Maharashtra Kesari Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari: धाराशिवात लाल मातीत कुस्तीचा डाव रंगणार; ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर

Maharashtra Kesari: ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा धाराशिवमध्ये रंगणार आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Kesari In Marathi

६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा धाराशिवमध्ये रंगणार आहे. १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर पाच दिवस ही स्पर्धा चालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दिली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने यंदा होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. धाराशिवात या स्पर्धेचा थरार पाच दिवस चालणार आहे. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने जाहीर केलेल्या या स्पर्धेत ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत विजेत्यांना स्कॉरपिओ,ट्रॅक्टर, बुलेटसोबत जवळपास दोन कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. लाल मातीच्या मैदानात रंगणाऱ्या या स्पर्धेचा थरार धाराशिवात चौका-चौकात स्क्रिनवर पाहायला मिळणार आहे.

या स्पर्धेचा थरार हा स्टेडियमच्या आत आणि बाहेर देखील चौका चौकात स्क्रीनद्वारे पाहायला मिळणार आहे. धाराशिवात होणाऱ्या स्पर्धेचे आयोजक धाराशिव जिल्हा तालीम संघ,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ हे स्पर्धेचे आयोजक असणार आहेत.

याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची बैठक आज झाली. यावेळी त्यांनी स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanyachya Daliche Pani: १५ दिवस चण्याच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

80s च्या ट्रेंडने सोशल मीडियावर क्रेझ; आमिर खानपासून कियारा आडवाणीपर्यंत सेलिब्रिटींचा भन्नाट रेट्रो लूक

Apple iPhone Duo: Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च; 2TB स्टोरेजसह किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, माजी मंत्री तानाजी सावंत यांची शासनाकडे मागणी

Milk Cake Recipe: गोड आणि हेल्दी खाण्याची इच्छा होते? घरी बनवा मऊ आणि दाणेदार मिल्क केक; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT