Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची आज घोषणा, महापालिका निवडणुका अपडेट्स, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

असर्जन येथील पाटबंधारे वसाहतीतील कुटुंबांना घरे खाली करण्याच्या नोटीस 

नांदेड शहरातील असर्जन परिसरात पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मागील 40 वर्षापासून येथे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत.जवळपास 500 हुन अधिक मतदार या वसाहतीत आहेत.परंतु शासनाने आता या कुटुंबांना ही वसाहत खाली करण्यासाठी नोटीस पाठविल्या आहेत. मागील चाळीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या या कुटुंबीयांनी ही वसाहत खाली करण्यास नकार दिलाय.परिणामी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या रहिवाशांनी घेतला आहे. शासनाने आमची पर्यायी व्यवस्था करावी, प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्हाला घरकुल देण्यात यावेत अशी मागणी देखील येथील रहिवाशांनी केली आहे.

Sangli: सांगलीतील 34 बँक खात्यावर पोलिसांची कारवाई..

हवालाची रक्कम देण्या - घेण्यासाठी व ऑनलाईन गंडा घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 34 बँक खात्यावर सांगली सायबर पोलिसांनी कारवाई केली. कमिशन बेसवर या बँक खात्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर 34 बँक खात्यावरून गैरप्रकार करणाऱ्या जैब जावेद शेख याला सांगलीतून अटक करण्यात आलीये. जैब शेख हा हवालाची रक्कम देण्या - घेण्यासाठी, ऑनलाइन गंडा घालण्यासाठी, क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी या 34 बँक खात्यांचा वापर करीत होता. ज्यांच्या नावे बँक खाते होते, त्यांना या बदल्यात कमिशन देण्यात येत होते. दरम्यान या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सांगली सायबर पोलिसांना यश आले असून 34 बँक खात्यावर कारवाई करण्यात आलीये. तसेच डेबिट कार्ड, चेक बुक आणि पासबुक जप्त करण्यात आलेत. या खात्यावरून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने ही सायबर पोलिसांचा तपास सुरू आहे.

Nanded: नांदेडमध्ये दुचाकीची ट्रकला पाठीमागून धडक,दोन ठार

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मोटरसायकलची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने मोटरसायकल वरील तिघांपैकी दोन जण जागेवरच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. नांदेडच्या माहूर तालुक्यातील वाई बाजार जवळील वाघाई टेकडी जवळ हा भीषण अपघात झाला. वाघाडी टेकडी जवळ रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून मोटरसायकल धडक दिली.या अपघातात आसोली साईनगर येथील तिघेजण माहूर कडे जात होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Mumbai-Goa: मुंबई गोवा महामार्गाची आता आणखी एक नवी डेडलाईन

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आता आणखी एक नवी डेडलाईन

एप्रिल 2026 पर्यंत या महामार्गाचं काम पुर्ण केलं जाणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा अधिवेशनादरम्यान दिली नवी डेडलाईन

सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम 90% पूर्ण

संगमेश्वर ते वाकेड दरम्यानचं काम रखडलेलं

महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा मुंबई गोवा महामार्ग

आता तरी नवी डेडलाईन पाळली जाणार का...केला जातोय प्रश्न उपस्थित...

नाशिकच्या नांदगावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; पाच मुले जखमी, एक गंभीर 

नाशिकच्या नांदगाव शहरातील श्रीकृष्ण नगर आणि भावसार गल्ली परिसरात घरासमोर खेळणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवून त्यांचे लचके तोडले. या हल्ल्यात ५ मुले जखमी असून त्यातील एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या गालावर आणि कमरेला दुखापती झाल्या आहेत. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठीं मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. मुलांचा आरडाओरडा ऐकून पालकांनी काठ्यांसह धाव घेतली, मात्र तोपर्यंत कुत्र्याने पाच मुलांना चावा घेऊन जखमी केले होते. दरम्यान भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणावे, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोल्हापूरात सराईत चोरट्याकडून 34 दुचाकी जप्त

पैशांची चणचण भागविण्यासाठी दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या सराईताला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संग्राम शिवाजी गायकवाड असे त्याने नाव आहे. चोरट्याकडून 17 लाख रुपये किमतीच्या 34 दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या दुचाकी विक्रीला मदत करणाऱ्या 4 एजंटांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात वाढत्या दुचाकी चोरीबाबत तपासासाठी स्थानिक 'पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेते पथक नेमले होते. चोरीची दुचाकी घेऊन एकहेरले येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार सुरेश पाटील, रूपेश माने यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सांगून त्यांनी पथकासह या भागात सापळा रचला होता. संशयित संग्राम गायकवाडला पकडून चौकशी केली असता त्याच्याजवळीस दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातून 33 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून चोरीच्या एकूण 34 दुचाकी आढळल्या.

Manmad: मनमाडमध्ये नाताळ निमित्ताने चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई

ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धुम पाहायला मिळत आहे.मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची मोठी संख्या असून.शहरात सात चर्च आहे.नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च विद्युत दिव्यांनी उजळून निघाले आहे.ख्रिश्चन बांधवांना आता ख्रिसमसचे वेध लागले असून घरोघरी आकाश कंदील , जिंगल बेल लावून सजावट केली जात आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात

सकाळी ११ वाजल्यापासून पक्ष कार्यालयात उपस्थितीत राहणार

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणार या चर्चा सुरू आहेत,यावर सुप्रिया सुळे आज पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत संवाद साधणार

सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात असणार

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काल सुप्रिया सुळे यांची मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर आज दुपारी चार वाजता ते पक्ष कार्यालयात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

त्या अगोदर सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.

त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का यावर काय चर्चा होते ते पाहावं लागणार आहे

Pune: पुण्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वर नजर,थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर आरटीओ ची मोहीम

आरटीओ थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मध्ये पण करून वाहन चालवणाऱ्या वर कारवाईला सुरुवात केली आहे

31 डिसेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केले असून त्यांच्या मार्फत ब्रेथ अनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे

थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे आरटीओ कडून त्यासाठी आठ रस्ता सुरक्षा पथके तयार करण्यात आली आहेत.

या पथकांना स्थानिक पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून कारवाई करण्याचे निर्देश आरटीओकडून देण्यात आले आहेत

रात्री साडे अकरा ते पहाटे चार दरम्यान ही कारवाई करावी असे स्पष्ट सूचना पथकाना देण्यात आल्या आहेत

अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात

अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात, शेवटच्या क्षणी घोषित होणार...

बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा विशेष प्लॅन तयार;अंतिम यादीतील उमेदवारांशी थेट संपर्क साधणार नेतृत्व...

मित्रपक्षांना जागावाटप करताना भाजपकडून कडक भूमिका.

इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत तणाव वाढला,भाजपकडून निवड झालेल्यांनाच तिकीट देण्यावर भर.

नाराज इच्छुकांना शांत ठेवण्यासाठी समजूत काढण्याची तयारी.

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग.

पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना शहरात शून्यावर,शेवटच्या दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता २०१७ मध्ये निवडून आलेला एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाना भानगिरे वगळता सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते.

मात्र आता एकही नगरसेवक शिल्लक नसल्याने शिंदे यांच्या शिवसेनेलाच शहरातील अस्तित्व टिकून ठेवावे लागणार आहे.

२०१७ पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते.शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ९ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र,आता गेल्या तीन वर्षात एकएक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करत दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारल्या आहेत

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकही नगरसेवकच उरलेला नाही. 'शिवसेना उबाठा मुक्त पुणे' अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Mundhava: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या अडचणीत वाढ

बोपोडी येथील मोक्याच्या 13 एकर आणि मुढवा येथील 40 एकर सरकारी जमिनीचा अपहर केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन पेटल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्यासाठी अंतर अटकपूर्व जामीनाची मुदत वाढवण्याची आरोपी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची मागणी पुणे न्यायालयाने फेटाळली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी वाय लांडेकर यांनी हा आदेश दिला त्यामुळे येवलेच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nashik: नाशिक महापालिकेसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची विक्री

महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सहाही विभाग मिळून विक्रमी १,७६३ अर्जांची विक्री झाली. सर्व ठिकाणी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी याचा अद्याप फैसला होऊ शकला नसल्याने तिकीट वाटप आणि उमेदवारी अधांतरी आहे. त्यामुळे इच्छुक बुचकळ्यात आहेत. त्यामुळे दिवसभरात फक्त पंचवटी विभागात शिवसेना शिंदे गटाच्या एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज खरेदी आणि दाखल करता येणार आहे. त्यामुळे सहाही विभागांत अर्ज खरेदीला मोठी गर्दी होती. अनेक ठिकाणी पहिल्या एक दीड तासातच अर्ज विक्री गेले. अर्ज शिल्लक नसल्याने अनेकांना अर्ज मिळवण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागली. सर्वाधिक ५४४ अर्जांची विक्री नवीन नाशिकमध्ये झाली. जुने नाशिकमधील दुबई वार्ड म्हणून परिचित असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये सर्वाधिक १४२ उमेदवारी अर्जांची विक्री झालीय.

Nagpur: नागपूरमध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

- सर्वच राजकीय पक्षांचे जागा वाटप रखडले असल्याने सोमवारी पासून प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता

- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे.

- येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे

- या अर्जांची छाननी येत्या 31 डिसेंबरला होणार आहे. उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 राहणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे.

पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाकडून 336 इच्छुकांच्या मुलाखती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रिया नाना पेठ येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडली

इच्छुकांनी मुलाखती दिल्या आत्तापर्यंत शिवसेनेच्या सर्व 41 प्रभागांमधून एकूण 336 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

महाविकास आघाडीत शिवसेनेला किती जागा मिळणार हे पहावे लागणार

आज शिवसेना मनसे युती झाल्यावर पुण्यातही युती होणार

पुणे- मुंबई हेलिकॉप्टर मार्गात बदल

प्रवासासाठी आता बारा मिनिटे विलंब

पुणे मुंबई पुणे हेलिकॉप्टर प्रवासाचा कालावधी 8 ते 12 मिनिटांनी वाढणार आहे. 24 डिसेंबर पासून पुणे मुंबई हेलिकॉप्टर सध्याच्या मार्गात बदल होत आहे.

नवीन मार्ग हा आत्ताच्या मार्गापासून काहीसा दुरचा असल्याने परिणामी प्रवासाला वेळ वाढणार आहे.

बदललेल्या मार्गाचा प्रवास शुल्कावर परिणाम होईल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ratnagiri: रत्नागिरीत पंचायत मिशन वनराई बंधारे मोहीम

रत्नागिरी पंचायत समितीने एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत 95 ग्रामपंचायतीमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली. कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत बचतगट महिलांच्या लक्षणीय आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वेतोशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. वेतोशी नदीतील पाणी वाहून पुढे जात होते. त्यामुळे त्याचा गावाला फारसा फायदा होत नव्हता. या मोहिमेंतर्गत नदीवर वनराई बंधारा बांधल्याने याचा फायदा गावाला होणार आहे. विशेषतः शेतीसाठी, प्राणीमात्रांसाठी वा अन्य कामांसाठी आता उपयोगात येणार आहे.

Pune: पुण्यात नाताळनिमित्त लष्कर परिसरात वाहतुकीत बदल

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लष्कर परिसरात २४ आणि २५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून तात्पुरता वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी हा आदेश काढला आहे.

त्यानुसार वाय जंक्शनवरून एम. जी. रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून, ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ती एसबीआय हाऊस चौकातून उजवीकडे वळवून तीनतोफा चौक मार्गे लष्कर पोलिस ठाणेमार्गे वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येऊन ती सरळ ईस्ट स्ट्रीट रस्त्याने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

Pune: पुण्यात काल पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना आज पहिल्या दिवशी संपूर्ण शहरातील एकाही प्रभागात उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही.

१५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आत्तापर्यंत २ हजार ८८६ अर्जांची विक्री झाली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तब्बल २४ हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत.

'पहले आप, पहले आप'.... वरून थांबली वंचित आणि काँग्रेसमधील आघाडीची चर्चा

: बातमी आहेये वंचित आणि काँग्रेसच्या आघाडी संदर्भातील. अकोल्यासह इतर महापालिकेत वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार, अशी जोरदार चर्चा बाहेर सुरुये. मात्र, प्रस्ताव कोणी द्यावा, यावरून आता दोन्ही पक्षात ओढातानी सुरू झालीय. 'पहले आप, पहले आप'..वरूनचं दोन्ही पक्षातील आघाडीचे चर्चा थांबलीये. आघाडीबाबत वंचितकडून प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंये. त्यावर आता प्रकाश आंबेडकरही स्पष्टच बोलून गेलेये.. आघाडीबाबत अनेकदा चर्चा झाल्या खरी, मात्र त्यांच्याकडून कळवल्या जात नाही.. आताही काँग्रेसची नेहमीप्रमाणेचं भूमिका आहेये.. 'आम्ही तयार आहो, पण ते तयार नाहीत', हेचं दाखवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न सुरुये. दरम्यान, यायचं बसायचं, आमची झालीये म्हणायचं... मग, बाहेर भलतंच काहीतरी पसरून द्यायचं.. अशी भूमिका काँग्रेसकडून आहेये.. मात्र, काँग्रेसपेक्षा वंचितचा परफॉर्मन्स चांगला असल्याचेही आंबेडकर म्हणालेये.

आज आपण जो श्वास घेत आहोत, तो नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

कल्याण पूर्व भागात भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि केंद्र सरकारच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात कल्याण पूर्व व पश्चिम या दोन्ही भागांकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. या भागातील प्रलंबित समस्या सोडवायच्या असतील तर येत्या १५ तारखेला होणाऱ्या निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही पातळ्यांवर एकमताचे, स्थिर सरकार असणे विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला बेदम मारहाण

खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वायरमनला दोन भावांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय.

थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेले वायरमन संतोष बो-हाडे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर संदीप सरडे आणि रामदास सरडे या दोन भावांनी शिवीगाळ करत जमावासमोर मारहाण केली. या प्रकरणी खेड पोलिसांत दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार AI’ अँप ठरतोय वरदान

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेला ‘महाविस्तार AI’ हा अत्याधुनिक शेती मार्गदर्शक मोबाईल अँप सध्या शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा अँप शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी डिजिटल साधन ठरत असून, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

Gautami Patil : मोकळे केस, काळा गॉगल; अक्षय खन्नाच्या गाण्यावर गौतमी पाटीलनं लगावले ठुमके, पाहा VIDEO

ISRO ने इतिहास रचला! वजनदार सॅटेलाइट केला लाँच, मोबाइल नेटवर्कमध्ये बदल होणार

Gold Rate Prediction: सोनं प्रति तोळा ₹३,००,००० वर जाणार, अर्थतज्ज्ञांच्या भाकि‍ताने खळबळ

Maharashtra Politics: अजित पवार महाविकास आघाडीसोबत लढणार? भाजपला रोखण्यासाठी दादांची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT