Students appearing for the Class 12 board examination amid controversy over the alleged paper leak in Nagpur Saam Tv
महाराष्ट्र

बारावीचे पेपर फुटले; मंत्री झोपलेले, सामुदायिक कॉपीनंतर आता थेट पेपरफुटी

Maharashtra Hsc Paper Leak Nagpur Chemistry Physics: राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत काप्यांचा सुळसुळाट कमी होता की काय आता थेट बारावीचे पेपर फोडण्यात आले आहेत. यामुळे बोर्डाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून राज्यातलं शिक्षण खातं झोपलय की काय असा प्रश्न निर्माण झालाय.

Girish Nikam

बारावीची परीक्षा 10 फेबुवारीपासून सुरु झाली. मात्र काही ठिकाणी सामुदायिक कॉपी तर काही ठिकाणी शिक्षकच कॉपी बहाद्दर झाल्यानं शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालाय, असं चित्र असतानाच आता पेपरही फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमध्ये बारावीचे दोन पेपर फुटल्यानं बोर्डाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भौतीकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाचे पेपर परीक्षेच्या आधी व्हाट्सअप ग्रुपवर आले होते. पेपर कसा आणि कुठे फुटला?

पेपर कसा फुटला?

नागपूरच्या सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरील प्रकार

गुरुवारी केमिस्ट्रीचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात होती

संशयास्पद हालचालींमुळे पर्यवेक्षकांनी झडती, एक स्मार्टफोन सापडला

मोबाईल तपासात एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच संपूर्ण पेपर आल्याचं उघड

मोबाईलमध्ये एकूण 15 विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप

एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकानं पैसे घेऊन पेपर फोडला

ग्रुपमधील इतर 13 विद्यार्थी नागपुरातील वेगवेगळ्या केंद्रांवर आरामात पेपर सोडवत असल्याचं उघड

पेपर फुटल्याच्या घटनेनंतर नागपूर बोर्डाने सदर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पेपर लिक करणारा आणि ग्रुप ऍडमिन या दोन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नागपूर बोर्डाचे अध्यक्षांनी साम टीव्हीशी संवाद साधताना एखाद्या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचा फोटो काढण्यात आला असावा, असं म्हटलंय.

राज्याच्या उपराजधानीतल्या या घटनेने बोर्डाच्या गोपनीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनासाठी ही लाजीरवाणी बाब असतानाच शिक्षण खातं मात्र पेपर फुटण्याचा प्रकार हाणून पाडला असं म्हणत सारवासारव करत आहेत. प्राथमिक अहवाल आला असून, चौकशीनंतर दोषींवर कारवाई होईल, असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिलंय.

दर वर्षी शिक्षणमंत्री कडक कारवाईचे आदेश देतात मात्र पेपरफुटीच्या घटना थांबायला तय़ार नाहीत. शिक्षण खात्यातल्या अनागोंदीला कोण जबाबदार आहे असा प्रश्न निर्माण होतो.

PTC

(दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेचे काटेकोर नियोजन केलं जातं. शाळा, शिक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाते. मात्र तरीही बारावीचे दोन पेपर फुटल्यानं कुंपणच शेत खातंय का? असा संशय व्यक्त होतोय. या गंभीर प्रकरणानिमित्ताने शिक्षण विभागाचीच साफसफाई होणे गरजेचे आहे.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तमिळनाडूचं राजकारण मोक्याच्या क्षणी फिरलं; थलपती विजय यांनी केलं मॅजिक, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार?

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पाऊस, वादळी वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी

Trendy Simple Mangalsutra: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा लाइटव्हेट आणि साधे ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स

TCS Case: घरात बुरखा आणि धार्मिक पुस्तके सापडणे कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानचं समर्थन

Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यात पाणी पिताय? थांबा त्यापूर्वी 'हे' आधी करा

SCROLL FOR NEXT