Gondia Charity Commissioner Disha Pajai Suspended News Saam tv
महाराष्ट्र

Gondia : लकी ड्रॉमध्ये कार जिंकणं महागात पडलं, महिला आयुक्तांचं निलंबन; कारण काय?

Gondia Charity Commissioner Disha Pajai Suspended News : गोंदिया येथे परिविक्षाधीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांना लकी ड्रॉमध्ये महिंद्रा XUV700 जिंकणे महागात पडले. नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी राज्यशासनाने त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.

Alisha Khedekar

  • गोंदिया येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त निलंबित

  • लकी ड्रॉमध्ये महिंद्रा XUV700 जिंकणे भोवले

  • नागरी सेवा वर्तणूक नियमांचा भंग केल्याचा आरोप

  • विधी व न्याय विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई

गोंदियामध्ये परिविक्षाधीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती दिशा केशवराव पजई यांना लकी ड्रॉ सोडतीत महिंद्र एक्स यू वी ७०० हे वाहन जिंकणे भोवले आहे. याप्रकरणी आयुक्त दिशा केशवराव पजई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई राज्यशासनाच्या विधी आणि न्याय विभागातर्फे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी ज्वेलर्सद्वारे लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. या लकी ड्रॉमध्ये गोंदिया जिल्ह्यातील परिविक्षाधीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांनी महिंद्र एक्स यू वी ७०० ही चारचाकी जिंकली. पूर्वपरवानगी न घेता लकी ड्रॉ मध्ये चार चाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केला.

याप्रकरणी दिशा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना अनुमती शिवाय गोंदिया मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संबंधित ज्वेलर्सच्या लकी ड्रॉ मध्ये चारचाकी जिंकणं आयुक्त दिशा केशवराव पजई यांना चांगलेच महागात पडले असून त्यांना निलंबित करण्यात येणार आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांनी कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी केल्यास किंवा व्यवसाय केल्यास गैरवर्तणूकीसाठी दोषी समजण्यात येऊन उचित कार्यवाही करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT