Yavamal washim lok sabha  Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकमुळे मतदान थांबलं; निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांकडून आश्वासन

Yavamal washim lok sabha News : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील हिवरी येथील मतदान केंद्रावर दुपारच्या जेवणासाठी केंद्र बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ : देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. राज्यातील ८ लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे. या लोकसभा मतदारसंघातील हिवरी येथील मतदान केंद्रावर दुपारच्या जेवणासाठी केंद्र बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या कर्माचाऱ्यांचा जेवण करतानाता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी डाॅ.पकंज आशिया यांनी कारवाईचे आश्वसन दिलं आहे.

देशात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मतदार वेळातून वेळ काढून मतदान केंद्रांवर मतदानासाठी येतात. याचदरम्यान यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पंगतीत बसून जेवण केल. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया बंद ठेवता येत नाही, तरी देखील बूथवरील कर्मचाऱ्यांनी सर्व नियम ढाब्यावर ठेवले. या कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया बंद ठेवून जेवण केल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया नेमकं म्हणाले?

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले,'यवतमाळमधील हिवरी येथील मतदान केंद्रावर दुपारच्या जेवणासाठी मतदान थांबवण्याचा प्रकार थांबवला. पाच ते दहा मिनिटांसाठी मतदान थांबलं होतं. तेथील सर्व मतदारांनी मतदान केलं आहे'.

'मतदानाची वेळ आहे. त्या मतदानामध्ये असा कोणताही वेळ दिला जात नाही. या प्रकारातील कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यांवर सखोल चौकाशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

SCROLL FOR NEXT