Police reveal shocking truth in Jalna – Father strangled daughter over alleged love affair and staged suicide drama. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Honour Killing in Jalna : जालन्यातील दावलवाडी गावात ५ सप्टेंबर रोजी वडिलांनी प्रेमसंबंधाच्या संशयावरून स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला व आत्महत्येचा बनाव रचला. पोलिसांनी आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

  • जालन्यातील दावलवाडी येथे ५ सप्टेंबर रोजी वडिलांनी स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला.

  • प्रेमप्रकरणामुळे समाजात अपमान होईल, या भीतीने वडिलांनी खून केल्याची माहिती

  • मृतदेहाला दोरीने गळफास लावून लोखंडी अँगलला लटकवून आत्महत्येसारखा बनाव करण्यात आला

  • शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट

Father Kills Daughter : जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जन्मदात्यानेच आपल्या पोटच्या लेकीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणेच जालन्यात ही भयंकर घटना घडली. दावलवाडीमध्ये ५ सप्टेंबर रोजी मुलीचा बापाने गळा दाबून खून केला. त्यानंतर आत्महत्येचा बनाव केल्याचं पोलीस तपासात समोर आलेय. मुलीच्या प्रेमसंबंधामुळे समाजात अपमान होईल, या भीतीने वडिलांनी स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली. आरोपी वडील हरी बाबुराव जोगदंड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोस्टमार्टम अहवालात देखील गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रेमप्रकरणातून वडिलांकडून मुलीचा गळा दाबून खून, आत्महत्येचा बनाव फसला

जालन्यातील दावलवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधामुळे समाजात अपमान होईल या भीतीने वडिलांनी स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यासाठी मुलीला दोरीने गळफास लावून लोखंडी अँगलला लटकविण्यात आले. ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे गस्तीवर असताना त्यांना दावलवाडी येथे एका मुलीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर आत्महत्येऐवजी घातपात झाल्याचा संशय निर्माण झाला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि प्राथमिक चौकशीत मृत मुलगी प्रेमसंबंधात असल्याच समोर आले. त्यामुळे अपमान होईल या भीतीने वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले.शवविच्छेदन अहवालातही गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी वडील हरी जोगदंड यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बदनापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात बदनापूर पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

कर्णबधिर असल्याचे भासवून थेट तहसीलदाराची नोकरी मिळवली? प्रशासकीय वर्तुळात खळबळ| VIDEO

Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

GenZ Search Trends: १८ वर्षांचे तरुण गुगलवर काय सगळ्यात जास्त सर्च करतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT