Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारची नवी योजना! लग्नासाठी मिळणार २.५० लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Maharashtra Government Vivah Protsahan Yojana: महाराष्ट्र सरकारने विवाह प्रोत्साहन योजना सुरु केली आहे. या योजनेत दिव्यांग नागरिकांना २.५ लाखांपर्यंत मदत मिळणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची नवी योजना

दिव्यांगांना लग्नासाठी मिळणार प्रोत्साहन निधी

दिव्यांग नागरिकांना २.५० लाखांचे अनुदान

महाराष्ट्र सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी एक नवीन योजना राबवली आहे. आता दिव्यांग लोकांना लग्नासाठी प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार दिव्यांग नागरिकांना २.५० लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते.

दिव्यांग व्यक्तीने जर सामान्य व्यक्तीशी लग्न केले तर त्यांना १.५० लाख रुपये दिले जातात. जर दिव्यांग व्यक्तीने दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न केले तर त्यांना २.५० लाख रुपये दिले जातात. ही रक्कम पती पत्नीच्या एकत्रित खात्यात डीबीटीद्वारे जना केली जाते.

या योजनेअंतर्गत पती पत्नीच्या खात्यावर जमा केलेली ५० टक्के रक्कम ही ५ वर्षांसाठी एफडीमध्ये जमा असणे अनिवार्य आहे. जेणेकरुन त्यांना भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही.

दिव्यांग व्यक्तींच्या लग्नाबाबतचे विचार बदलण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग-सामान्य विवाह प्रोत्साबन योजनेत बदल केला आहे. या योजनेतील रक्कम वाढवून देण्यात आली आहे. याबाबतचे निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने जारी केले आहे.

पात्रता आणि अटी काय?

शासन निर्णयानुसार, वधू आणि वर यांच्यांकडे दिव्यांग असण्याचे UDID कार्ड असणे गरजेचे आहे.दिव्यांग वर किंवा वधूपैकी एकजण महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. या दोघांचेही आधी लग्न झालेले नसावे. लग्नाचे रजिस्ट्रेशन असावे. लग्नानंतर एका वर्षात या योजनेसाठी अर्ज करु शकतात. ही कागदपत्रे तुम्ही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जमा करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday: शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, पालघर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Suraj Chavan : गुलाबी गाऊन अन् मोकळे केस; सूरज चव्हाणच्या बायकोचे मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का? VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: भीमाशंकर मार्ग बंद; माळीण परिसरात दरड कोसळली

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

SCROLL FOR NEXT