी महापालिकेचा अनागोंदी कारभारावर टीका करत आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्र्यांच्या समोर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात सक्त सूचना देत लवकरच हा विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा पाठोपाठ पुण्यात सुद्धा रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे
आयकर विभागाकडून रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यातील घरावर छापेमारी
पुण्यातील प्रभात रोड येथे एका इमारतीत छापेमारी
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा येथील घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे
कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील मॉडर्न होम्स सह आजूबाजूच्या दुकानात काल रात्रीचा सुमारास अज्ञात चोरट्यानीडल्ला मारला. ही चारही दुकाने मार्बलची होती .मध्यरात्री अडीच तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी या तीन ते चार दुकानाचे शटर कडून दुकानांमधून रोख रक्कम ,लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेलाय .ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या चोरीच्या घटनेमुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. घ्या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे तलाव पाहनी तसेच शिमपोरा खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. यावेळी सभापती राम शिंदे मंत्री विखे पाटील मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे.. दुपारी एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात मान्यवरांचे सभास्थळी आगमन होणार आहे.
भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या एका महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली. प्रियंका लोंढे असे या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्या तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या.प्रियंका दररोज पहाटे ५ वाजता देवराष्ट्रे येथून तुरची पोलिस केंद्रात जात असतात. नेहमीप्रमाणे त्या दुचाकीवरून तूरची केंद्राकडे जात असताना बलवडी फाट्याजवळ समोरून भरधाव आलेल्या मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील प्रियंका लोंढे या रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाल्या. त्यांच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला होता. याप्रकरणी मोटारचालक उदय रामचंद्र पवार याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपुर्ना नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा सुरू असून इसरुळ गावातून या वाळूची वाहतूक केल्या जाते .. काल रात्री अवैध वाळूचे भरधाव टिपर ने गावातील एका तरुणाला उडविले असता तो जखमी झाला... यावेळी ग्रामस्थ आक्रमक होत त्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीप्पार ला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला , मात्र पुढच्या गावातहि अडवण्याचा प्रयत्न केला असता येथील ही ग्रामस्थांचे अंगावर चालकाने तिप्पर घातला .. मात्र त्याठिकाणी कुणालाही लागले नाही .. यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि संपूर्ण वाळू वाहतूक बंद केलीय. . ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून महसूल प्रशासनाने संपूर्ण वाळू वाहतूक बंद करण्याचे आश्वासन दिल्याने वाद मिटला .. मात्र अवैध वाळू बंद कधी होणार , हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलाय ..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण महामार्गावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग 752इ या राष्ट्रीय महामार्गावरील चितेगाव ते बिडकीन गावांमधील रखडलेल्या रस्त्याचे काम व धुळीमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच निलजगाव फाटा ते पोलिस कॉलनी रस्त्यावर रहदारीने वाढते अपघात याबाबत रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांना आधारभूत किमतींमध्ये सोयाबीन विक्री करता यावी यासाठी नाफेड कडुन धाराशिव जिल्ह्यात 21 हमीभाव खरेदी केंद्र कार्यान्वित केली आहेत. माञ शासनाने 6 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली, असली तरी हा कालावधी अपुरा पडणार आहेत. जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन दोन दिवसात खरेदी करण्याचे मोठे आव्हान खरेदी केंद्राना आहे. दरम्यान केंद्रावर राञदिवस काम सुरू असुन तरीही शेतकऱ्यांचे संपुर्ण सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दोन दिवसात पुर्ण होते शक्य नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राला आणखी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.
विट्याजवळील कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई 'कनेक्शन' स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले आहे. कार्वे एमआयडीसीमध्ये माऊली इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्याच्या मालकिन असणाऱ्या गोकुळा पाटील याना सांगली एलसीबीने ताब्यात घेतली आहे ही जागा त्यांनी भाडेतत्त्वावर दिली होती यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या ड्रग्स प्रकरणी.. याप्रकरणी विट्यातील आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग विट्यात ठाण मांडून आहे. लवकरच या प्रकरणात आणखी सहभागी असणाऱ्यांचा पर्दाफाश करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी असलेली जाधववाडी भाजी मंडई येथे भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळलेले पाहायला मिळाले. मेथीची 20 रुपयाला मिळणारी जोडी 10 रुपयात तीन मिळू लागल्यात, टोमॅटो 10 रुपये किलो, कोथिंबीर 10 रुपयात 2 जुडी आणि पालक 10 रुपयांमध्ये 3 जुडी अशा पद्धतीने भाजीपाल्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, पालेभाज्यांवर खर्च केलेला देखील निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
पुण्यात बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केलीय. वेल्हे तालुक्यातील पाबे गावातून या तिघांना अटक करण्यात आली. कुठले ही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील एका तरुणावर याआधी एक गुन्हा दाखल असून एक जण अल्पवयीन असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या परिसरात इथून पुढे असे कृत्य करणाऱ्यांचे कंबरडे मोडू असा इशारा सुद्धा यावेळी पोलिसांनी आता दिला आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भंडारा डोंगरावर वसंत पंचमी निमित्ताने म्हणजेच तुकोबांच्या जन्मदिवसा पासून नाम सप्ताहाची सुरुवात झाली असून बार्शीच्या दिवशी कालच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगत होते. या सप्ताहाची 50 वर्षाची परंपरा आहे. नाम सप्ताह साठी राज्यातून नामांकित कीर्तनकारांची सेवा भाविकांच्या चरणी अर्पण केली जात असते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी म्हणजे देहू मात्र कर्मभूमी आणि अध्यात्म साधनेची भूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर आहे. याच भंडारा डोंगर तुकोबांनी नांदूरकीच्या झाडाखाली बसून गाथा लिहिली होती. त्यामुळे या भंडारा डोंगराला विशेष महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना भंडारा डोंगरावर प्रेरणा मिळालेली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, यासह देशभरातील भाविक या भंडारा डोंगरावर येऊन सप्ताह निमित्ताने पारायण, कीर्तन, आणि प्रवचनाचा आनंद घेत असतात. दरवर्षी लाखो भाविकांना महाप्रसादाचे आयोजन ट्रस्टच्या वतीने केले जाते. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या धरतीवर भंडारा डोंगरावर तुकोबांचे भव्य दिव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. अयोध्या मध्ये श्रीरामाच्या मंदिराला, अक्षरधाम मंदिराला जे दगड वापरले जातात तेच दगड या तुकोबांच्या मंदिराला लावून त्याची निर्मिती केली जात आहे. याला अंदाजे दोनशे कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. मंदिराचे सत्तर टक्के काम झालेले आहे.. दोन वर्षात मंदिर पूर्ण तयार होईल अशी अपेक्षा भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद त्यांनी व्यक्त केले आहे.
भरधाव टँकर ने रस्त्या शेजारी असलेल्या हॉटेल व पान टपरीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टँकर ने अचानक पेट घेतला.यवतमाळच्या पुसद तालुक्यातील कासोळा येथे ही घटना घडली असून अग्निशामक दल व पोलिसांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात आली.सुदैवाने यात कुठलीच जीवित हानी झाली नाही मात्र किरकोळ व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे जळगावात दाखल
मुंबईवरून रेल्वेद्वारे एकनाथ खडसे यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मतदारसंघातील विकास कामांच्या चर्चा करण्यासाठी गेलो होतो
मुक्ताईनगर मधील मुक्ताई मंदिर, सूतगिरणी , अभियांत्रिकी महाविद्यालय , अल्पसंख्यांकांचे प्रश्न याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
विष्णू चाटे चा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.. विष्णू चाटे चा मोबाईल संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
पुणे वाहन तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांकडून तीन जणांना अटक
अवघ्या सहा तासात पोलिसांनी आवळे आरोपींच्या मुस्क्या
पुण्यातील येरवडा परिसरातून तीन जणांना वाहन तोडफोड केल्याप्रकरणी केली अटक
अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर असे आरोपींची नाव आहे
सातारा: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा
इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल...
सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू
बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.