Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Marathi Breaking Live Headlines Updates : मल्लिकाअर्जुन खरगे यांच्याविरोधात काँग्रेसचे देशभर आंदोलन, मनोज जरांगेंच्या ऑडिओ बॉम्ब, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग, हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मावळ्यातील रिंग रोडला शेतकऱ्यांचा विरोध, गावोगावी कोपरा बैठका सुरू

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला मावळ.निसर्गाची समृद्धी, सुपीक जमीन आणि शेतीच्या जोरावर उभं राहिलेलं शेतकऱ्यांचं जगणं! पण याच मावळच्या जमिनीवर आता ६५ मीटर रुंदीच्या इनर रिंग रोडचं संकट घोंगावू लागलंय.विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असतील, तर हा विकास नेमका कुणासाठी. रस्ता वाहतुकीसाठी की शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घालण्यासाठी असा थेट सवाल आता मावळमधील शेतकरी उपस्थित करत आहेत.

दुष्काळामुळे धाराशिव जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांची चारा नसल्याने मोठी अडचण

धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईचा तर संकट आहेच,त्याच बरोबर पशुपालक शेतकऱ्यांना पुढील काळात चारा टंचाईचे ही संकट मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. जिल्ह्यात डिसेंबर पर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने शेतकरी आतापासूनच शेतात मिळणारा चारा साठवून ठेवत आहे.असाच मकाचे पीक शेतकरी घेतो पण पीक निघाल्यानंतर याची मकाची कणसे बाजूला करून चीफाड फेकून देत असतो पण यावर्षी या मकावनाचेही चारा शेतकरी गोळा करून जनावराच्या चाऱ्याची तजवीज करून ठेवत आहे.आता हाय तेवढे तर जनावराला देतोय पण पुढील काळात काहीच नसणार,जनावर मरण्यापेक्षा या चाऱ्याला मिठाचे पाणी मारून हा चारा जनावराला देता येईल यासाठी ही धावपळ करत असल्याचं कळंब तालुक्यातील ईटकुर परीसरातील शेतकरी सांगत आहेत.

रेती तस्करीवर महसूल-पोलिसांचा दणका! १.२० कोटींचे सहा टिप्पर जप्त..

अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत तब्बल १ कोटी २० लाख रुपये किमतीचे सहा टिप्पर जप्त केले आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास सिनगाव जहागीर ते खल्याळ गव्हाण मार्गावरील धरणाच्या बुडीत क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. जाफराबाद तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाला गस्तीदरम्यान नऊ टिप्पर आढळून आले. त्यानंतर जाफराबाद आणि देऊळगावराजा तहसीलदारांच्या समन्वयातून महसूल व पोलिसांनी संयुक्त तपासणी केली. यावेळी सहा टिप्पर जप्त करण्यात आले. यामध्ये एका भारतबेंझ टिप्परसह पाच विनानंबर टिप्परचा समावेश आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात सहा टिप्परच्या संबंधित मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांविरोधातील तक्रारींचे प्राधिकरण कधी सुरू होणार?

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांविरोधातील तक्रारींच्या प्राधिकरणाबाबत गृह विभागाकडे माहिती मागितली आहे. हे प्राधिकरण कधी सुरू होणार आणि रिक्त पदे कधी भरली जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्राधिकरणातील अध्यक्षपदासह इतर काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्राधिकरणाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही.

प्राधिकरणाची सध्याची स्थिती काय आहे आणि रिक्त पदे कधी भरली जाणार, याबाबत उच्च न्यायालयाने गृह विभागाकडून माहिती मागवली आहे.

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाकाली रोड परिसरात भरधाव वेगाने टँकर चालवणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या मोठा अपघात

पहाटे साडेचार च्या सुमारास एमआयडीसी महाकाली रोड परिसरात हा भीषण अपघात

अपघाताच्या संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद

14 वर्षीय अल्पवयीन मुलगा पाण्याच्या टँकर चालवताना टँकर वरून त्याचा ताबा सुटला आणि थेट पहाटे 4:30 च्या सुमारास रस्त्यावर उभी असलेली कार आणि इमारतीच्या भिंतीला दिली जोरदार धडक

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीपूर्वीच भेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका

दिवाळीत अन्नपदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी FDA ने छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा एमआयडीसी भागातील मसाले निर्मितीचा कारखाना, जाधववाडी मोंढ्यातील बॉम्बे ड्राय फ्रूट्स अँड मसाला, पंढरपूर येथील ओम श्रीनाथ इंडस्ट्रीज ऑईल रिपॅकिंग युनिट आणि जुना मोंढा येथील जय मिश्री ट्रेडर्स या चार मोठ्या कंपन्यांवर छापा टाकला. या कारवाईत १९ लाख ४४ हजार ९६९ रुपयांचा तेलाचा साठा तर २ लाख २७ हजार ७०० रुपयांचे मसाले आणि खोबऱ्याची पावडर असा एकूण २१ लाख ७२ हजार ६६९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पथकांनी केलेल्या तपासणीत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एल. एम. स्पायसेस मसाला उत्पादन कारखान्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणारी धणे पावडर आणि मिरची पावडर दिसून आली. कारखान्यात बनवलेले मसाले भेसळयुक्त आणि चुकीचे ब्रँड लावले असल्याचा संशय आल्याने भेसळयुक्त मसाल्यांचा २४६ किलोचा साठा जप्त करण्यात आला. या मसाल्याची किंमत ९८ हजार ४०० रुपये असून तो संबंधित विक्रेत्याच्या सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे. मसाल्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

भाजपकडून आज देशव्यापी आंदोलनाची हाक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत पाटणा येथील कार्यक्रमात खरगेंकडून वादग्रस्त टिप्पणी

देशातील सर्व राज्यांतील भाजप प्रदेश कार्यालयांबाहेर आंदोलनाची हाक

पाटणा येथील भाजप कार्यालयासमोरून आंदोलनास होणार सुरुवात

पुण्यातील मध्यवर्ती भागात दिवाळीपर्यंत अवजड वाहनांना असणार बंदी

शनिवार आणि रविवारची परवानगी देखील करण्यात आली रद्द: पुण्यातील सर्व पेठातील रस्त्यांसह प्रमुख मार्गांचा करण्यात आला यात समावेश

पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता,बाजीराव रस्ता,लक्ष्मी रस्ता यासह प्रमुख रस्त्यावर शनिवार आणि रविवारी अवजडवाहनांना असलेली वाहतुकीची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने घेण्यात आला निर्णय

इम्रान खान प्रकरणात आज सुनावणी

आज अभिनेता इम्रान खान याने देश सोडून जायचे का या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार

अभिनेता इमरान खान सीजेपी च्या समर्थनार्थ मुंबईत पुकारलेल्या आंदोलनासाठी आला होता

यावेळी पोलिसांनी काही वेळ त्याला ताब्यात घेतले आणि सोडून दिले

मात्र त्यानंतर इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून ते अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे त्याने 28 ऑक्टोबर पर्यंत देश सोडून जावे अशी नोटीस मुंबई पोलिसांनी दिली होती

त्यानंतर इमरान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

- विमानतळावरील आरायव्हल परिसरात उभे राहण्याच्या कारणावरून महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान आणि काही नागरिकांत वादाला सुरवात झाली

- वाद वाढतच गेला आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने शिवीगाळ केल्याचा आरोप

- शिवीगाळ का केली याचा जाब विचारल्यावर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जावनाने नागरिकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली

- मारहाण झालेल्या नागरिकांत काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे

- मारहाण झालेल्यांमध्ये ऑटोरिक्षा चालक असून चहा पिण्यासाठी चहा-स्टॉल वर थांबल्यावर वाद झाल्याची माहिती

- या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान विरोधात सोनेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फळचोरीच्या संशयावरून तरुणाला विवस्त्र करून मारहाण; अँटॉप हिल परिसरातील कथित व्हिडिओ व्हायरल

Diwali Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईचं टेन्शन सोडा! वापरा या सोप्या 7 टीप्स, कमी वेळेत घर होईल स्वच्छ

Famous Actress : गुडन्यूज! प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म; नाव काय?

पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेना कुणाची? सुनावणी लांबणीवर; २३ नोव्हेंबरला होणार युक्तिवाद

Gauri Kulkarni: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचं लिंबू रंगाच्या साडीतील बोल्ड फोटोशूट

SCROLL FOR NEXT