Preparations intensify for Maharashtra's Gram Panchayat elections as the final voter list for 15,155 villages is set to be published on August 4. saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Elections: राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार? कधी होणार मतदान?

Gram Panchayat Elections Date Update: राज्यातील १५,१५५ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अंतिम मतदार यादी ४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे

Bharat Jadhav

  • १५,१५५ ग्रामपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक

  • ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी कधी जाहीर होणार

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक मतदान तारीख

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आलीय. बिगर आणि अंशतः अनुसूचित क्षेत्रातील २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या,तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. (Big Update on Village Polls: Maharashtra Prepares for Massive Gram Panchayat Elections)

यानुसार १५ हजार १५५ ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालाय. ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर केव्हाही आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे शक्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. वर्ष २०२४ ते २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने जूनमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केलीय.

त्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. आयोगाच्या या आदेशामुळे हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची औपचारिक तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केलाय.

आयोगाने वेळेत निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्रभागनिहाय मतदार यादीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राह्य धरण्याचे सूचित केलंय. त्याच मतदार यादीचे संगणक प्रणालीद्वारे प्रभागनिहाय विभाजन करत ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.

याआधी ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झालीय.तर काही ठिकाणच्या त्रुटी किंवा अनवधानाने वगळल्या गेलेल्या ग्रामपंचायतींसाठी सुधारित आरक्षण सोडतही घेण्यात आलीय. अतिवृष्टीमुळे काही भागांत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात विलंब झाल्यानं त्या ग्रामपंचायतींसाठी २४ जुलैपर्यंत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिलेत.

दरम्यान प्रभागनिहाय यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर ८ ते १५ दिवसांत निवडणुकांचा बिगुल वाजत असतो. हा आजपर्यंतचा प्रशासनाचा अनुभव आहे; परंतु पावसाचे प्रमाण पाहून या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मतदार यादीचा कार्यक्रम

आता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय.

२४ जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील.

२४ ते २९ जुलै दरम्यान नागरिकांना यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाणार आहे.

४ ऑगस्टमध्ये प्राप्त हरकतींची नियमानुसार छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येतील.

मतदार यादी तयार करताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी स्पष्ट सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीतील विधानसभा मतदार यादीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश करावा. तसेच ग्रामपंचायतीबाहेरील कोणत्याही मतदाराचा समावेश होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेत. या प्रक्रियेदरम्यान विधानसभा मतदार यादीतील नवीन नावे समाविष्ट करणे. नावे वगळणे किंवा नाव व पत्ता यामध्ये बदल करणे शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय.

मात्र प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींमध्ये केवळ तांत्रिक किंवा लेखनिक चुका, चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले मतदार किंवा संबंधित प्रभागातील पात्र मतदाराचे नाव वगळले असल्यास अशाच मर्यादित दुरुस्त्या करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचा लाडकीला आणखी एक धक्का, लाडकींची मोफत साडी योजना बंद

सोनम वांगचुक यांना अखेर काँग्रेसचा पाठिंबा संसदेवरील मोर्चात राहुल गांधी उतरणार?

Maharashtra News Live Update: - भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयास सील.

फडणवीसांच्या नागपुरात ठाकरेंची रामरक्षा, ठाकरेंचं रामरक्षा पठण, सरसंघचालकांनाही निमंत्रण

मुंबईत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश; गुजरातहून आलेला ३३ लाखांचा माल जप्त, चेकनाक्यावर अटकेचा थरार

SCROLL FOR NEXT