Government Teachers Recruitment Saam Tv
महाराष्ट्र

Teachers Recruitment: शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली! राज्यात 20 हजारांहून अधिक जागांच्या निघणार जाहिराती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Teachers Recruitment: शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच शिक्षक भरती घेण्यात येणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Government Teachers Recruitment:

शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच शिक्षक भरती घेण्यात येणार आहेत. राज्यभरातील जिल्हापरिषदेचे सुमारे 1 हजार खासगी शिक्षण संस्थांमधील 20 हजारांहून अधिक जागांच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यातच अंतर्गत तब्बल 16, 500 जागांवर मुलखात न घेता नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच उर्वरित जागांवर मुलाखती घेऊन नियुक्त केल्या जातील, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष

दरम्यान, कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वरून 60 वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याबाबत 2015 मध्ये घेण्यात आला होता.   (Latest Marathi News)

या विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यात समावेश आहे.

विद्यापीठांमध्ये अधिक कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती करणे आवश्यक असून भारतीय कृषी अनुसंशोधन परिषदेने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची शिफारस केली आहे. हे पाहता नवीन भरतीमुळे विद्यापीठामंध्ये संशोधन व शिक्षण या क्षेत्रात अनुभवी व कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध, नवरा सासुरवाडीत गेला असता गोळ्या झाडून हत्या

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

SCROLL FOR NEXT