Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर चर्चा, ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी सक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज अहेरी तालुक्याचा सखोल दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला. सकाळी प्राणहिता पोलीस मुख्यालयापासून दौऱ्याला सुरुवात करून त्यांनी महिला व बाल रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. डॉक्टरांची रिक्त पदे, फायर आणि विद्युत सुरक्षा ऑडिट, छताची गळती याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अहेरीतील रक्त संकलन युनिटला मान्यता मिळाली असून ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर आलापल्लीतील पूर प्रतिबंधक संरक्षण भिंत आणि नाला सरळीकरण कामांची पाहणी केली. ताटीगुडम गाव आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयालाही भेट देऊन योजनांचा आढावा घेतला.

कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

कांद्याला सध्या बाजारभाव मिळत असतानाच नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर बाजारपेठांमध्ये पाठवला जात असल्याच्या निर्णयाला नाशिकच्या येवल्यात शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे.मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्यास कांद्याचे दर पुन्हा घसरण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असा आरोप संघटनेने केला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देत नाफेडचा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत न पाठवता परदेशात निर्यात करावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी वाढलेले साखरेचे दर आणि टोमॅटोच्या घसरलेल्या बाजारभावाबाबतही शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला.

चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव टोलनाक्याजवळ ता. २४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. पाठीमागून आलेल्या कारने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने एका कारचा ताबा सुटून ती थेट पुलाखाली जाऊन अडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये लेटर वॉर

पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे सभागृहातील वार संपल्यानंतर आता लेटर वॉर सुरू झाले आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना निधी व समित्यांमध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे तशी मागणी केली होती.आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तनावर भाजपचा थेट आक्षेप आहे.

Raigad: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या रायगड दौऱ्यावर

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर

आदित्य ठाकरे करणार मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी

रायगडमधील डोलवी येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार असून पुढे नागोठणे, इंदापुर, माणगाव बायपास येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी ते दौऱ्यात करणार आहेत.

गणेशोत्सव सणापूर्वी मुंबईकडून गावी येणाऱ्या कोकणवासीयांसाठी महामार्ग सुस्थितीत व्हावा यासाठी अनेक नेत्यांनी या आधी महामार्गाची पाहणी केली आहे.

त्यानंतर उद्या आदित्य ठाकरे देखील पाहणी करणार आहेत.

Nandurbar: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

नंदुरबार -

ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीसाठी पोलीस दलाकडून 300 पोलीस कर्मचारी आणि 16 अधिकाऱ्यांची असणार नियुक्ती

कुठली निश्चित घटना घडू नये यासाठी मिरवणुकीवर असेल ड्रोन ची नजर

कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस प्रशासनाचा आवाहन

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये लाखो भाविकांनी एकाच वेळी गायले 'वंदे मातरम्'

अहिल्यानगर

- लाखो भाविकांनी एकाच वेळी गायले 'वंदे मातरम्'

- नव्या जागतिक विक्रमाची झाली नोंद

Buldhana: बुलडाण्यात रस्त्यावरच महिलेची प्रसूती

बुलडाणा -

रस्त्यावरच महिलेची प्रसूती

ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप

हाकेच्या अंतरावर रुग्णालय, तरीही मदत नाही

खासगी नर्सच्या मदतीने रस्त्यावरच प्रसूती

Beed: बीडमध्ये निकृष्ट कामाची गावकऱ्यांकडून पोलखोल, व्हिडीओ व्हायरल

बीड - केज तालुक्यातील सावळेश्वर ते जवळबन रस्ता हाताने उखडल्याचे व्हिडिओ व्हायरल

निकृष्ट कामाची गावकऱ्यांनी केली पोलखोल.

बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर ते जवळबन या 4.40 किमी अंतर असलेल्या डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट

गावकऱ्यांनी हाताने रस्ता उघडुन व्हिडिओमध्ये दाखवले आहे.

हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात ब्युटी पार्लर आणि सलून प्रशिक्षण देणाऱ्या व्हीएलसीसी संस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. प्रशिक्षणासाठी पूर्ण फी भरूनही वेळेत आणि योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी जास्तीत जास्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा करावा- जिल्हा पुरवठा अधिकारी

साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी जास्तीत जास्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा करावा

साखर विक्रेत्यांनी साखरेचा अतिरिक्त साठा करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत

याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात 15 पथक नियुक्ती करण्यात आले आहेत

सोलापुरातील साठा करण्यात अलेल्या होलसेलर कडे तपासणी पथक करतायत पहाणी

अचानक पद्धतीने धाड टाकून हे पथक तपासणी करतील

ज्या विक्रेते आणि पुरवठादाराकडे अतिरिक्त साठा आढळून येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलीय

लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ तर्फे खरेदी केलेला कांदा आता दिल्लीकडे जाण्यास सज्ज झाला असून, कांद्याने भरलेली पहिली ट्रक आता लासलगावच्या मालधक्क्यावर पोहचला असून काही वेळात ती रेल्वे मालबोगीत लोडिंग होणार आहे.

नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली भेट

- २ वर्षात ५८५ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार ? यावर आंदोलन सुरू

- आंदोलकांच्या मागण्याबाबत सपकाळांनी सरकारवर साधला निशाणा

- सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना १ कोटी रुपये मदत मिळावी

- ५ ऑगस्ट २०२६ चा सुधारित जीआर रद्द करावा अशी आहे आंदोलकांची मागणी

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात पुन्हा पाणी गळती सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात पुन्हा पाणी गळती सुरू झाली आहे. बोगद्यात तीन ते चार नव्या ठिकाणी छतावरून पाणी ठिबकतय. तर काही ठिकाणी रस्ता निसरडा झालाय. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतर जुन्या ठिकाणची गळती थांबली होती; मात्र आता नव्या ठिकाणी पाणी पाझरत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठी वाहतूक वाढणार असल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरुन या ठिकाणाहून प्रवास सुरक्षित होईल अशी मागणी होताना पहायला मिळतेय.

राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

आज संध्याकाळपर्यंत राहुल गांधीचा दौरा फिक्स होण्याची शक्यता

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष (आदीवासी विभाग) विक्रांत भुरिया यांची माहीती

आदिवासी विद्यार्थिनींनी राहुल गांधींना सांगितल्या होत्या त्यांच्या समस्या

राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत विचारले होते प्रश्न

सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेल्या बजेटला कोणीही हात लावू शकत नाही. विद्यार्थ्यांची काळजी आहे आणि याबाबत सरकारशी चर्चा करू, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

मांजरी या ठिकाणी आंदोलन कर्त्याची प्रकृती खालवली

आंदोलन कर्त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आंदोलन स्थळी दाखल

राजाराम पाडवी या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

तेरा दिवसापासून सुरू आहे आंदोलन

100 कोटींच्या रस्त्यांवर खड्डे; कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झाली चाळण 

कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 100 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला. या निधीतून 16 पैकी 14 रस्त्यांची कामे 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला. मात्र, अवघ्या सहा महिने ते दीड वर्षातच या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडून खडी बाहेर आली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या रस्त्यांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नरसी नगरीत भक्तीचा महासागर, गोदावरी राहेर ते सिद्धेश्वर मंदिर 23 किलोमीटर भव्य कावड यात्रा

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे श्रद्धा आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला.श्री क्षेत्र गोदावरी नदी राहेर घाट ते सिद्धेश्वर महादेव मंदिर नरसी अशी 23 किलोमीटरची भव्य कावड यात्रा काढण्यात आली.या कावड यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर शिवभक्तांनी खांद्यावर कावड घेऊन गोदावरी नदीचे पवित्र पाणी घेऊन 23 किलोमीटरची पायी यात्रा केली. या यात्रेत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जळगावमध्ये साखरेच्या दरवाढीचा उद्योगांना मोठा फटका

जळगावमध्ये साखरेच्या दरवाढीचा उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. साखरेचे दर थेट 84 रुपयांवर पोहोचल्याने साखरेवर अवलंबून असलेल्या अनेक उद्योगांचे उत्पादन तब्बल 90 टक्क्यांनी घटले आहे. दरातील अनिश्चिततेमुळे उत्पादक आणि विक्रेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. साखरेचे दर अशीच चढे राहिल्यास पुढील काही दिवसांत जळगाव एमआयडीसीतील साखरेवर अवलंबून असलेले अनेक उद्योग पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम या उद्योगांवर अवलंबून असलेल्या मजुरांवरही होणार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आदिवासी विकास मंत्र्याच्या राजीनामासाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक

आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहे.नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.14 ऑगस्ट रोजी शासनाने काढलेला जीआर रद्द करावा,सर्प दंशाने मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्यात यावी, आदिवासी वस्तीगृहात चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल आहे.मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आकुर्डीत चोरांचा सुळसुळाट! भरदिवसा पाण्याचे मीटर पळवले, घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुद्वारा रोड येथे चोरांनी उच्छाद मांडला असून, चक्क दिवसाढवळ्या पाण्याचे मीटर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीचा हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे.

​भर दुपारी लोकांची वर्दळ असताना हा प्रकार घडल्यामुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आकुर्डी स्टेशन, बिजलीनगर आणि गुरुद्वारा रोड परिसरात पोलिसांनी तातडीने गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण

नितीन गडकरीजी यांच्या वक्तव्याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. ते त्यांनी स्थापन केलेल्या 'लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट' या संस्थेबद्दल बोलत होते, जी संस्था आदिवासी भागात एकल विद्यालये चालवते. ​त्याच संदर्भात गडकरी म्हणाले होते की, ते आता पूर्वीसारखे जास्त काम करू शकत नाहीत आणि त्यामुळे तरुण पिढीला अधिक जबाबदारी घेण्याची संधी दिली पाहिजे. त्यांची ही विधानं स्पष्टपणे ट्रस्टचे कामकाज आणि त्याच्या भविष्यातील नेतृत्वाशी संबंधित होती. ​मात्र, काही टीव्ही वाहिन्या हे विधान मूळ संदर्भावरून वेगळे करून राजकीय वक्तव्य म्हणून मांडत आहेत.
नितीन गडकरी कार्यालय

प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करत, एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

न्यायमूर्ती (निवृत्त) सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज लोकभवनात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्या. सुनील शुक्रे यांचे अभिनंदन केले

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला पुन्हा २१ दिवसांची पॅरोल; रोहतक जेलमधून सुटका

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला पुन्हा एकदा २१ दिवसांची पेरोल मंजूर झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता तो रोहतकच्या सुनारिया जेलमधून बाहेर आला आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत आपल्या ताफ्यासह सिरसा येथील आश्रमाकडे रवाना झाला. साध्वी लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरणात तो २० वर्षांची शिक्षा भोगत असून, यापूर्वीही त्याला अनेकदा पॅरोल मिळालेली आहे.

लातूर मनपाची शाळा क्रमांक 26 भरणार पोलीस बंदोबस्तात

लातूर शहरातल्या लेबर कॉलनी परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक 26 या शाळेला काही दिवसापूर्वीच सी जी पी चे मुख्य अभिजीत दिपके यांनी भेट दिली होती, या शाळेत परिसरातील दारुडे व्यक्ती आणि गुंडांचा वावर वाढल्याने महापालिका आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देत पोलीस बंदोबस्तामध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी मागितली आहे, काही दिवसापूर्वी सीजीपी ने लातूरच्या महापालिका आयुक्तांना या संदर्भात पत्र दिले होते त्या अनुषंगाने महापालिकेने ही कारवाई केली आहे.

तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

- तूर पिकाला ४५ ते ६० दिवस झाल्यानंतर मुख्य शेंडा खुडण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला.

- प्रत्येक तूर झाडाचा फक्त मुख्य शेंडा खुडल्यास खालच्या भागातून फांद्यांची वाढ होण्यास मदत होते.

- शेंडा खुडल्यामुळे झाडाची अनावश्यक उंच वाढ नियंत्रित होऊन फांद्या आणि शेंगांची संख्या वाढण्यास पोषक वातावरण तयार होते.

- योग्य वेळी शेंडा खुडल्यास तूर पिकाच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता.

- तूर पिकावर सध्या पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी.

आरोपी प्रतीक घुले च्या अर्जावरही दोन्ही वकिलांचे युक्तिवाद अन्यायालयाने युक्तिवाद ऐकून निर्णय राखीव ठेवला.

त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुरावे डिजिटल इव्हिडन्स यासंदर्भात हे विचारपूस.

बीडच्या जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असले बाबतही सरकारी पक्षाकडून न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आले यावर आरोपी पक्षाने हे सर्व खोटं आहे आणि सरकारी पक्षाचे मुद्दे खोडून काढले.

राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यलयाची दयनीय अवस्था

राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज पाहणाऱ्या वाशिम येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी कार्यलयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, हे कार्यलय पूर्णपणे जीर्ण झाले आहे. यासह या कार्यलयाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून संपूर्ण कार्यलयाला तडे गेले आहेत.

झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी महीलांचा अनोखा मंगळागौर आंदोलन

शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात महिलांचा मंगळागौर आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम सुरू केले आहे. या रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन होत आहे मात्र ठेकेदार व अधिकारी या कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलन कर्ते महीलांनी केले आहे.

टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी मोठा खर्च करत टोमॅटोची लागवड केली,मात्र गेल्या काही दिवसांपासून दर मात्र फारसे मिळत नाही,साध्य 20 किलोच्या क्रेट ला अवघा 100 ते 125 रुपये म्हणजेच 5 ते 6 रुपयाचा दर मिळत असून लागवडीसाठी केलेला खर्च शिवाय तोडणीचा खर्च,गाडीचे भाडे वसूल होत नाही,त्यातच पिकलेल्या टोमॅटो व्यापारी घेत नसल्याने तो उकिरड्यावर फेकून द्यावा लागत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल...

गंगागिरी महाराजांच्या 179 वा. सप्ताह सांगता कार्यक्रमला लावणार हजेरी...

अहिल्यानगर जिह्यातील धनगरवाडी येथे सुरू आहे सप्ताह...

थोड्याच वेळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल्याच्या कीर्तनाला लावणार हजेरी...

वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण 

बिबट्या एका केळीच्या शेतात लपून असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे. बिबट्याने माकडावर हल्ला करून शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ पाचारण केले.

ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड; मनी ट्रान्सफर करणाऱ्या दोघांची चौकशी 

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सरकारी वेबसाइटवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या तपासाची व्याप्ती जुन्नरपर्यंत पोहोचली आहे. जुन्नरच्या तांदूळ बाजार परिसरातील दोन जणांना मनी ट्रान्सफर व्यवहारांबाबत चौकशीसाठी तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याची माहिती आहे; मात्र जुन्नर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आहे.

रायगडच्या म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

रायगडच्या म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी समोर आली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तळोदा शहरातून काढण्यात आली 80 मीटर तिरंगा यात्रा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित युवा फेस्टिव्हल अंतर्गत तळोदा शहरात भव्य 80 मीटर तिरंगा यात्रा आणि युवा संमेलन उत्साहात पार पडले. सप्तशृंगी माता मंदिरापासून निघालेल्या या तिरंगा यात्रेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रभक्तीचा जयघोष केला.

विमाननगरच्या पॉल बेकरीच्या खाद्यपदार्थात अळी सापडल्याचा दावा

फिनिक्स मार्केटसिटीतील पॉल बेकरीमधून खरेदी केलेल्या खाद्यपदार्थाबाबत नागरिकाची तक्रार

विनोद टिळेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अन्नाच्या दर्जाबाबत उपस्थित केले सवाल

२४ ऑगस्ट रोजी घरी नेण्यासाठी बेकरीतून खाद्यपदार्थ खरेदी केल्याचा दावा

घरी नेल्यानंतर खाद्यपदार्थात अळी आढळल्याचा टिळेकर यांचा आरोप

खाद्यपदार्थांच्या स्वच्छता आणि गुणवत्तेवरून सोशल मीडियावरून चिंता व्यक्त

बेकरीतील अन्नपदार्थांच्या गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे उद्या अमरावतीमध्ये येऊन जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी करणार

उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुषमा अंधारे जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देणार त्यानंतर सुषमा अंधारे यांची अकरा वाजता पत्रकार परिषद.

सुषमा अंधारे यांच्यासोबत अकोल्याचे आमदार नितीन देशमुख ही अमरावतीला येणार.

जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

जळगाव शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आज संध्याकाळी विचित्र अपघात झाला. विरुद्ध दिशेने अचानक बोलेरो वाहन आल्याने घाबरलेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचे नियंत्रण सुटून ते टँकरखाली आलेत. यात वरुण विजय सुरवाडे याचा मृत्यू झाला, तर पवन अनिल अडकमोल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

नागपूर- गोधनी गॅस गळती घटनेच्या प्रकरणाची चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना

- नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी गोधनी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली

- त्यानंतर या गॅस गळती घटनेची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली

- या समितीत प्रदूषण नियंत्रण महामंडळ,महापालिका, ग्रामीण प्रशासकीय अधिकारी,अग्निशमन, एनडीआरएफ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी असतील

- नागपूर जिल्ह्यातील इतरही जलशुद्धीकरण प्रकल्पांची सुरक्षा पाहणीचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत

नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षासाठी ८७ लाखांचे स्टेबलायझर घेण्याचे निर्देश

नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील सुविधांचा जिल्हा परिषद सीईओंकडून आढावा

अमरावतीतील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील घटनेनंतर नाशिक प्रशासन सतर्क

जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक अतिदक्षता विभागाची पाहणी

मागील वर्षी शॉर्टसर्किटच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना

संपूर्ण कक्षासाठी उपयुक्त ठरणारे ८७ लाखांचे स्टेबलायझर घेण्याचा निर्णय

जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून निधी मंजूर करण्याचे निर्देश

Jambudwip Export-Import प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 3.6 कोटी रुपयांची रोकड जप्त

फसव्या पद्धतीने Input Tax Credit मिळवून त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी Jambudwip Export and Import Limited कंपनीविरोधात सुरू असलेल्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे.

ED च्या लखनऊ विभागाकडून सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान 3.6 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अक्कलकोट तालुक्यात एसटी बस चिखलात अडकली

सलगरहून अक्कलकोट कडे निघालेल्या एसटी बसचं मागील चिखलात फसलं

ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर तीन तासाने बस चिखलातून बाहेर निघाली

एसटी बस मधून ग्रामस्थ आणि विद्यार्थी करत होते प्रवास

अक्कलकोट ते सलगर या चौदा किलोमीटरच्या दुरुस्तचे सध्या काम सुरू आहे

पुण्यातील चंदननगर सब-रजिस्ट्रार कार्यालयात सावळा गोंधळ

पुणे शहरातील चंदननगर येथील महसूल व नोंदणी विभागाच्या ‘हवेली क्रमांक ७’ दुय्यम निबंधक (सब-रजिस्ट्रार) कार्यालयात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. जबाबदार अधिकारी आपल्या जागेवर उपस्थित नसताना चक्क एका खाजगी व्यक्तीने शासकीय संगणकावर बसून दस्तऐवजांचा गोषवारा (डॉक्युमेंट्स) काढल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे कार्यालयात मोठा गोंधळ उडाला असून शासकीय गोपनीयतेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गर्दीच्या मार्गावर पीएमपीच्या बसफेऱ्या वाढवण्याची मागणी

पुणे महानगर परिवहन मंडळाच्या पीएमपी अनेक बसेसचे दरवाजे नादुरुस्त

वेळेवर उघडत नाहीत किंवा बंद होत नाहीत

या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता बसची अवस्था, स्वयंचलित दरवाजांची तपासणी, मार्गावरील प्रवासी संख्या आणि बसफेऱ्यांचे नियोजन यांची चौकशी करावी

गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त बस सोडाव्यात, नादुरुस्त दरवाजे तातडीने दुरुस्त करावेत

साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

साखरेच्या वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचे व्यापारी झाल्याचा दावा केला.

नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरात कामगारांंचं आंदोलन

- पीएफ सह आपल्या विविध मागण्यांना घेऊन महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन सुरू

- कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारावर कामगाराच आंदोलन सुरू

परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची दांडी

परभणी जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके आता पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. ऑगस्ट महिन्यात कापसाला बोंडधारणा होऊन त्याची चांगली वाढ झालेली अपेक्षित असताना अनेक भागांत कापूस अद्याप गुडघ्याएवढाच राहिला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेत आमदार संतोष बांगरांचे भावी मंत्री म्हणून पोस्टर झळकले

हिंगोली मध्ये आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी पोस्टर झळकावले आहेत.

कावड यात्रेच्या समारोप कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांची गांधी चौक येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

मध्यरात्री ठाण्यातील मानपाडा परिसरात चारचाकी वाहनाला अचानक आग लागली

घोडबंदर रोडवरील हिरानंदानी पार्कसमोर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर Maruti Suzuki Swift, क्रमांक MH 43 AN 1989 या कारने पेट घेतला.

वाहनात चालकासह दोन प्रवासी असे एकूण तीन जण प्रवास करत होते.

आग लागताच तिघांनीही वेळीच वाहनाबाहेर पडत स्वतःचा बचाव केला.

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर वाहनासह दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करत पहाटे १ वाजून २६ मिनिटांनी वाहनाला लागलेली आग पूर्णपणे विझवली आहे. कुठलीही जिवितहानी झालेली नाहिये.

पोलिसांचे वाहन थेट बोटीवर चढवून नदीतून प्रवास केल्याचा व्हिडिओ समोर....

जालन्यातील टेंभुर्णी पोलिसांचा वाहन थेट बोटीवर चढवून नदीतून प्रवास केल्याचा व्हिडिओ समोर आलाय.जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा गावात जाण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.जाफराबाद तालुक्यातील वरुड गावातून डोलखेडा गावात जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांसह पोलिसांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नदीच्या पाण्यातून बोटीवर पोलीस वाहन चढवून प्रवास करतानाचा टेंभुर्णी पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे...

३१ ऑगस्ट रोजी होणार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याअन्वये ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर २९ ऑक्टोबर पर्यंत सुनावण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित साप्ताहिक बैठकीत दिली.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT