Prabhul Lodha, now accused of rape, at the center of Maharashtra’s honey trap scandal involving MLAs, MPs, and ministers. Saam Tv
महाराष्ट्र

गृहराज्यमंत्र्यांना डान्सबार भोवणार? अनिल परबांनी दिले कदमांविरोधात पुरावे

Prabhul Lodha Rape: ठाकरे सेनेचे आमदार अनिल परबांनी सावली डान्सबारचा मुद्दा पुन्हा उचलून धरलाय. मुंबईतील या डान्सबारमुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आलेत.

Suprim Maskar

मंत्र्यांच्या कारनाम्यानं महायुती सरकार वादात सापडलयं. एकीकडे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे कृषिमंत्री कोकाटे अडचणीत आलेत. तर दुसरीकडे आईच्या नावे डान्सबार असल्याचा आरोप अनिल परबांनी योगेश कदमांवर केलाय. परब यांनी मुंबई उपनगरातील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या 'सावली' बारचा मुद्दा पुन्हा उचलून धरलाय

'सावली बार' प्रकरणी परबांचे आरोप

गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार

'सावली बार'वर यापूर्वी दोनवेळा कारवाई

याआधी 22 बारबाला, 22 गिऱ्हाईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई

दरम्यान योगेश कदम यांनी अनिल परबांचे आरोप फेटाळून लावलेत. तसंच परबांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही दिलाय. तर दुसरीकडे अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार असल्याचं सांगितल.

गृहराज्यमंत्री कदमांचा राजीनामा घ्या'

दुसरीकडे रामदास कदम यांनी हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवाच, असं आव्हान अनिल परब यांना दिलंय...

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आहेत. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय गायकवाड आणि आता योगेश कदम..या सर्वांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालाय. त्यामुळे याप्रकरणातील सत्य बाहेर येणं गरजेचं आहे.? महायुतीतील या मंत्र्यांची मुख्यमंत्री कशापद्धतीनं कानउघडणी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार

सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राज्यातील 15 सरपंचांचा सन्मान होणार; कुणाला मिळाला मान?

Thursday Horoscope : या राशीच्या व्यक्तीनी प्रवास करताना राहा सावध, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Dahi Handi : दहीहंडी फोडणार आहात? मग अपघात टाळण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT