Maharashtra Rain  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात पावसाची तुफान बॅटिंग! जिल्हा प्रशासन, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे; मुख्यमंत्र्याकडून सूचना

साम टिव्ही ब्युरो

हिरा ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी, असं मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांना म्हणाले आहेत.

पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सर्वांनी सतर्क राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्व संध्येला पुण्यात गोळीबार

Couple Romance Video : भरधाव दुचाकीवर जोडप्याचा रोमान्स; Hugg आणि Kiss करत खुल्लम-खुल्ला प्यार पाहून नेटकऱ्यांचा संताप

Onion News : निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांद्याचा वांदा कायम

Mumbai Local: एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Ranjitsinh Naik Nimbalkar : शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नेरिटीव सेट केला; माजी भाजप खासदाराचा आरोप

SCROLL FOR NEXT