Debate intensifies over men’s protection law after Shakti Act approval in Maharashtra. 
महाराष्ट्र

'शक्ती'ला बळ, पण पुरुषांच्या हक्काचं काय? राज्यात पुरूष संरक्षणासाठी कायदा येणार?

Men Protection Law In Maharashtra : महिलांच्या संरक्षणासाठी विधिमंडळात शक्ती कायदा मंजुर करण्यात आलाय. मात्र त्याचंवेळी पुरुषांच्या हक्काचं काय? पुरुषांना खोट्या गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी राज्यात खरचं पुरुष संरक्षण कायदा येणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • महाराष्ट्रात महिलांसाठी शक्ती कायदा मंजूर

  • कायद्याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त

  • पुरुष संरक्षण कायद्याची मागणी जोर धरत आहे

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'शक्ती कायदा सुधारणा विधेयकाला' दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, हे विधेयक मंजूर होत असतानाच, कायद्याचा संभाव्य गैरवापर आणि पुरुषांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा करा, अशी मागणी सरकारपुढे केलीय.

दुसरीकडे कोणत्याही कायद्याचा शस्त्र म्हणून वापर करणे चुकीचे आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरुष संरक्षण कायद्यासाठी सकारात्मक भूमिका घेतलीय. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी घरगुती आणि हुंड्यासाठी छळाच्या 1 लाख 25 हजार गुन्हे दाखल होतात. त्यातील 5 ते 8 टक्के गुन्हे खोटे असल्याचं समोर आलयं. तर बलात्काराच्या 31 हजार गुन्ह्यापैकी 8 ते 10 टक्के गुन्हे खोटे किंवा आरोप सिद्ध होऊ न शकणारे असतात. तर विनयभंगाचे 80 हजार गुन्हे दरवर्षी नोंदवले जात असून 3 ते 5 टक्के गुन्हे खोटे निघतात.

एका प्रकरणात केरळ उच्च न्यायालयानं पुरुषांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस कारवाई करू शकतात, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र पुरुषांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अद्याप ठोस कायदे नाहीत... त्यामुळे महाराष्ट्रात आता पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा होणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह

Dahi Pohe Recipe: उन्हाळ्यात सकाळी नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी 'दही पोहे'

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल; राजीनाम्याची मागणी

Israel-Iran War: आखाती युद्ध वर्षभर चालणार? मोसाद उलथवणार खामेंनेईंची सत्ता?

Ashok Kharat: विकृत खरातवर मंत्री मेहेरबान? अशोक खरातच्या संस्थेला कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT