Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये सीजेपीची आज संविधान बचाव रॅली

Marathi Breaking Live Headlines Updates: नागपूरमध्ये सीजेपीचा संविधान मोर्चा, अभिजीत दीपके, पुण्यात तरुणावर गोळीबार प्रकरण, राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर, राज्यात थंडी कमी झाली, संजय राऊत, डिलिमिटेशन बिल, शरद पवार, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Priya More

Nagpur: नागपूरमध्ये सीजेपीची आज संविधान बचाव रॅली

संविधान दिनानिमित्त नागपुरातील संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने ‘संविधान बचाव’ रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका या कार्यक्रमातून लोकशाही, संविधानिक मूल्यांचं संरक्षण आणि निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.

Pune: पुण्यात आठव्या दिवशी अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

पुण्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

आठव्या दिवशी १ लाख ३७ हजार चौरस फुटावरील अतिक्रमण काढले

शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने उगारलेला कारवाईचा बडगा आठव्या दिवशीही कायम राहिला.

Pune: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुक्याची चादर, पिकांवर रोगराई

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुक्याची चादर

जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात भल्या पहाटेपासून धुक्याची चादर पसरलीय.

दिवसा उन्हाचा कडाका, रात्री थंडी आणि पहाटे धुकं अशा बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता वाढली.

तर नागरिकांनाही साथीच्या आजारांचा धोका निर्माण झालाय.

Nagpur: विदर्भात पुढील 10 दिवस थंडीचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज

- विदर्भात पुढील दहा दिवस थंडीचा प्रभाव अधिक राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज.

- नागपूरसह विदर्भातील आठ जिल्ह्यांना थंडीचा जोरदार तडाखा बसणार.

- नागपुरात किमान तापमानाची १३.२ अंश सेल्सिअस नोंद.

- नोव्हेंबरच्या अखेरच्या दोन दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता.

- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही थंडी कायम राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज, ५ राज्यांना इशार; ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

Thruesday Horoscope : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील; ५ राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा गुरुवारचे राशी

Mumbai Firing: मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानावर 5 राउंड फायर; गोळीबाराच्या घटनेने माहीम परिसरात खळबळ

समाजकल्याण विभागात फाईलींचा रेट 5 कोटी; संजय राऊतांचा शिंदेसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

महाराष्ट्रभर UPSC-MPSC अभ्यासिका, परभणीतील शाळेला १ लाखांची मदत; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दिलेला शब्द पाळला!

SCROLL FOR NEXT