Praveen Darekar, Afzal Khan’s Scene in Ganesh ustav,  Saam Tv
महाराष्ट्र

Afzal Khan Dekhava Controversy : 'निश्चिंत रहा, अफजल खान वृत्तीचं सरकार गेलंय'

राज्यातील बहुतांश गणेशाेत्सव मंडळांना अफजल खान वध हा देखावा करण्यास परवानगी हवी आहे.

जयेश गावंडे

Afzal Khan’s Scene in Ganesh ustav : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांना मानणणारं सरकार आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारारावर चालणारं हे सरकार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं शिवप्रताप देखाव्याला परवानगी देण्यास हरकत नाही. आम्ही देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना त्याबाबतचं निवेदन दिलं आहे. राज्य सरकार निश्चित उचित निर्णय घेईल असं भाजप नेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी अकाेला येथे नमूद केले.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गणेशाेत्सव काळात अफजल खान वध हा देखावा सादर करण्यासाठी पाेलिस परवानगी नाकारत आहेत. यामध्ये सामाजिक तेढ निर्माण हाेऊ शकताे असं कारण दिलं जात आहे. त्यामुळे राज्यातील हिंदुत्वावादी संघटनांसह गणेशाेत्सव मंडळांत तीव्र नाराजी पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, शिवरायांचे शाैर्य पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा सवाल विविध मंडळांचे कार्यकर्ते विचारु लागले आहेत. (Afzal Khan dekhava controversy)

या देखाव्याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान याचा काेथळा काढला या देखाव्यास सरकारनं परवानगी नाकारण्याचे काहीच कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शाैर्य लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत पाेहचणार असल्यानं या देखाव्यास सरकार निश्चित परवानगी देईल असा विश्वास देखील दरेकरांनी व्यक्त केला.

दरम्यान प्रवीण दरेकर सामनामध्ये आलेल्या अग्रलेखावर टिप्पणी केली. ते म्हणाले मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून मुंबईकरांच्या हाती काय दिलं याच पहिलं उत्तर द्या. शिंदे साहेब हे शिवसैनिक होते आणि आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईबद्दल ज्या संकल्पना होत्या. त्याच शिंदे यांच्याही आहेत. उध्दव ठाकरे हे वैफल्यने ग्रासले आहेत असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT