Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live Update: धनंजय मुंडे बैठकीसाठी देवगिरीवर दाखल

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 4th March 2025 : आज सोमवार, दिनांक ०४ मार्च २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, दत्ता गाडे पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरण, चॅम्पियन्स ट्रॉफी, धनंजय मुंडे राजीनामा, मनोज जरांगे पाटील, मुंबई-नाशिक-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Dhanshri Shintre

धनंजय मुंडे बैठकीसाठी देवगिरीवर दाखल

धनंजय मुंडे बैठकीसाठी देवगिरीवर दाखल 

धनंजय मुंडे बैठकीसाठी देवगिरीवर दाखल 

Sangli : सांगलीत दगडाने ठेचून युवकाची हत्या

सांगलीच्या कुपवाड मध्ये प्रकाश नगर येथे राहुल सूर्यवंशी वय (३८) याचा रॉडने मारून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता. त्याला वारंवार समजावून सांगून सुद्धा तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळे,

संतप्त झालेल्या नातेवाईकाने राहुलला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत (वय २२) याला ताब्यात घेतला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत.

6 तारखेला मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार इंडिया आघाडी आपल्या मागणीवर ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा तारखेला कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवू नका... पोलिसांनी केली इंडिया आघाडीला विनंती

इंडिया आघाडी आणि शिवभक्तांनी फेटाळली पोलिसांची विनंती

कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचा ताफा गनिमीकाव्याने अडवणार

इंडिया आघाडीचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना त्वरित अटक करण्याची इंडिया आघाडीची मागणी

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोरटकर विरोधात इंडिया आघाडी आक्रमक

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अबू आजमीचा पुतळा जाळला

औरंगजेब हा चांगला प्रशासक असल्याचे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांनी केले होते त्याच्या निषेधार्थ चिखली येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अबू आजमी यांच्या पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. तसेच अबू आजमी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कोल्हापूरात महिला पोलीस अधिकाऱ्यांची बाईक रॅली

लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी आज कोल्हापूर पोलीस दलातील महिला अधिकारी, महिला पोलीस अंमलदार यांची 'बेटी बचाव बेटी पढाओ' बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली असून संपूर्ण शहरात जनजागृती पर संदेशही देण्यात आला.

कोल्हापूरचा ऐतिहासिक पन्हाळगड हजारो एलईडी दिव्यांनी उजळला

कोल्हापूरच्या पन्हाळगडावर किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ डी थिएटरचं लोकार्पण होणार आहे. आज पासून 7 मार्चपर्यंत सुरू असणाऱ्या या पर्यटन महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

या निमित्ताने इतिहासाचा ठेवा असणारा पन्हाळगडाला हजारो एलईडी दिव्याच्या लाइटिंगने सजवण्यात आलय. रंगीबेरंगी लाइटिंग मुळे पन्हाळगडाचं रूप अक्षरशः पालटून गेलय. शिव मंदिर, तीन दरवाजा, बाजीप्रभू यांचा पुतळा, बुरुज, यांच्यासह पन्हाळगडावरील सर्वच ऐतिहासिक ठिकाने या लाइटिंग मुळे अक्षरशः न्हाऊन निघालेत. हे लाइटिंग पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर पन्हाळगडावर गर्दी करत आहेत.

Raigad : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट

- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट

- वडखळ नजीक डोलवी गावा हद्दीतील घटना

- मुंबई बाजूकडे जाणार्‍या चालत्या कार ने घेतला अचानक पेट

- सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नसली तरी कार आगीत जळून मोठ नुकसान

- शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता

Dhananjay Munde : धनजंय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला

Pune News: पुण्यातील साई इंडस्ट्रीअल परिसरात कंपनीला भीषण आग

कात्रज-गुजरवाडी रस्ता, साई इंडस्ट्रीअल परिसरात येथे कंपनीला लागली भीषण आग. अग्निशमन दलाकडून सहा वाहने परिसरात दाखल. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरुच. आग नेमकी कशामुळे लागली शोध सुरू.

Nashik Fire: नाशिकच्या इंदिरानगर परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला आग

नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला आग.

लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक.

आकाशात धुराच्या लोटामुळे संपूर्ण परिसर झाकोळला.

आकाश काळवंडले, पक्षीही सैरभैर,

अग्निशमन दलाचे दोन बंब करतायत आग विझविण्याचा प्रयत्न.

विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव ठाकरेंकडून निश्चित

विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव ठाकरेंकडून निश्चित करण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात विधान सभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत.

Raigad : माणगावजवळ ताम्हिणी घाटात एसटी बस आणि कारचा भीषण अपघात

माणगावजवळ ताम्हिणी घाटात एसटी बस आणि कारचा भीषण अपघात

- अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू

- खेड इथून पिंपरीकडे निघालेल्या बसला कारची धडक

- मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश तर दोन जण जखमी

- माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल

- क्रेनच्याच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला

- मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू

नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेस आक्रमक आंदोलन

नागपूर शहरातील वेगवेगळ्या समस्याना घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या आवारात काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं.

महानगरपालिकेच्या आयुक्ताचा कार्यलया बाहेर मटके फोडले तर काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात असलेल्या माठ आणि कुंड्या सुद्धा फोडल्या.

मोठ्या प्रमाणात महानगरपालिका समोर जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणी समस्या नागरिकांच्या पाणी बिलाची समस्या अशा वेगवेगळ्या नागरी समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

उल्हासनगरमधील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात काँग्रेसचे उपोषण आणि निषेध आंदोलन

उल्हासनगर शहर जिल्हा साऊथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने उल्हासनगर मधील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात उपोषण आणि निषेध आंदोलन शहर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले,

येथील नेताजी चौकात हे आंदोलन करण्यात आले,

यावेळी राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते,

यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका व्यक्तीची पाठ दुखत असल्यामुळे उपोषण स्थळी एका नागरिकाला इंजेक्शन देण्यात आले

स्थानिक नागरिकांना झेंडू बाम आणि मास हे वाटप करण्यात आले, या उपोषणादरम्यान महानगरपालिकेला काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या,

त्यात भुयारी गटर योजना च्या अंतर्गत कामा मधील विविध नागरी तकाईची दखल घेत ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाही करा.

Jalna: जालन्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ निषेध सभा

मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध सभा....

या प्रकरणात धनंजय मुंडे पेक्षा अजित पवार जास्त दोषी,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा बारामतीला जाऊन त्यांच्या घराला घेराव घालणार जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

अजित दादांनी या प्रकरणांमध्ये न्यायची भूमिका घ्यायला पाहिजे, गुन्हेगाराला वाचवायची भूमिका घ्यायला नाही पाहिजे...

वाल्मीक कराड याला धनंजय मुंडे यांचे संरक्षण आहे धनंजय मुंडे यांना अजित पवारांच संरक्षण आहे.

म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे जालन्यात मराठा क्रांती मोर्चाची मागणी.

धुळ्यात शिंदेंच्या शिवसेनेतर्फे अबू आजमी यांच्या पोस्टरला जोडे मारून करण्यात आला निषेध

धुळ्यात शिंदेंच्या शिवसेनेतर्फे अबू आजमी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले..

अबू आजमी यांनी औरंगजेबाबद्दल गौरवोद्गार काढले होते..

औरंगजेब हा चांगला राजा होता असं वक्तव्य अबु आजमी यांनी केले होते..

अबू आजमी यांच्या वक्तव्याचा शिंदेंच्या शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला आहे..

यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले..

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाच्या पाईपचे 15 तुकडे सीआयडीकडे जप्त

पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो सीआयडीने आरोप पत्रात दिला आहे.

अमानुषपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली यावेळी या पाईपचे 15 तुकडे झाली होती.

तेच पंधरा तुकडे यांचा फोटो सीआयडीच्या दोषारोप पत्रात देण्यात आला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली यावेळी मारहाण करतानाच्या पाईपचे 15 तुकडे झाले होते,

या 15 तुकड्याचा फोटो सीआयडीने दोषारोप पत्रात दिला आहे.

शिंदे सेनेने वाल्मीक कराडचा पुतळा जाळला

शिवसेना शिंदे गटाच्या युवा आघाडीचे आंदोलन...

वाल्मीक कराडच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत जाळला पुतळा...

युवा सेनेकडून वाल्मीक कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी...

वाल्मीक कराड विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक...

कराडविरोधात राज्यभरात आंदोलन...

वाल्मिक कराड विरोधात शिवसेना युवा सेना आक्रमक

बीड मधील संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक तुरुंगात आहे काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वाल्मीक कराड विरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.

आज शिवसेना शिंदे गट युवासेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीत वाल्मीक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी या पुतळ्याला जोडेमार आंदोलन करण्यात आले.

वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील यावेळी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केली .

Hingoli: हिंगोलीत वकिलांनी चक्क शासकीय रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करत बोर्ड लावले

न्यायदानाची शपथ घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांनी हिंगोलीमध्ये चक्क शासकीय जमिनीवर अतिक्रमन केल्याचा प्रकार उघड झाला आहे..

नूतन न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्या परिसरात स्वतःचे ऑफिस थाटण्यासाठी वकिलांनी थेट हिंगोली पालिकेच्या मालकी रस्त्यावर स्वतःची जागा राखीव करून ठेवण्यासाठी अतिक्रमण करत बोर्ड लावले आहेत..

दरम्यान कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या वकिलांनी अतिक्रमण केल्याने सर्वसामान्य मात्र संताप व्यक्त करत आहेत..

Walmik Karad: वाल्मिकी कराड विरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे आंदोलन

- कराडला फाशी शिवसेनेकडून मागणी

- शिवसेना कार्यलय समोर फाशीचा फंदा तयार करून कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन

- शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते सह पदाधिकारी उपस्थित

- आंदोलन दरम्यान वाल्मिक कराडला फाशी देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी

Yavatmal: शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा लॉग मार्च आंदोलन

शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा यवतमाळ ते पांढरकवडा असा लाँग मार्च काढण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्र शासनाचा वार्षिक महागाई दरानुसार दरवर्षी आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला मुलींच्या वस्तीगृहांमध्ये लागू असलेल्या डीबीटी या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करून ती वाढ दरवर्षीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्यात यावी आदिवासी वस्तीगृह प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना 85 टक्के वस्तीगृहात राहणे बंधन करावा आणि सतत 60 दिवस वस्तीगृहात गैरहजर असल्यास त्या विद्यार्थ्यांचे वस्तीगृहातून प्रवेश रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा लाॅग मार्च काढून आंदोलन केले.

संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून उकरुन फेकावी, नवनीत राणा यांची मागणी

औरंगजेबावर स्तुतीसुमन उधळल्या प्रकरणी नवनीत राणा चांगल्याच संतापल्या...

अबू आजमीनी एकदा छावा बघावा, राणा यांचा सल्ला...

संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा औरंगजेब होता...

त्यांच्या डोळ्यापर्यंत सळ्या टाकण्याचं काम औरंगजेबाने केलं होतं

महाराष्ट्रात राहून औरंगजेबाला बाप म्हणाऱ्याना सरकारने उत्तर द्यावं

ज्यांना औरंगजेबा प्रती प्रेम दाटून येत असेल त्यांनी आपल्या घरात त्याची कबर बांधावी, नवनीत राणा यांचा अबू आझमींना इशारा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील कुलसचिव निवासासमोरील जंगलाला लागली आग, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वृक्षतोडीच्या अनेक घटना समोर आलेले आहेत.

आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यापीठांमधील कुलसचिव निवासस्थानाच्या समोरील जंगलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ही आग मानवनिर्मित होती की नैसर्गिक याचा शोध घेतला गेला पाहिजे व दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

जाणीवपूर्वक विद्यापीठ प्रशासन अशा गोष्टी घडवून आणत आहे का असा आमचा प्रश्न आहे ?

राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे - संभाजी ब्रिगेड

मस्साजोक'चे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुणपणे हत्या झाली.

सरकार मात्र आरोपीला आजही पकडू शकलं नाही.

एक आरोपी अजूनही फरार आहे, तरीसुद्धा मंत्री धनंजय मुंडे व राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री निष्क्रिय पद्धतीने हे प्रकरण हाताळताना दिसले.

आरोप कोण सुद्धा सरकारने मुंडेंवर कारवाई केली नाही. 'अत्यंत विकृत पद्धतीने आरोपीने मारहाण करून सुद्धा जर सरकार काही करू शकत नसेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे.'

परंतु राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा नैतिकतेनुसार राजीनामा दिला पाहिजे.

राज्याचे गृहमंत्री निष्क्रिय आहेत त्यांचा राजीनामा सर्वात महत्त्वाचा आहे....

दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त, केडीएमसी प्रशासन सुस्त

कल्याण चिकणघर परिसररातील नव एव्हरेस्ट सोसायटीमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या सोसायटीमध्ये एकूण 75 साधने का असून गेल्या महिनाभरापासून या सोसायटीला दूषित पाणीपुरवठा होतोय.

पिवळ्या रंगाचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या मात्र स्टेडियमचे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत.

केडीएमसीने 15 दिवसांपूर्वी पाण्याचे नमुने घेतले मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप आला नसल्याचे सांगितले.

या दूषित पाणीपुरवठा मुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना ,वृद्ध नागरिकांना उलट्या ,टायफाईड ,ताप ,डायरिया सारखे आजार झालेत.

त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन

आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर; खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती..

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च नुसार भाव द्यावा आश्वासन देऊनही कर्जमाफी केली नाही त्वरित कर्जमाफी करावी..

महाविकास आघाडीने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित आहे ती कर्जमाफी करावी...

शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा रक्कम द्यावी..

यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच आंदोलन...

धनंजय मुंडे आणि सगळ्यात राज्यकर्त्यांनी शिवाजी संभाजी महाराजांचा जीवन चरित्र वाचावे - संभाजी भिडे

धनंजय मुंडेचं काय, सगळ्याच राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज,संभाजी महाराज जिजामाता आणि शहाजीराजांचे जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे, असं मत संभाजी भिडे, गुरूजी यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामावरून व्यक्त केले.

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी युवासेनेचे महाडमध्ये निषेध आंदोलन

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी रायगडमध्ये युवासेना आक्रमक झाली असून युवासेने आज महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केले.

यावेळी वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वाल्मिक कराड याच्या पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी वाल्मिक कराड याच्या पुतळ्याचे दहन केले.

शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत वाल्मीक कराडचा पुतळा जाळणार

मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड व सर्व आरोपींना तात्काळ फाशी झालीच पाहिजे..

या मागणीसाठी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अलका चौक येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन

शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत वाल्मीक कराडचा पुतळा जाळणार

शिवसेना ही आक्रमक मोठ्या संख्येने शिवसैनिक अलका चौकात

Beed: मराठा समाज आक्रमक, बीडमध्ये जाळपोळ

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ केजमध्ये नागरिक आक्रमक, धारूर चौकात टायर जाळून नागरिकांकडून निषेध

मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक वास्तव दोषारोप पत्रातून समोर आल्यानंतर बीडच्या केज येथे धारूर चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

या संपूर्ण हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी केज मध्ये धारूर चौकात कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही केली .

Latur: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक, संतप्त तरुणांनी धनंजय मुंडे यांच्यासह आरोपींचे फोटो जाळले

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील क्रूरतेन मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूर मध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे...

हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी घ्या..

धनंजय मुंडे यांच्यावर देखील खंडणी आणि 302 चा गुन्हा दाखल करा..

या मागणीसाठी लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळत निषेध व्यक्त केलाय....

तर यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली...

Pune: पुण्यातील खंडोजी बाबा चौकात मराठा सेवक आक्रमक होत आंदोलन करणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणांचे फोटो समोर आल्याने मराठा समाजाकडून आंदोलन 

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी खंडोजी बाबा चौकात करणारा आंदोलन

Pune News: पुणे महापालिकेचा २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार

- ⁠महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले सादर करणार अर्थसंकल्प

- ⁠पुणेकरांवर करांचा नवीन बोजा पडणार का याकडे लक्ष

- ⁠तसेच नवीन केणत्या योजना आणि प्रकल्प पुणेकरांना मिळणार याकडे ही लक्ष

- ⁠महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त मांडत असलेले हे तिसरे बजेट

- ⁠मागील वर्षीचं बजेट ११ हजार ६०० कोटींचे होते

Dhananjay Munde Tweet: राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.

काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.

तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

Supriya Sule: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे ट्वीट 

"ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी केला संताप व्यक्त

वृत्तवाहिन्यांनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो पाहताना किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज येतो. ही घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे."

"याप्रकरणी ज्या शक्तींचा वारंवार उल्लेख होत आहे त्या शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे"

सुप्रिया सुळे यांची ट्विट करत मागणी

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची फक्त ३ शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

ज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

यावर अजित पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी म्हटलं की, मला काही माहित नाही, मला काही प्रश्न विचारु नका.

त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय नाही, सरकार बरखास्त केलं पाहिजे - आदित्य ठाकरे

हे जे फोटो आलेत ते आधी मुख्यमंत्र्याकडे आले नव्हते...

हे सरकार बरखास्त केले पाहिजे...

आपल्याच कार्यकर्त्याला न्याय नाही देऊ शकत असे आदित्य ठाकरे म्हणाले.

करपा रोगामुळे पाने सुकल्याने केळीचे घड खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ झाली आहे तापमान 37º c पर्यंत गेले आहे..

त्यातच वाढले हे तापमान आणि केळी पिकावर आलेल्या करपा रोग यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे..

करपा रोगामुळे केळीचे पाने खराब होत असल्याने घड उघडे पडत आहे...

थेट सूर्यप्रकाश केळीच्या फळांवर जात असल्याने केळी खराब होत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे..

जिल्ह्यात शहादा तालुक्यातील अनेक भागात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचे दिसून येत असून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे...

मात्र एकीकडे केळीला चांगला दर मिळत असताना दुसरीकडे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे...

Beed: बीड बंदसाठी तरुणांच्या शंभरहून मोटरसायकलची बीड शहरांमध्ये रॅली

रॅलीमध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड संदर्भात घोषणाबाजी.

बाजारपेठ बंद करण्यासाठी बीडमध्ये मोटरसायकल रॅली रॅली मधून बंदचे आव्हान

बीडमध्ये तरुण आक्रमक तणावपूर्ण शांतता पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Devendra Fadnvis: देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला

धनंजय मुंडेंना मुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंची राजीनाम्याची केली घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा करणार आहे.

Maharashtra Live Update : धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला; पीए राजीनामा घेऊन सागर बंगल्याकडे रवाना

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे पीए सागर बंगल्यावर राजीनामा घेऊन निघाले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आज राजीनामा देणार आहेत. मुंडेंचे पीएम प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन गेले आहेत.

बीड संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आणि मारेकऱ्यांच्या निषेधार्थ बीडमध्ये नागरिक एकवटले

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली.

आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बीडचे नागरिक एकत्र जमून घोषणाबाजी करण्यात येत आहे.

आंदोलकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी.

Amravati: अमरावतीत राज्य राखीव पोलीस दलाच्या बल गट क्रमांक 9 मधील पोलिसांच्या निवासस्थानांमध्ये चोऱ्या

मध्यरात्री चोरट्यानी जवळपास दहा निवासस्थानी फोडल्याची प्राथमिक माहिती...

चांदुर रेल्वे मार्गावरील SRPF च्या 500 क्वार्टर मधील घटना..

चोरट्यानी लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास;

अमरावतीत पोलीसच असुरक्षित?

ड्रग्ज प्रकरणातील मुंबईतील महिला आरोपी संगीता गोळेंच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

संगीता गोळेला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी , ८ मार्चपर्यंत आता कोठडीत मुक्काम

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट मधील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याने संगीता गोळीच्या कोठडीत वाढ

तामलवाडी टोलनाक्यावर ड्रग्जसह तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं

त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला ताब्यात घेण्यात आले

Nagpur: महायुतीच्या तीन आमदारांना नागपूर खंडपीठाकडून उत्तर सादर करण्याचे निर्देश

- मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने निवडणूक संदर्भात टाकलेल्या याची किंमत महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावत चार आठवड्यात उत्तर देण्याची वेळ दिली आहे...

- यामध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड भाजपचे संजय कुटे, आणि प्रताप अडसड यांचा समावेश आहे.

- यामध्ये त्यांच्या विरोधात उद्धव सेनेकडून आणि काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांकडून ही याचिका टाकण्यात आली आहे.

- निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्तता केली नाही...निवडणूक घेण्याचा निकशाचे पालन केले नाही, निकालानंतर सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर 17 ची मोजणी यासह वेगवेगळ्या विषयांना धरून याचिका टाकण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता..

संतोष देशमुख यांचा मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा केज पोलिसात दाखल होणार..

आधी या प्रकरणात हत्या, खंडणी आणि ॲट्रॉसिटी असे गुन्हे दाखल आहे...

Pune: ‘पीएमआरडीए’ने २०१ अतिक्रमणे हटविली; अजून महिनाभर कारवाई

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व अन्य सरकारी यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून तीन प्रमुख महामार्गांवरील २०१ अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे २० हजार चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला आहे. ही कारवाई महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे.

कोकणात आजपासून शिमगोत्सवाची धुम पहायला मिळणार

रत्नागिरीत आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात होतेय..

जिल्ह्यात सार्वजनिक १,३१२ होळ्या तर खासगी २,८४० होळ्या उभारण्यात येणार आहेत.

आज फाग पंचमीला सर्वत्र पहिली होळी पेटवली जाणार आहे.

ही होळी उभी करून पूजा केली जाणार आहे. होळी पौर्णिमेला ग्रामदेवतेला रूपे लावून पालखी मंदिराबाहेर पडेल.

१४ मार्चला ग्रामदैवतेच्या मंदिराच्या आवारात होम केला जाईल. शिमगोत्सवाचा हा सण काही ठिकाणी रंगपंचमी तर काही ठिकाणी पाडव्यापर्यंत तर काही गावांतून चैत्रीपर्यंत साजरा करण्यात येतो.

मध्यप्रदेश मधून येत असलेला 20 लाख रुपयाचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांच्या ताब्यात

राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा चोरट्या मार्गाने असणल्या जातो..

मध्यप्रदेश राज्यातुन जिल्ह्याच्या सिमा असलेल्या जळगाव जामोद या गावात सातपुड्याच्या जंगल मार्गाने असंख्य वाहणातून आणल्या जातो ..

यावर अन्न औषध प्रशासणाचे पूर्णतः दुर्लक्ष असते..

जळगाव जामोद पोलिसांनी प्रतिबंधित 20 लाख रुपयाचा गुटखा एका बोलेरो पिकअप वाहणातून जप्त केलाय व वाहन चालका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे..

Dhananjay Munde : सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार

फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द करणार

धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर

Pune News: पुणे महापालिका निवडणुकाबाबत आज होणार "सर्वोच्च" सुनावणी

आज राज्यातील रखडलेल्या महापालिका सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार

न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

महापालिका निवडणूक रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सह तब्बल 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट

सर्वोच्च न्यायालयात तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत

प्रभाग रचना, लोकसंख्येत 10टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून याचिका दाखल

Pune Municipal Corporation budget: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर

पुणे महापालिकेचा २०२५- २६ या वर्षाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर होणार

यंदाच्या या अर्थसंकल्पात कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता

पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अहवाल स्थायी समितीकडे सादर करणार

महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे

महापालिका आयुक्तांचे अर्थसंकल्प कोणत्या घटकांवर भर असणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष

रमजान महिन्यानिमित्त अमरावती मध्यवर्ती कारागृहात १५० कैद्यांनी ठेवले रोजे

मुस्लिम बांघवांचा पवित्र रमजान महिना २ मार्चपासून सुरू झाला असून शनिवारी चंद्र दिसल्यानंतर अमरावती मध्यवर्ती कारामृहातील १५० कैद्यांनी रोजे ठेवले..

यात न्यायिक बंदीवानांसह शिक्षा झालेल्या कैद्यांचा समावेश आहे.

कारागृह प्रशासनाने रोजा ठेवणाऱ्या कैद्यांसाठी सेहरी आणि इप्ताकरिता विशेष सोय केली आहे.

इफ्तारच्या साहित्यासह नमाज पठण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

फळे, दू्ध, मिठाई, सुका मेवा, खजूर,अल्पोपाहाराची व्यवस्था रोजा ठेवणाऱ्या कैद्यांसाठी केली आहे.

Ulhas River: उल्हास नदीला ‘जलपर्णीं’चा विळखा,  पाण्यातील ऑक्सिजन घटलं, जलचरांचं अस्तित्व धोक्यात

ठाणे आणि रायगड जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय.

बदलापुरातील एरंजाड, आंबेशिव गावाजवळ उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलीय.

जलपर्णीमुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आलीय.

हेच पाणी बदलापूरसह आसपासच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय.

Ratnagiri: लांजा तालुक्यातील कोंडगाव अंगणवाडीमध्ये अजब प्रकार, गरोदर मातांना पोषण आहारात मिळाला मेलेला उंदीर

स्तनदा आणि गरोदर मातांना देणाऱ्या पोषण आहारात मिळाला मेलेला उंदीर

प्रत्येक महिन्याला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून अंगणवाडीतून होते धान्याचे वितरण

धान्य पुरवठा करणारी कंपनी कोटा मिल कंपनी राजस्थान येथील

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या यंत्रणेकडून घटनास्थळाचा पंचनामा

जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण खात्याकड़ून संबधीत धान्य वितरण ताप्तुरते थांबवा.

Melghat: मेळघाटमधील मोटरसायकलने जात असलेल्‍या युवकावर वाघाचा हल्‍ला, युवकाचा जागीच मृत्यू

मासे विकून मोटरसायकलने आपल्‍या गावी परत जात असलेल्‍या मेळघटमधील आदिवासी युवकावर दबा धरून बसलेल्‍या वाघाने हल्‍ला केला.

यात त्‍याचा मृत्‍यू झाला. चिखलदरा तालुक्‍यातील खोंगडा बीट अंतर्गत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विनोद चिमोटे असे वाघाच्‍या हल्‍ल्‍यात ठार झालेल्‍या युवकाचे नाव आहे. विनोद याचा मासेविक्रीचा व्‍यवसाय होता.

दरम्यान अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी अचलपूर रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली, यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी मृतकाच्या नातेवाईकाचे सात्वन करत त्यांची भेट घेतलीय.

बीड जिल्हा बंदला सुरुवात, बीड शहरातील मुख्य मार्केटमध्ये शुकशुकाट

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर दुकान उघडण्याची कुठेही लगबग दिसत नाही.

मध्यरात्री उशिरा बंदची हाक दिली असली तरी व्यापारी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Buldhana: बुलढाण्यात व्यापाऱ्याला लुटण्याचा कट पोलिसांनी उधळला, 5 दरोडेखोरांना अटक , लाखोंचं मुद्देमाल जप्त

फडणवीस सरकारच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना संरक्षण या उपक्रमा ला अनुषंगून बुलढाणा पोलिसांनी एक उत्तम कामगिरी काल केली आहे.

बुलढाणा येथील एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच दरोडेखोरांना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे.

बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. परिसरात व्यापारी कुठे मोठी रक्कम घेऊन जात आहे का..?

यावर पाळत ठेवून अशा व्यापाऱ्यांना रस्त्यात गाठून त्यांना मारहाण करणे , जखमी करणे अशा घटना घडत होत्या.

मात्र बुलढाणा पोलिसांनी व्यापारी व व्यावसायिकांना संरक्षण देण्याच्या धोरणाअंतर्गत काल अशाच एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

यात संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक

बीड जिल्हा बंद च्या पोस्ट सध्याला सोशल माध्यमांवरती व्हायरल होत आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने पूर्ण होत आहेत या हत्या प्रकरणांमध्ये माणुसकीला काळीमा फासल अशी संतोष देशमुख यांच्या हत्या वेळीचे काही फोटो समोर आले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आले आहे यामध्ये कडकडीत बंद नराधमांच्या कौर्याचा निषेध करू.

एक दिवस कुलूप लावून शासनाचा निषेध करू.

कौर्याच्या विरोधात खडकबंध बीड बंद संतोष अण्णा आम्ही लढूच.

कुर्रता जेर बंद करा फाशी बंद करा बीड बंद करा बीड बंद करा असे काही मुद्दे या मध्ये देण्यात आले आहेत

बीड जिल्हा बंदच्या पोस्ट सध्याला सोशल माध्यमांवरती व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT