Baramati Rain Update: पावसाचं दमदार पुनरागमन, बारामतीत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

Rain Update : गेल्या दीड महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने बारामतीत ढगांच्या गडगडाटासह दमदार पुनरागमन केलं.
Baramati Rain Update
Baramati Rain UpdateSaam Tv
Published On

Baramati Rain Update

गेल्या दीड महिन्यापासून गायब झालेल्या पावसाने (Rain)दमदार पुनरागमन केलं. बारामती तालुक्यात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना (Farmer)काहीसा दिलासा मिळालाय. तालुक्यातील अनेक भागात दुपारनंतर ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने शेतात पाणी वाहू लागल्याचं दृश्य पाहायला मिळाले. दुपारी साडेचारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. (Maharashtra Rain Update)

Baramati Rain Update
Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे पुनरागमन; पुढील ४८ ते ७२ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मुसळधार पावसाची शक्यता

पावसाचा जोर इतका होता की, काही मिनिटात रस्त्यांवरुन पाणी वाहू लागलं. शहरातील सर्व सखल भागात पाणी तुंबलं. मुसळधार पाऊस झाल्यानं रस्त्यावरील वाहतूक (Road transport)थंडावली होती. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यातील (Monsoon season)हा बारामतीतील पहिला दमदार पाऊस होता.

Baramati Rain Update
Farmer Pray for Rain: राज्यावर दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा, पावासासाठी देव ठेवले पाण्यात

दरम्यान पावसाने ओढ दिल्याने बारामतीतील खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेलाय. पण आजपासून पावसानं पुनरागमन केल्यानं बळीराजा सुखावलाय. या पावसावरच रब्बीतील पिकांचे जीवदान अवलंबून असल्याने हा पाऊस बारामतीसाठी महत्वाचा आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यातील परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. या मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरुन वाहतील, अशी बारामतीकरांना अपेक्षा आहे.

Baramati Rain Update
Prakasha News: निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात भरले पाणी; प्रकाशा परिसरात पावसासाठी साकडे

पुढील ४८ ते ७२ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात, तर ४ आणि ५ सप्टेंबरला मराठवाड्यात, ५ आणि ६ तारखेला विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील ५ ते ६ दिवस ढगाळ वातावरण असेल. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com