मुंबईच्या पाणीसाठ्यात घट
राखीव पाण्यासाठी पालिकेचे राज्य सरकारला पत्र
उन्हाळ्याच्या अखेरीस मोठी पाणीकपात टाळण्यासाठी BMC ची आतापासूनच तयारी
- त्र्यंबकेश्वरसह सप्तशृंगी देवस्थानाला धमकीचा ई मेल
- देवस्थानांना नुकसान पोहोचवण्याच्या धमकीचा ई मेल
- ऐन दिवाळीत धमकीचा ई मेल आल्यानं खळबळ
नक्षलमुक्त गडचिरोलीत पहिली दिवाळी
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचा बिनागुंडा येथे जवानांसोबत दीपोत्सव
एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बिनागुंडात आता दिवाळीचा उत्साह
पोलीस मदत केंद्रामुळे बदलले चित्र
रेल्वे सिग्नलला फटाक्यांमुळे आग; विरार-चर्चगेट लोकल सेवा विस्कळीत
विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे सिग्नलला फटाक्यांमुळे आग लागल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहेत.
सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला असून, अनेक कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास लेटमार्क लागला आहे
डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला आहे .
चिखला येथील समुद्रकिनाऱ्यालगत तब्बल 40 फूट लांब व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला
या मृत अवस्थेतील व्हेल माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .
समुद्रातील पाण्याला आलेल्या भरती सोबत हा मृत व्हेल मासा समुद्रकिनाऱ्यावर आल्याची माहिती समोर आली आहे.
रात्री दहा साडेदहा वाजता च्या सुमारास गौरीपाडा या परिसरात तळ अधिक एक मजली चाळ असलेल्या इमारती लगत असलेल्या भंगार गोदामात सुरुवातीला आग लागली.
त्यानंतर आग झपाट्याने वाढत गेल्यानंतर पहिल्या मजल्यावरील घरापर्यंत पोहोचली.
त्यामुळे या आगीमध्ये या चाळीतील पाच खोल्या जळून खाक झाल्या आहेत
बारामती शहर पोलिसांनी इंदापूर रोडवरील मार्केट यार्ड परिसरात छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या औषधी इंजेक्शनचा अनधिकृत विक्रीसाठी साठा बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी चार जणांना दोन मोटारसायकलींसह ताब्यात घेतले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन संकुलातील 'कार्लाय' या १७ मजली इमारतीला रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास भीषण आग लागली. आठव्या मजल्यावर लागलेली आग अवघ्या काही वेळात चौदाव्या मजल्यापर्यंत पसरली
घटनेची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटाक्यांच्या संदर्भात कठोर नियमावलीचे निर्देश दिले.
ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत आतिशबाजी करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.