सांगलीच्य कुपवाड परिसरात आणि जिल्ह्यातल्या तासगाव- कवठेमहांकाळसह पूर्व भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा जोरदार हजेरी लागली आहे.. सायंकाळी तासगाव तालुक्यासह कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नागज,आरेवाडी या परिसरामध्ये ढगाळ वातावरण होऊन मुसळधार पाऊस पडला आहे..
मुंबईच्या पवई आयआयटीमधील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह यवतमाळ येथील समतानगर निवासस्थानी आणण्यात आला, त्यानंतर वडगाव येथील मोक्षधाममध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी साहिलच्या कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
दिघामधील मुकुंद कंपनीच्या बाजूला ईश्वर नगर येथे एका गोडाऊनला अचानक मोठी आग लागली आगीमध्ये मोठ नुकसान झालं आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल.
बीड -
ऊसतोडणी व वाहतूक मजुरीमध्ये 100 टक्के वाढ करावी
ऊसतोड कामगार संघटना आक्रमक भूमिकेत.
मागणी मान्य न झाल्यास कारखान्याचे चाकही फिरणार नाही.
ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला जाणार.
सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आता मुंबईकर कोकणवासीय परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
गणरायाला भावपूर्ण निरोप देत मुंबई आणि उपनगरांकडे जाण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने रवाना होत आहेत.
त्यामुळे सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दिवसभर वातावरण शांत होते, मात्र सायंकाळच्या सुमारास वडसा परिसरात मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.
सटाणा-मळगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकी पुलाच्या रेलिंगला धडकून नदीपात्रात कोसळली
नाशिकच्या सटाणा तालुक्यात सटाणा-मळगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. आरम नदीच्या पुलावर दुचाकी लोखंडी रेलिंगला धडकून तब्बल ३० ते ४० फूट खाली नदीपात्रातील सिमेंटच्या बांधकामावर कोसळली. या अपघातात केरसाणे येथील १८ वर्षीय विशाल आधार सोनवणे आणि खमताणे येथील १८ वर्षीय राम शशी जाधव हे दोघे जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दोन्ही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज पुण्यात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांच्यासाठी गणपतीकडे काय मागितले, असा प्रश्न विचारला असता अमित ठाकरे हसत म्हणाले, “कुठून कळलं की काय मागितलं?” पुढे ते म्हणाले, “मी फक्त प्रार्थना करतो. काय मागू? देवाने ऑलरेडी खूप काही दिलं आहे.” पुण्यातील गणेशोत्सवाच्या उत्साहाबद्दल बोलताना दरवर्षी येथे येत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा उत्साह आणखी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबई-गोवा महामार्गावर परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोकणवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. माणगाव ते इंदापूरदरम्यान तब्बल ८ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढला असून अनेक प्रवासी रस्त्यावरच अडकून पडले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाहनांची संख्या मोठी असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागत आहे.
धुळे शहरातील देवपूर परिसरातील प्रभात नगरमध्ये एका बंद घराचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून मोठी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे, चेतन माळी असे या घरमालकाचे नाव असून ते बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधली, परिसरातील नागरिकांकडून घर उघडे असल्याचा फोन आल्यानंतर दीपक माळी यांनी तात्काळ प्रभात नगर येथील घरी धाव घेतली, यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाची कडी तुटलेली आणि आतील लाकडी कपाटांचे तसेच ड्रॉवरचे कुलूप तोडलेले आढळून आले
शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम; डोक्यावरून आणलेल्या गणेशमूर्तींचं नदीत रिंगण
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या गोवळकोटमध्ये गणेश विसर्जनाची अनोखी परंपरा आजही जपली जातेय!
गावातील सर्व गणपती एकाच वेळी विसर्जनासाठी बाहेर पडतात. नदीकिनारी पोहोचल्यानंतर डोक्यावरून आणलेल्या गणेशमूर्तींचं नदीपात्रात रिंगण केलं जातं... पारंपरिक पद्धतीने नाचवत बाप्पाला निरोप दिला जातो आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं.
तर दुसरीकडे गोवळकोटमधील भोई समाजाचीही आगळी परंपरा आहे. बोटीतून गणपती बाप्पाला नदीच्या खोल पाण्यात नेलं जातं. बोटीतच वाजतगाजत, भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला जातो आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं.
गोवळकोटच्या या दोन पारंपरिक विसर्जन पद्धती सध्या गणेशभक्तांचं विशेष आकर्षण ठरत आहेत.
मावळच्या तळेगाव मध्ये घरगुती गणपतीला भावपूर्ण निरोप. मोठ्या भक्ती भावाने सात दिवस पूजा करून जड अंतकरणाने आज बाप्पाला निरोप दिला. दरम्यान तळेगाव मध्ये नगरपरिषद तयार केलेल्या कुंडामध्येच बाप्पाचे विसर्जन करण्याकडे भाविकांचा केलं
सध्याच्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकारी खरोखरच संवेदनशील आहेत का?, हा प्रश्न निर्माण झालाय. काल हिंगोलीतील दुष्काळाच्या आढावा बैठकीतील काजू-बदामच्या मुद्द्यानंतर आता अकोल्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय. आज अकोल्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलावलेल्या अमरावती विभागीय आढावा बैठकीत अधिकारी चक्क मोबाईलच्या खेळात दंग असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय. बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन उपस्थित होत्या. अमरावती विभागातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांनीही बैठकीत सहभाग घेतलाय.
मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ आता माणगाव-पुणे मार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली असून निजामपूर ते खर्डी गावादरम्यान वाहनांच्या तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. माणगावमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहने माणगाव बायपासमार्गे निजामपूर, पाली आणि खोपोलीच्या दिशेने वळवण्यात आली आहेत.
भावी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपशावर बंदी घालण्याचा आदेश जलसंपदा विभागाने जारी केला आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आली असून, खाजगी उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सफाळे येथील दत्तक घेतलेल्या कुपोषित बालकाच्या घरी भेट देऊन आरोग्य व पोषणस्थितीचा आढावा घेतला. हार्दिक परेड या बालकाला नियमित पोषण आहार, अंडी आणि दूध उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
सोलापूरात कोरड्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून जिल्हा परिषदेसमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे बॅनर दाखवत आंदोलन केले. नांदेड येथील दुष्काळाच्या बैठकीतील काजू-बदामाच्या चर्चेवरून तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही आंदोलकांनी सरकारवर टीका केली.
हिंगोलीत सकाळी 9 वाजल्यापासून शेतकऱ्याचा मृतदेह विद्युत रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेत असल्याची घटना समोर आली आहे. वीजवितरण विभागाच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीजवितरण अधिकाऱ्याला घेराव घालत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.
कुलाब्यातील बालगोपाल मित्र सार्वजनिक उत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिलं आहे. DCP ट्रॅफिक साऊथ झोन हेमराज राजपूत यांनी धमकी, शिवीगाळ आणि अरेरावी केल्याचा आरोप राऊतांनी पत्रातून केला आहे.
वैध पालिका परवाना असतानाही कारवाईचा दबाव आणल्याचा तसेच महिलांशी असभ्य वर्तन आणि मोबाईल हिसकावल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात DCP हेमराज राजपूत यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील प्रसिद्ध तापी घाटावर विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस पथकासह बोटीतून थेट तापी नदीपात्राची पाहणी केली. यावेळी पाण्याची पातळी, विसर्जनासाठी सुरक्षित जागा आणि संभाव्य धोक्यांचा आढावा घेत आवश्यक नियोजन करण्यात आले.
चाकण MIDC परिसरात अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेत मात्र कामगारांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पाण्याच्या टँकरवर बसून कामगार प्रवास करताना दिसत आहेत. टँकरच्या वर बसून सुरू असलेला हा प्रवास थेट जीवाशी खेळ ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक आणि अचानक ब्रेक लागल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी लातूर-नांदेड महामार्ग वरच्या सांगवी सुनेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान खंडाळी येथे
व्यंकट पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागच्या चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत,यांच्या समर्थनार्थ परिसरातील शेतकरी महामार्गावर उतरले आहेत, तर यावेळी महामार्गावर वाहतूक खोळंबी होती.
केतन अग्रवाल खून प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून न्यायालयात तब्बल ५ हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात खून प्रकरणाशी संबंधित तपासातील महत्त्वाचे पुरावे आणि पोलिसांनी नोंदवलेल्या बाबींचा समावेश असल्याची माहिती आहे.
एकीकडे आभाळात ढगांची गर्दी, तर दुसरीकडे पावसाअभावी करपणारी शेती, असं विदारक चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतशिवारात पाहायला मिळत आहे. कर्जबाजारी होऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं राहिलं आहे. पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन पीक वाळून जात असून शेतकऱ्यांच्या हातची पिकं डोळ्यादेखत करपताना दिसत आहेत. त्यामुळे ‘आमचा वाली कोण?’ असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धाराशिवमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा, तेरखेडा, मस्सा खंडेश्वरी आणि हावरगाव या गावांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांना थातूरमातूर मदत करून चालणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली. तसेच, पुढील पाच ते सहा दिवसांत चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर हे सरकारला महागात पडेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
कोरड्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी काल हिंगोली जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेताला भेट न देता बार अँड रेस्टॉरंट चालवणाऱ्या मालकाच्या शेतात दुष्काळाची पाहणी केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दत्ता भरणे यांचा दुष्काळ पाहणी दौरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
याबाबत कृषिमंत्र्यांना जाब विचारला असता, "शेतकरी बार मालक आहेत किंवा आणखी कोणी, हे मला माहीत नाही. तुम्ही असे प्रश्न विचारू नका," असं म्हणत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पोळा सणाच्या दिवशी आत्महत्या करणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची साधी विचारपूसही कृषिमंत्र्यांनी केली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेताला भेट न देता बार अँड रेस्टॉरंट मालकाच्या शेतात दुष्काळाची पाहणी केल्याने दत्ता भरणे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या गोदामावर छापा टाकून मोठी कारवाई केली. शासनाने प्रतिबंधित केलेला लाखो रुपयांचा गुटखा आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पावसाने पाठ फिरवल्यानं संगमनेर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय.. याच पार्श्वभूमीवर संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेतली..
पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.. दरम्यान, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मात्र पंचनाम्याची अट न ठेवता सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय.. राज्य सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली..
पावसाअभावी बळीराजा संकटात असताना संगमनेरमध्ये मात्र दुष्काळाच्या मुद्द्यावरून आजी-माजी आमदार आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय..
जळगाव दिल्ली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग व मानवी तस्करी प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत जामनेर येथील एका निवृत्त बँक कॅशियरची २३ लाख ४० हजार ७० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील शिवशक्ती नगर येथील रहिवासी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कॅशियर माणिक मारूती घुले यांना एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःचे नाव "दीपक शर्मा" सांगून तो दिल्ली पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून माणिक घुले यांच्या नावाने आणि आयडीचा वापर करून सिमकार्ड व कॅनरा बँकेत बनावट खाते उघडून मनी लाँड्रिंग व मानवी तस्करीचे कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे सांगितले.
शेजारील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १३व्या मजल्यावरून २०० किलो वजनाचा लोखंडी बीम खाली कोसळला
खाली येताना बीम आधी झाडावर आदळला
त्यानंतर कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या शेडवर आदळून जमिनीवर कोसळला
घटना घडली त्यावेळी त्या परिसरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
कोस्टल रोड कंट्रोल रूमच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 5.20 वाजता, लोटस जेट्टीजवळ, लाला कॉलेजसमोर हा अपघात झाला
BMW कार मरीन ड्राइव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात होती.
भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गणेशोत्सव साजरा करून मुंबई, ठाणे आणि उपनगरांकडे परतणाऱ्या कोकण वासीयांच्या सोयीसाठी एस्टी महामंडळाचा रत्नागिरी विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. परतीच्या जादा गाड्यांसाठी रत्नागिरी विभागातून तब्बल २५०७ गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर आणि वेळेत व्हावा, यासाठी एस्टी महामंडळाने विभागातील सर्व नऊ आगारांमधून या जादा बसेसचे विशेष नियोजन केले आहे. एस्टी महामंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गुहागर आगारातून सर्वाधिक ४६० गाड्यांचे बुकिंग झाले असून हे आगार परतीच्या वाहतुकीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चिपळूण आगारातून ४३३ गाड्या, तर देवरूख आगारातून ३४५ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. दापोली आगारातून २६३, राजापूर आगारातून २३८, खेड आगारातून २३४ आणि रत्नागिरी आगारातून २०० गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय लांजा आगारातून १८७ तर मंडणगड आगारातून १४७ गाड्या परतीच्या प्रवासासाठी आरक्षित झाल्या आहेत. परतीच्या या एकूण प्रवासात २-३ दिवसांचा कालावधी अतिशय गर्दीचा असणार आहे. ऐनवेळी प्रवाशांची संख्या वाढल्यास अधिकच्या गाड्या सोडण्याचे नियोजनही प्रशासनाकडून केले जात आहे.
अमरावती च्या बडनेऱ्याजवळील दाभा येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा मृतदेह बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली असे मृत महिलेचे नाव असून,सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. वैशाली ही ललित नामक युवकासोबत गेल्या चार वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. महिलेच्या डोक्याला मार लागल्याचे समोर आले असून,शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात ‘मल्टिपल इंज्युरी’मुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.घटनेनंतर ललित पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बडनेरा पोलिसांकडून सुरू आहे.
व्हॉट्सॲपवर आलेल्या एपीके फाइलवर क्लिक करणं एका डॉक्टरांना चांगलंच महागात पडलं आहे. गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचं सांगत सायबर गुन्हेगारांनी ५४ वर्षीय डॉक्टरांना व्हॉट्सॲपवर बनावट लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्यानंतर डॉक्टरांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर 'महानगर गॅस बिल अपडेट' नावाची एपीके फाइल पाठवण्यात आली आणि ती इन्स्टॉल करण्यास सांगण्यात आलं. डॉक्टरांनी फाइल इन्स्टॉल केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाइलचा ताबा सायबर गुन्हेगारांनी घेतल्याचा संशय आहे. अवघ्या ४१ मिनिटांत डॉक्टरांच्या बँक खात्यांतून तब्बल ८ लाख ५९ हजार ५९९ रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांच्या चौकशीनंतर १८ सप्टेंबरला क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी लिंक किंवा एपीके फाइल इन्स्टॉल करण्यापूर्वी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या बैठकांसाठी चहा व अन्य खाद्यपदार्थ पुरविले जातात. पण निविदेविना याचे बिल मंजूर केले जात आहे. आतापर्यंत ३ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती अधिकार कायद्यातून समोर आली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कोकणवासी यांचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास
मुंबई गोवा महामार्गावर कोकणवासी यांच्या गाड्यांची मोठी वर्दळ
सहा दिवसांच्या गणरायांना निरोप देऊन आता लाखो कोकणवासिया मुंबईच्या दिशेने
आज पासून अनंत चतुर्दशी पर्यंत मुंबई गोवा महामार्गावर कोकण वाशी यांची राहणार वर्दळ
सहा दिवस गणपतीची कोकण वासियांकडून मनोभावे सेवा
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे.पावसाने दडी मारल्याने सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चाललं आहे...शेतात डोलणारी पिकं आता पाण्याअभावी करपून जाऊ लागली आहेत. कष्टाने पेरलेलं पीक डोळ्यांसमोर वाळून जातंय,त्यासोबत शेतकऱ्याची दिवाळी साजरी करण्याची स्वप्नंदेखील करपत आहेत.
गणरायाच्या दर्शनासाठी आणि विविध गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी शनिवारी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवार आणि रविवारची जोडून आलेली सुटी तसेच गौरीचे विसर्जन झाल्याने शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ वाढली होती. सायंकाळनंतर गर्दीचा ओघ आणखी वाढला. शहरातील मध्यवर्ती भागासह प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात गणेशभक्तांची मोठी उपस्थिती होती.
शनिवारी रात्री ११ वाजता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस स्टेशनला अचानक सदिच्छा भेट देऊन पोलीस स्टेशनमधील गणपती बाप्पाची आरती केली. आयुक्तांनी श्री गणेशाची आरती केल्यानंतर उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी DJ-मुक्त दहीहंडी तसेच ईद-ए-मिलादचा सण शांततामय आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांची सर्वसमावेशक सहमती मिळवून घेतल्याबद्दल येरवडा पोलीस ठाण्याचे कौतुक केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.