MAHARASHTRA FUEL CRISIS: ONLY ONE MONTH STOCK LEFT? BHUJBAL’S CLAIM CREATES PANIC 
महाराष्ट्र

Maharashtra Fuel Crisis: राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा; मंत्री छगन भुजबळांच्या विधानाने भरली धडकी

Fuel Crisis in Maharashtra: राज्यात फक्त महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध असल्याचं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. या विधानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Bharat Jadhav

  • राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा

  • विधानानंतर पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या.

  • इंधन दरवाढ आणि तुटवड्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध आहे, असं विधान राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. भुजबळ यांच्या या विधानामुळे अनेकांना धडकी भरली आहे. राज्यात इंधन टंचाईमुळे नवं संकट उभे राहिले आहे. इंधनांचे भाव वाढू लागले आहेत, अनेक ठिकाणी इंधन तुटवड्याचाही सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. पेट्रोल पंपावरील वाहनांचा रांगा लागल्या आहेत,अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे, त्याचदरम्यान भुजबळांच्या विधानाने नागरिकांची चिंता वाढवली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम-आशियातील तणावाचा अनेक देशांवर परिणाम होतोय. भारतातील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम आशियातील तणाव सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. अमेरिका-इराणची शांताता करार सहमती झाली नाहीये. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अजूनही सामान्य नाहीये. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील आज पु्न्हा इंधनाची दर वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, तेल, वायू किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाहीये. परंतु राज्यात होणारा पुरवठ्यात तुटवडा जाणवत आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यानं पंपावर हाणामारीच्या घटना घडत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईच्या संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडला होता. जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झाल्याचं दिसून आले.अनेक पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक लागलेत. परभणी जिल्ह्यातही ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेले पाहायला मिळालेत.नांदेडमधील अनेक पंपावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. डिझेलचा साठा संपल्यानं वाहनचालक संकटात सापडलेत. मात्र त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं विधान धक्कादायक आहे.

पेट्रोल-डिझेल मिळत नाही, अशा तक्रारी आल्या नाहीत. जर तक्रार आली तर त्यावर योग्य ती करावाई केली जाईल.
मंत्री छगन भुजबळ

पेट्रोल-डिझेल मिळत नाही, अशी तक्रार अजून आली नाहीये, असं भुजबळ म्हणालेत. राज्यातील काही पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा पोहचवण्यास वेळ लागत असेल परंतु मिळतच नाही, अशी तक्रार अद्याप आली नाहीये. जर तक्रार आली तर त्यावर कारवाई करण्यात येईल. तर इंधन पुरवठ्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राज्यात महिनाभर पुरेल इतकाच इंधनसाठा आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांची वाढ करण्यात आल्यानं नागरिकांना महागाईच्या मार सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला, धरणांचा पाणीसाठा झाला कमी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद का झाले? या ठिकाणी कळणार कारणं, फक्त १ गोष्ट करावी लागेल

Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरीत खळबळ, महिलेच्या हाताची पाचही बोटं तुटली

Skipping Benefits: वजन कमी करायचंय? मग रोज सकाळी दोरी उड्या मारा, होईल हा बदल

Belapur : हिरव्यागार डोंगरमाथ्यावर वसलाय भव्य किल्ला, पनवेल गाडी पकडा अन् बेलापूरला उतरा

SCROLL FOR NEXT