Maratha activist Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग

Kunbi reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या असून बोगस कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत OBC उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maratha Reservation News : राज्यात पुन्हा कुणबी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर OBC उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बोगस कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार पुढील भूमिका काय घेणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यात कुणबी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार

राज्यात मराठा आणि कुणबी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा कमालीचा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकारची हालचाल वेगाने वाढली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ओबीसी (OBC) उपसमितीची तातडीची बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

बोगस प्रमाणपत्रांबाबत चर्चा

मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर आणि नोंदींमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत तसेच बोगस प्रमाणपत्रांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत, राज्यात वाटप करण्यात आलेली बोगस कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत अतिशय महत्त्वाची चर्चा होणार आहे.

मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, त्यामध्ये झालेली खाडाखोड किंवा चुकीच्या व बोगस नोंदींच्या आधारे मिळालेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जाऊ नयेत, अशी मागणी ओबीसी आंदोलकांकडून सातत्याने केली जात होती. त्यामुळे या उपसमितीच्या बैठकीत बोगस प्रमाणपत्रे रोखण्यासाठी तसेच ती रद्द करण्यासाठी सरकार काय ठोस पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये केवळ बोगस प्रमाणपत्रांवरच चर्चा होणार नाही, तर ओबीसी समाजासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल, या संदर्भातही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार बॅकफूटवर आले असून, आता या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय अंतिम भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT