pandharpur, vitthal rukmini mandir, mp dr subramanian swamy,  saam tv
महाराष्ट्र

Mumbai High Court News : विठ्ठल मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यात देण्यास सरकारचा विराेध, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

Maharashtra Government Opposed Badve Utpat : या याचिकेवरील पुढील सुनावणी 13 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

भारत नागणे

Shri Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिर बडवे उत्पांतांच्या ताब्यात देण्यास सरकारचा विरोध आहे. याबाबत सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)

विठ्ठल मंदिर कायद्याला‌ आव्हान‌ देणारी याचिका माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (mp dr subramanian swamy) यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर राज्य सरकारने न्यायालयात 24 आॅगस्टला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

पंढरपूरचे विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे हित जपण्यासाठी आणि पुजा-यांचा जाचातून भाविकांची सुटका व्हावी यासाठी मंदिर अधिनियम कायदा करण्यात आला आहे, असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र नमूद केले आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिर बडवे उत्पांतांच्या ताब्यात देण्यास सरकारचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील‌ बडवे उत्पांत या सेवाधार्यांचे मंदिरातील सर्व अधिकारी 2014 कालावधीत सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) रद्द करून मंदिर सरकारच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातून‌ पुन्हा बडवे उत्पांतांच्या ताब्यात द्यावे‌ अशी मागणी करणारी याचिका सुब्रमण्यम स्वामी यांच्या मार्फत येथील‌ सेवाधार्यांनी उच्च न्यायालयात केली‌ आहे. त्यांच्या या मागणीला वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळींनी आणि भाविकांनी ही विरोध केला आहे.

दरम्यान या याचिकेवरील पुढील सुनावणी 13 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT