मुंबई -
मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याविरोधात आज ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार
आज मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात "गर्जना" मोर्चाचे आयोजन
'मेट्रो सिनेमा' ते 'बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय' असा निघणार
मोर्चेला "गर्जना" असं नाव देण्यात आलं असून पोस्टर वर राजकीय पक्षांचे चिन्ह नाही
लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी "गर्जना", ठीक ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर वर इतकाच मजकूर
जळगाव -
चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर
सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बैठक
त्यानंतर एरंडोल तालुक्यातील दुष्काळ भागाचे पाहणीसाठी निघणार आहे
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट व प्रश्न जाणून घेणार
दुपारी एक ला धुळ्याला करावा लागतो होणार आहे
अमरावती -
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अशोक वामन हिवाळे, दिलीप भिमराव कडू आणि आशिष मनोहर अंबुलकर यांनी अपक्ष म्हणून, तर गाजी मोहम्मद जाहेरोश यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, आतापर्यंत सात व्यक्तींनी १५ उमेदवारी अर्जांची उचल केली आहे. ६ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून, त्यामुळे अखेरच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी लगबग पाहायला मिळणार आहे
सोलापूर -
उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात ; दोन दिवसात अहवाल राज्य सरकारला पाठवणार
उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसीलदार,तलाठी,कृषी अधिकारी शेतीचे पंचनामे करण्यासाठी बांधावर दाखल..
उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश खरीप पीक झाली आहेत मातीमोल,
पाण्याविना तूर पिकाची वाढ खुटली
शेतीच्या दाहक परिस्थितीचा पंचनामा करून अधिकारी घेतायत आढावा
उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर भागातील शेतीचा पंचनामा सुरु असताना लवकरातलवकर शासनाकडून मदत मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा
भुसावळ -
भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी
भुसावळ शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रात्रीची तपासणी मोहीम राबविण्यात आली.
बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर पोलिस कर्मचारी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांची कसून चौकशी केली.
नागपूर -
- नागपूरच्या वानाडोंगरीत ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा
- चार दरोडेखोरांनी दुकानाचे शटर आतून बंद करून बंदुकीच्या धाकावर लुटले दागिने
- हिंगणा मार्गावरील ढोमणे ज्वेलर्समध्ये दुपारच्या सुमारास दरोडा
- मोटारसायकलवरून आलेल्या चार दरोडेखोरांचा दुकानात प्रवेश
- शटर बंद केल्यानंतर एका दरोडेखोराने कर्मचाऱ्यावर बंदूक रोखली
- सोन्या-चांदीचे दागिने आणि कर्मचाऱ्याचा मोबाईल बॅगेत भरून दरोडेखोर फरार
नागपूर -
- नागपुरात मंगळवारी जवळपास डझनभर पाण्याच्या टाक्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार
- पाईपलाईन स्थलांतर आणि फ्लो मीटर बदलण्यासाठी 36 तासांचा शटडाऊन
- पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्रात 6 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजल्यापासून शटडाऊन
- 7 ऑक्टोबरला रात्री 10 वाजेपर्यंत 36 तासांचा शटडाऊन राहणार
- मानकापूर नाल्याजवळ 1400 बाय 1400 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या स्थलांतराचे काम
मुंबई -
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा
सकाळी १० वाजता मोर्चाला होणार सुरूवात
मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा
मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयाजवळ होणार सांगता सभा
पुणे -
राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार
आजचा मुंबईतील मोर्चा झाल्यानंतर राज ठाकरे हे पुण्याकडे रवाना होणार
उद्या सोमवार सकाळी ते एमपीएससीचे विद्यार्थी जे उपोषणाला बसले आहेत त्यांची भेट घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत.
तरी पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी व उपस्थित रहावे.
नवी मुबंई -
बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दहाचाकी ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जी-२, नवी मुंबई-ठाणे विभागाने धडक कारवाई केली.
या कारवाईत ६०० बॉक्स बनावट देशी दारू तसेच दहाचाकी ट्रक असा एकूण ४४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.