MAHARASHTRA HEATWAVE ALERT: SEVERE HEAT CONDITIONS EXPECTED FOR NEXT 5 DAYS Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Heatwave : महाराष्ट्र उकाड्याने घामाघूम, पुढील ५ दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : राज्यात उष्णतेचा कडाका वाढला असून पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांत हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेची लाट कायम

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘हीटवेव्ह’चा इशारा

  • कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता

  • नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचा सल्ला

Maharashtra Today Weather Update News राज्यात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, मे महिन्यानेही उष्णतेची तीव्रता कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट (Hitwave) कायम राहण्याची शक्यता आहे.

विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

नंदूरबार जिल्ह्यात उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar Temprature), जालना आणि परभणी जिल्ह्यांत सलग तीन दिवस हीटवेव्हचा इशारा आहे. तर अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, वर्धा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, आणि नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

SCROLL FOR NEXT