Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Marathi Breaking Live Headlines Updates : नवरात्रौउत्सव, सीजीपी दिल्ली आंदोलन, अभिजित दीपके, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सुधारित वेळापत्रक

✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026

✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026

✅ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार : 16 नोव्हेंबर 2026

पात्र मतदारांनी काय करावे?

प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील तपासा. नाव वगळले असल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीत चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा.

फेस रिकग्निशनपासून वाचण्यासाठी अभिनेत्री Richa Chadhaचा अनोखा मेकअप

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढानं आंदोलकांच्या समर्थनात एक खास व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये तिनं फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर खास मेकअप कसा करावा, हे स्वतः करून दाखवलंय. पाहूयात

शिरुरमध्ये १० एकर ऊस जळून खाक; ऊसतोडीपूर्वीच आगीचा फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे विद्युत तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे १० एकर अडसाली ऊस जळून खाक झालाय. विशेष म्हणजे, काही दिवसांतच या उसाची तोड होणार होती; मात्र त्याआधीच आग लागल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

पिंपळसुटी येथे ११ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज शेतकरी रावसाहेब फराटे यांनी व्यक्त केला आहे. या आगीत गट क्रमांक २७० आणि २७१ मधील फराटे व त्यांच्या नातेवाईकांचा सुमारे १० एकर अडसाली ऊस जळून खाक झाला. काही दिवसांतच ऊसतोड होणार असल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची अपेक्षा होती; मात्र तोडणीपूर्वीच आग लागल्याने हातातोंडाशी आलेलं पीक जळून मोठं आ…

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून दहा टक्के पाणी कपातीचे निर्देश,

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून दहा टक्के पाणी कपातीचे निर्देश, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन..

जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल..

सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन काढले आदेश

31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज सुरक्षित ठेवण्यासाठी जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन केले जाणार..

16 ऑक्टोंबर 2026 पासून महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी वापरात दहा टक्के कपात करण्याचे आदेश..

देवगड समुद्रात मालवणच्या मच्छीमार बोटीला आग

देवगड समुद्रात मालवणच्या 'भगवती' बोटीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग लागताच समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी बोटीवरील सर्व २५ खलाशी सुखरूप बचावकार्य केले.

​मालवण येथील मच्छीमार गोपी तांडेल यांची 'भगवती' नावाची नौका मासेमारीसाठी देवगड समुद्रात गेली होती. बोटीच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. समुद्रात बोटीला आग लागल्यामुळे खलाशांमध्ये धावपळ उडाली मात्र वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे बोटीवरील सर्व २५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

जळगाव महापालिकेचा महिनाअखेर ६०ऐवजी ४५ मिनिटेच पाणीपुरवठ्याचे नियोजन

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने वाघूर धरणातील पाणीसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरात महिनाअखेर ६०ऐवजी केवळ ४५ मिनिटेच पाणी पुरवले जाईल, असे संकेत मनपा पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत. दरम्यान, १०० मोठ्या इमारतींची बांधकामेही थांबण्याची शक्यता आहे.

'ऑक्टोबर हीट' दशकातील सर्वाधिक तापमान पारा ३८ अंशांपर्यंत शहरात उन्हाचा कडाका कायम

जळगाव, पावसाळा संपल्यानंतर वातावरणात गारवा जाणवण्याची अपेक्षा असताना यंदा कमी पावसामुळे ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे. जळगावमध्ये सध्या कमाल तापमान वाढलेले असून सध्या ३८ अंशांपर्यंत पोहोचलेला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार गेल्या दशकात ऑक्टोबरमध्ये यंदा उच्चांक तापमानाची नोंद झाली आहे.

नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना उघडकीस

- चोरट्यांनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून सुमारे ७० हजार रुपयांचे दागिने लंपास केले.

- आशिष ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोन अज्ञात युवक आले, त्यांनी सोन्याची अंगठी पाहण्यासाठी हातात घेतली आणि संधी साधून अंगठीसह पळ काढला.

- त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन काही अंतरावर तयार होता, तिघेही दुचाकीवरून पसार झाले, दुकानदाराने चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र त्यांना पकडण्यात यश आले नाही.

Rahul Gandhi यांची आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात, याचिकेत तब्बल 14 त्रुटी

राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाविरोधात याचिकासुप्रीम कोर्टातील याचिकेत तब्बल 14 त्रुटीसुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता कमीराहुल गांधीसह इंडियाच्या 11 नेत्यांची सुप्रीम कोर्टात यचिका

यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागात कृषी फिडर कोलमडले

यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा 37 अंशापर्यंत वर चढल्याने खरिप हंगामातील पीक होरपळण्याच्या वाटेवर आहेत.अशा वेळी पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू केली असून याचवेळी कृषी फिडर कोलमडल्याने शेतकऱ्यांना सिंचन करणे अवघड झाले आहेत. सुरळीत वीजपुरवठा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

धाराशिवमध्ये दुष्काळातही महाविद्यालयाकडून परीक्षा शुल्क वसुली - कैलास पाटील आक्रमक

राज्य सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली असतानाही महाविद्यालयांकडून प्रत्यक्षात परीक्षा शुल्क वसूल केले जात असल्याचा प्रकार धाराशिव मध्ये समोर आला आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब शहरातील महाविद्यालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परीक्षा शुल्क वसुली तत्काळ थांबविण्याची मागणी केली. दहावी बारावीच्या धर्तीवर विद्यापीठांच्या परीक्षा अर्ज प्रणालीत सुधारणा करून विद्यार्थ्यांचे अर्ज एकही रुपया न घेता स्वीकारावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

सोनसरी आश्रमशाळेत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात असलेल्या सोनसरी येथील आश्रमशाळेत एका आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने शाळेच्या वस्तीगृहातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोमवारी (१२ ऑक्टोबर) उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

दुपारी दोन वाजता शिंदे सेनेचे वकील नीरज किशन कौल करणार युक्तिवाद

सुप्रीम कोर्टाने 30 ऑक्टोबर पूर्वी सुनावणी पूर्ण करण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे आजच्या सुनावणी कडे लक्ष

राहुल गांधींच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीची बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीची बैठक

सायंकाळी चारच्या सुमारास बैठक

इंडिया आघाडीच्या खासदारांना राहुल गांधींनी चहापानासाठी आमंत्रित केले

‘व्होट चोरी’विरोधातील संयुक्त आंदोलनाची रणनीती ठरण्याची शक्यता

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यावरही चर्चा होणार

चर्चेनंतर मोर्चा किंवा पत्रकार परिषद होण्याची शक्यता

मात्र, पुढील रणनीती अद्याप गुलदस्त्यात

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अंतिम टप्प्यात आले असून या निवडणुकीत अजित पवार गटाने 21 च्या 21 जागा जिंकून कारखान्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे तर विरोधी दोन्ही पॅनलला एक खाते देखील उघडता आले नाही

Maharashtra News Live Update : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅकेवर महायुतीने रोवला झेंडा

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून रात्री उशीरापर्यंत चाललेल्या मतमोजणीत 25 जागेपैकी महायुतीला 16 जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या बँकेच्या चाव्या महायुतीच्या हाती गेल्या आहेत. महाविकास आघाडीला 8 जागेवर उमेदवार निवडून आले आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय. भाजपचा महायुतीच्या मित्र पक्षांना सोबत घेत शिंदेसेनेने बँकेच्या सत्तेत मोठा वाटा मिळविला आहेत. या निवडणुकीत संचालक पदाच्या 25 जागेपैकी तालुका गटातील दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या त्यानंतर 23 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: 'सोमवेश्वर' निवडणुकीत जय पवारांचा करिश्मा, २१ -० ने विजय; शरद पवार गटाचा दारूण पराभव

ट्रक-मोटारसायकलची समोरासमोर धडक; जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमध्ये हळहळ

Walking Timing: सकाळी ७, दुपारी १२ की संध्याकाळी ७ वाजता...; कोणत्या वेळेला चालणं सर्वात बेस्ट?

मुंबईमध्ये विषारी ताडीचा संशय; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये टेबलावर कोसळताना दिसला तरुण

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

SCROLL FOR NEXT