Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: सातारा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना दिवाळीच्या तोंडावर पदोन्नतीची भेट

Marathi Breaking Live Headlines Updates: नाशिक महाकुंभमेळा, देवेंद्र फडणवीस, महायुतीत ठिणगी, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग, हवामानाचे अपडेट, अर्णब चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

सातारा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना दिवाळीच्या तोंडावर पदोन्नतीची भेट

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण ४६ पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विविध पदांवर पदोन्नती जाहीर केली आहे. यामध्ये २४ सहायक पोलीस उपनिरीक्षकांना 'श्रेणी पोलीस उपनिरीक्षक' ११ पोलीस हवालदारांना 'सहायक पोलीस उपनिरीक्षक' आणि ११ पोलीस नाईक व शिपायांना 'पोलीस हवालदार' पदी बढती देण्यात आली आहे.

बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ

पावसाने दडी मारल्या नंतर देखील टोमॅटोचे उत्पादन घेऊन बाजारात टोमॅटोला भावच मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरटेक येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत, पावसाने मारलेली दडी आणि वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो वेळेआधीच पिकून खराब होत आहेत, त्यातच व्यापाऱ्यांकडून टोमॅटोला अवघा 7 ते 8 रुपये प्रतिकिलोचा नीचांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे,

नांदेडमध्ये भाजपातर्फे काँगेस विरोधात भव्य रॅली

नांदेडमध्ये भाजपाच्या वतीने काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.नांदेड शहरातील वर्कशॉप ते महात्मा फुले चौका पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. लोकशाही बचाव, अराजकता हटाव अभियाना अंतर्गत हे आंदोलन करण्यात आले.या रॅलीत तिरंगा झेंडा घेऊन मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.जिल्ह्यातील भाजपाचे नेते देखील रॅलीत सहभागी होते. रॅलीत काँगेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.महात्मा फुले चौक येथे सभा घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला.

भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रकरणाची तपासणी सुरू

नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांनी भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण आपण वनमंत्री होण्यापूर्वीचे असून, या प्रकरणाची सध्या तपासणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जास्तीत जास्त झाडे कशी वाचवता येतील आणि त्या बदल्यात आणखी झाडांची लागवड कशी करता येईल, यावर विचार सुरू असल्याचेही नाईक म्हणाले.

चाकणमध्ये वाहतूककोंडीचा कहर! सकाळी ७ तासांच्या कोंडीनंतर सायंकाळी पुन्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा

चाकण औद्योगिक वसाहतीत वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी तब्बल सात तास वाहतूककोंडीत अडकल्यानंतर सायंकाळी पुन्हा पुणे-नाशिक आणि चाकण-तळेगाव महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दिवसभराच्या या वाहतूककोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले असून, वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पुजा केली आणि दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची हजेरी; नागरिकांना दिलासा

छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज दुपारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदाचा पावसाळा बहुतांश कोरडा गेल्याने नागरिकांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नाशिकच्या गोदा काठावर महाआरती 

नाशिकच्या गोदा काठावर महाआरतीला सुरुवात झाली आहे. ही आरती आदिवासी बांधवांच्या हस्ते होणार आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात १२वा आरोपी अमरला अटक

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील १२वा आरोपी अमरला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आज त्याला मुंबईतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अमरला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधात 'जनमहाभियोग'

अभिरूप संसदेच्या अध्यक्षापदी मिरा कुमारी

अभिरूप संसदेत प्रियंका गांधी, खरगे हजर

लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतोय - खरगे

सोलापुरात AI डेटा सेंटरच्या समर्थनार्थ GEN Z तरुणाई रस्त्यावर; भव्य जनसमर्थन मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापुरात AI डेटा सेंटरच्या समर्थनार्थ भव्य जनसमर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात GEN Z तरुणाईसह मोठ्या संख्येने सोलापूरकर सहभागी झाले होते. 'आमचा आवाज विकासासाठी, आमचा आवाज सोलापूरसाठी' या घोषवाक्याखाली मोर्चा काढण्यात आला. AI डेटा सेंटरच्या समर्थनार्थ तरुणाईचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे देखील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे आगमन... 

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे कुशावर्त तीर्थ येथे उपस्थित राहिले आहेत

Kolhapur: राज्यात ऊस आंदोलनाचा भडका उडणार

कोल्हापूर - राज्यात ऊस आंदोलनाचा भडका उडणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील राष्ट्रीय मार्ग बेमुदत रोको आंदोलन

ऊस दरा संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

राज्यातला सर्व साखर कारखान्याच्या बाहेर छावण्या लावून साखर कारखान्याकडे येणारे ट्रक आणि ट्रॅक्टर रोखले जाणार

राज्य सरकारला जशास तसे उत्तर देणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा इशारा

4,500 रुपये दर द्यावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Pune: शिवाजीनगर न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घालणं भोवले, ९ जणांविरोधात गुन्हा

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घालणं भोवले

पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुनावणी सुरु असताना जिल्हा न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांना धक्काबुक्की, बेकायदा जमाव जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा केला दाखल

Pune: शरद पवार करणार ३ जिल्ह्यांचा दुष्काळ दौरा

पुणे -

शरद पवार करणार दुष्काळ दौरा

पुढील ३ दिवसांमध्ये ३ जिल्ह्यांचा शरद पवार करणार दौरा

शरद पवार यांचा उद्यापासून दुष्काळी दौरा सुरू करणार

सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा करणार दौरा

शरद पवार बांधावर जाऊन साधणार शेतकऱ्यांशी संवाद

Pandharpur: सांगोल्यात वीजेसाठी शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

पंढरपूर - सांगोल्यात वीजेसाठी शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

आधीच दुष्काळामुळे पिके जळू लागली आहेत, त्यात वीज टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे.

शेतीपंपाला नियमित आणि पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने पिके वाचवायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Nagpur: नागपूरमध्ये कमी मतदार नोंदणीसाठी पक्षातील काही नेते जबाबदार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचा पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

- या पराभवामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची खदखद आणि पक्षातील अंतर्गत धसुफुस आता बाहेर येऊन राहिली आहे.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात पदवीधरांची नोंदणी करण्याची चांगली संधी असताना अतिशय कमी मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप भाजप पदाधिकारी आणि नेते ओमप्रकाश यादव यांनी केला आहे.

- कमी मतदार नोंदणीसाठी पक्षातीलच काही नेते जबाबदार असल्याचाही आरोप ओमप्रकाश यादव यांनी केलाय.

Nashik: कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी आलेल्या म्हणतांनी दुष्काळासंदर्भात व्यक्त केली खंत

त्र्यंबकेश्वर - कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी आलेल्या म्हणतांनी दुष्काळासंदर्भात व्यक्त केली खंत

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करण्याची महंतांनी केली प्रार्थना

साधुमंतांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी मोठ्या संख्येने साधू-महंत या सोहळ्याला उपस्थित होते

Hingoli: हिंगोलीतील अग्नीकांडात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना शिंदेसेनेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत 

हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ३ जणांंच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली.

आगीत होरपळून अविनाश बांगर, आकाश सांगळे, आणि दिलीप दोडके यांचा मृत्यू झाला होता

अग्निकांडात मृत्यूमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील एका सभेत ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

ही मदत आज आमदार संतोष बांगर यांनी आज मृतांच्या कुटुंबीयांना सपूर्त केली.

Mumbai:  कुंभमेळा मधील वारेमाप खर्च आवरा, मनसे आक्रमक

कुंभमेळा मधील वारेमाप खर्च आवरा, मनसे आक्रमक

महाराष्ट्रात दुष्काळ स्थिती असताना कुंभमेळावरील अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही

कुंभमेळ्याला विरोध नाही पण होणाऱ्या अतिरिक्त खर्चाबाबत मनसेकडून प्रश्न उपस्थित

जर आम्ही दुष्काळ परिस्थितीमुळे रोषणाई आणि आतिषबाजी रद्द करू शकतो तर कुंभमेळामधील अतिरिक्त खर्च सरकार का रद्द करू शकत नाही?

मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला प्रश्न

Mumbai: अखेर अधिकृत रित्या मनसेची शिवाजी पार्क येथील रोषणाई रद्द

अखेर मनसेची शिवाजी पार्क येथील रोषणाई रद्द

महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीमुळे मनसेने घेतला निर्णय

लहान पक्ष असला तरी रोषणाई आणि अतिशबाजी यावर्षी करणार नसल्याबाबत मनसेची घोषणा

शिवाजी पार्क येथे केवळ कंदील लावून साधेपणानं दिवाळी साजरी केली जाणार असल्याचं किल्लेदार यांचं म्हणणं

राज्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर

राज्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर

उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्याला आम्ही सुरुवात करतोय

आरोग्य संवाद यात्रेला उद्यापासून राज्यभरात सुरुवात

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची कोल्हापुरात घोषणा

लातूर शहरात कुरियर घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये मोठा स्फोट

लातूर शहरात उमाटे कुरियर या ठिकाणी कुरियर चे पार्सल घेऊन आलेल्या टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, दहशतवादी विरोधी पथक दाखल झाल आहे...

समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा वैजापूर - गंगापूर तालुक्यातील इशारा

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये 100 टक्के पाणीसाठा असताना आवर्तन सोडले जात नसल्यावरून वैजापूर - गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक

समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती महामार्ग असून, त्यावर रास्ता रोको केल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ त्यामुळं परवानगी नाकारली

समृध्दी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू नये, आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन अथवा अपप्रेरणा देऊ नये, तसेच दगडफेक किंवा इतर स्वरूपाचे बेकायदेशीर कृत्य करू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पुण्यात चोरट्यांचा अजब प्रताप,झाडांच्या कुंड्याच चोरून नेल्या

पुण्यात चोरट्यांचा अजब प्रताप,झाडांच्या कुंड्याच चोरून नेल्या

पुण्यातील वाघोली-लोहगाव रोडवर चोरीची अजब घटना समोर आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरट्याने लाँड्री दुकानासमोर ठेवलेल्या झाडांच्या कुंड्या चोरून नेल्या. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारमधून उतरून कुंड्या गाडीत ठेवत चोरटा पसार झाला. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून चोरट्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ठाण्यात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' पदयात्रा

ठाण्यात भाजपची 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' पदयात्रा

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः उतरणार रस्त्यावर

रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार हजारोंचा मोर्चा

उद्या 1 नोव्हेंबरला परमार्थ निकेतन येथून पदयात्रेचे नियोजन

भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते होणार सामिल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज नाशिकमधील ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विमानतळावर प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली होती. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या आगमनामुळे विमानतळ परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

- हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

- अर्ध्या तासाने झाली रेल्वे सुरळीत

- हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या काही वेळापासून ठप्प झाल्या होत्या.

- ओव्हरहेड वायरवर कपडा पडल्याने बिघाड झाल्याने ही वाहतूक खोळंबली होती

- पनवेल ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या सध्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.

- आता प्रशासनाच्या वतीने ही त्रुटी दूर करून रेल्वे पुन्हा सुरू झाल्या..

वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल.

सचिन भोईटे नावाच्या व्यक्तीला दमदाटी करत असल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये कथित दावा.

फोन रेकॉर्ड करण्यास सांगत शिवीगाळ केल्याचेही संभाषणात ऐकू येत असल्याचा दावा.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे पुण्यात चर्चेला उधाण

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही शिवसेनेत राजकारण तापलं

-नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही शिवसेनेत राजकारण तापलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच शासकीय रुग्णालयाचे ठाकरेच्या शिवसेनेने केले उद्घाटन.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन केलेली कोनशीला हटवल्याने ठाकरे सेना आक्रमक.

अंकीसा धान्य खरेदी केंद्रात मोठा गैरव्यवहार उघड, 4 गोदामे सील, फौजदारी कारवाईचा इशारा

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील अंकीसा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान्य खरेदी केंद्रात मोठा घोटाळा समोर आला आहे.

जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी 26 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर प्रशासनाने तात्काळ पथक अंकीसा येथे पाठवले.

शिंदे गटाच्या आमदाराला भाजपचा खणखणीत इशारा

शिंदे गटाच्या आमदाराला भाजपचा खणखणीत इशारा....

आमच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करा...

भाजप नेत्या हिना गावितांचा शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींवर आक्रमक पलटवार...

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर हायकोर्टाचे महापालिका आणि राज्य सरकारला खडेबोल

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर हायकोर्टाचे महापालिका आणि राज्य सरकारला खडेबोल

मुंबईसह परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश.

महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडावे, असे न्यायालयाने सुनावले.

प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार आणि संबंधित यंत्रणांचे काम प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे, असे न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण.

दिवाळी सुट्टी आणि विकेंडचा फटका; चाकण औद्योगिक वसाहतीतील महामार्गांवर वाहतूककोंडी

चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक आणि चाकण-तळेगाव महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर भल्या सकाळपासून वाहतूककोंडी निर्माण झालीय.

दिवाळी सुट्टी, विकेंड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाहनांचा मोठा ताण वाढलाय.

नाशिक त्रंबकेश्वर येथे आकर्षक फुलांची सजावट आली करण्यात

नाशिक त्रंबकेश्वर येथे आकर्षक फुलांची सजावट आली करण्यात

दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी कुशावर्त या ठिकाणी धर्म ध्वजाचे करण्यात येणार आहे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची देखील कुशावर्त या ठिकाणी असणार उपस्थिती

कुंभपर्वास आज ध्वजारोहणाने होतेय सुरुवात

कुंभपर्वास आज ध्वजारोहणाने होतेय सुरुवात...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार थांबलेल्या हॉटेल गेट वे ला छावणीचे स्वरूप..

बॉम्बशोध पथक, श्वान पथकाद्वारे हॉटेल बाहेर होतेय वाहनांची तपासणी...

थोड्याच वेळात उपमुख्यमंत्र्यांची होणार ओझर विमानतळाकडे मुव्हमेन्ट.

कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु..

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल

- वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल..

- महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

- सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलामांन्वये गुन्हा दाखल

Pune : लँडमार्क सोसायटीच्या गोदामावर गुन्हे शाखेचा छापा

लँडमार्क सोसायटीच्या गोदामावर गुन्हे शाखेचा छापा;

पावणेदहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

एकाला अटक : समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निलेश राणेंच्या ‘लायकी’च्या टीकेला नवनाथ बन यांचे उत्तर

निलेश राणेंच्या ‘लायकी’च्या टीकेला नवनाथ बन यांचे उत्तर

ज्युनियर नवनाथ बन विथ सिनिअर राणे साहेब!

हॅशटॅग लायकी वापरत निलेश राणेंना जोरदार टोला लगावला

नारायण राणेंसोबतचा फोटो पोस्ट करत दिलं सूचक प्रत्युत्तर!

यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळावर शिक्कामोर्तब

यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळावर शिक्कामोर्तब

यवतमाळ जिल्ह्याची पैसेवारी 44% टक्के

शेतातील पिकांची स्थिती चिंताजनक

रायगडच्या दिवेआगर ग्रामपंचायतमधील वाद चव्हाट्यावर

रायगडच्या दिवेआगर ग्रामपंचायतमधील वाद चव्हाट्यावर

बड्या उद्योगपतीच्या रिसॉर्ट असेसमेंट वरुन दोघांमध्ये वादाची ठिणगी

परस्पर विरोधी गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery: नाशिकमध्ये हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, प्राईन लोकेशनवर घ्या म्हाडाचे घर; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

Maharashtra News Live Update: पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन

तांदळाचे पाणी झाडांवर घालू शकतो का?

एक दिवशी हातपाय मोडेन; भाजप आमदार सुरेश धसांची जरांगेंच्या समर्थकाला धमकी, कथित ऑडिओने बीडमध्ये खळबळ|VIDEO

गोकुळ पाठोपाठ आता वारणाचेही दूध महागलं; कधीपासून लागू होणार नवे दर? किती रुपयांनी महागनार?

SCROLL FOR NEXT