Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Marathi Breaking Live Headlines Updates: शेतकरी मोर्चा, गोकुळ राजकारण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, दिवाळीला सुरूवात, महाराष्ट्र दुष्काळ, चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Nagpur: मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टराला मारहाण, तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नागपूर

- मेयो रुग्णालयात निवासी डॉक्टराला मारहाण झाल्याची पुन्हा एक घटना समोर आलीय. तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

- गंभीर रुग्णावर आधी उपचार सुरू केल्याने दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. समीर चांदेकर यांची कॉलर पकडून खाटेवर ढकलले, ठोसेही मारल्याचा आरोप

- मेयो रुग्णालयात आधी तपासण्याच्या आग्रहावरून डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये वाद घातला.

- मेयोचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडून घटनेची गंभीर दखल घेत तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय..

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई

यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई

यवतमाळ जिल्ह्यात या वर्षीच्या जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 31 कोटी 58 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

यापैकी शेती पिकाच्या नुकसानीसाठी 30 कोटी दोन लाख रुपये तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एक कोटी छप्पन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

Akola: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

दुष्काळामुळे अकोला शहरात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष असतानाही महापालिकेचा कारभार काही करता सुधरायचे नाव घेत नाहीय.

अनेक ठिकाणी खोदकामामुळे महापालिकेची पाणीपुरवठा पाईपलाईन फुटण्याच्या घटना दररोज घडत आहेत.

काल रात्रीही अकोला शहरातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली.

खोदकाम करताना ही पाईपलाइन फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं.

Dharashiv: धाराशिवच्या कुंथलगिरी पेढ्याची मागणी वाढली, ५ महिन्यात दरात १०० रुपयांची वाढ

धाराशिव -

धाराशिवच्या कुंथलगिरी पेढ्याची मागणी वाढली

पाच महिन्यात दरात १०० रुपयांची वाढ

एफडीएच्या धडक कारवायांमुळे अस्सल खवा पेढ्याला अच्छे दिन

दूध उत्पादकांना दिलासा

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

पुणे -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंदोलनविरोधी परिपत्रकावरून विद्यार्थी संघटना आक्रमक

कुलगुरूंची गाडी अडवण्याचा विद्यार्थ्यांनी केला प्रयत्न

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर कुलगुरूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न, यावेळी विद्यार्थी आक्रमक

परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांचे आंदोलन सुरू

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परिपत्रक रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याचा संघटनांचा आरोप

विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा दावा

Pune: पुण्यात आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुण्यात शक्तीप्रदर्शन

पुणे- पुण्यात आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुण्यात शक्तीप्रदर्शन

उच्च शिक्षण संचालनालयावर धडक मोर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

Thursday Horoscope : पैशाचे व्यवहार करताना सावध राहा! ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल, वाचा आजचे राशीभविष्य

ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; ठाकरे गटाच्या शाखेला शिवसैनिकांनी ठोकले टाळे?

SCROLL FOR NEXT