Maharashtra Kesari 2023 Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari 2023: घरची गरिबी, वडिलांनी खुराक पुरवला, अखेर पठ्ठ्या महाराष्ट्र केसरी झाला; लाल मातीतल्या 'सिकंदर'चा थक्क करणारा प्रवास!

Maharashtra Kesari SIkandar Sheikh Journey: मागच्या वर्षी पराभव झाला, पण यंदा पठ्ठ्याने करुन दाखवलं!

Gangappa Pujari

Maharashtra Kesari Sikandar Sheikh News:

६६ व्या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यांचा थरार पुण्यातील फुलगावमध्ये पार पडला. अंतिम सामन्यात गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवत सिकंदर शेखने मानाची महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. गेल्यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखला सेमी फायनलमध्येच पराभव स्विकारावा लागला होता.

मात्र यंदा त्याने गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढत कुस्तीचा नवा सिकंदर आपणच असल्याचे सिद्ध केले. घरातील गरिबीवर मात करत, लाल मातीत मेहनत घेत जिद्द अन् चिकाटीने महाराष्ट्र केसरी होणाऱ्या सिकंदरचा प्रवासही तितकाच थक्क करणारा आहे.

कोण आहे सिकंदर शेख?

सोशल मीडियावर कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेला सिकंदर शेख अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत तयार झालेला मल्ल आहे. सिकंदरचे मुळ गाव सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ. घरात आजोबांपासून कुस्तीची परंपरा, पण घरात अठराविश्य दारिद्रय अन गरिबी. सिकंदर शेखचे वडिल रशिद शेखसुद्धा पैलवानकी करायचे.

त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत सिकंदरनेही लाल माती अंगावर घेतली. अलिकडच्याच काळात सिकंदरने मोठमोठ्या कुस्त्यांमध्ये भल्याभल्या पैलवानांना आस्मान दाखवले. सिकंदरने आत्तापर्यंत अनेक मोठमोठ्या कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत. (Latest Marathi News)

आपल्या वडिलांचे कष्ट दुर करण्यासाठी तो अलिकडेच सैन्यातही भरती झाला. सैन्यदलाकडून खेळत तो लाल मातीत नाव कमावत आहे. आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीएस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत. (SIkandar Sheikh News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

SCROLL FOR NEXT