Maharashtra Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सध्या राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळतो. प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांची आर्थिक मदत मिळते. पण आता फडणवीस सरकारकडून निकष ( Devendra Fadnavis Government Proposes Changes to Ladki Bahin Yojana) अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना १५०० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही.
एकाचवेळी दोन सरकारी योजनांचा लाभ -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची घोषणा केली, त्यावेळी सरकारकडून काही निकष ठेवण्यात आले होते. ज्या महिला आधीच एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सांगण्यात आले होते. विधानसभा निवडणुका असल्यामुळे निकषाचे काटेकोर पालन झाले नव्हते. त्यामुळे काही महिलांकडून एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेतला आहे. आता सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या तब्बल ९ लाख इतकी आहे.
९ लाख महिलांचा डेटा मिळाला -
राज्यातील ९ लाख महिला एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याचं माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासात समोर आले आहे. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन योजनांचा लाभ ९ लाख महिला एकाच वेळी घेत आहेत. या महिलांना आता यापुढे १५०० रूपयांच्या ऐवजी महिन्याला फक्त ५०० रूपये लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मिळतील. म्हणजे, वर्षाला १८००० रूपयांच्या ऐवजी फक्त ६००० रूपये मिळणार आहे. लोकमतने याबाबतचा रिपोर्ट प्रसारित केला आहे.
कोणत्या महिलांना फटका बसणार -
नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला १२०० रूपयांचा लाभ मिळतो. त्यामध्ये राज्य सरकार ६००० आणि केंद्र सरकार ६००० रूपये देत आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार, लाभार्थी महिलांना वर्षाला १८ हजार रूपयांपेक्षा जास्त पैसे दिले जाणार नाहीत. आता ९ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला १२००० हजार रूपये मिळतात, त्यात लाडकी बहीण योजनेचेही १८००० रूपये मिळतात, म्हणजे वर्षाला ३० हजार रूपयांचा लाभ राज्यातील ९ लाख महिलांना मिळतो. त्यामुळे राज्यातील ९ लाख महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रूपये नव्हे तर ५०० रूपये दिली जाणार आहेत. राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. माहिती प्रसारण विभागाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची यादी महिला बाल विकास मंत्रालयाकडे पाठवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.