Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra govt formation, Key points : भाजपचा मुख्यमंत्री कोण? नाव गुलदस्त्यातच, एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष, आतापर्यंत काय काय घडलं?

Maharashtra government formation, Key points : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भुतो न भविष्य असं यश मिळाले. महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे सध्या देशात चर्चेत आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra govt formation News Update: महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्या. पण आठ दिवसानंतरही महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल, याचा सपेन्स कायम आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनात शिंदे अचानक आपल्या मूळ गावी दरे येथे पोहचले. मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री साताऱ्यातील दरे गावात आहेत. त्यांना ताप आल्याचं समोर आलेय. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही समजलेय.

शिंदेंच्या फॅमिली डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता स्थिर आहे. दोन दिवसांपासून त्यांना ताप आणि कणकणी भरली होती. तीन ते चार डॉक्टरांच्या पथकाने एखनाथ शिंदे यांच्यावर उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते आज ठाण्याला परतणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची फोनवरून विचारपूस केली. आता एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतल्यानंतर सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? की एकनाथ शिंदे वेगळा काही निर्णय घेणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या. भाजप महायुतीला मोठं यश मिलाल्यानंतर शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे अधिक चर्चेत आले. शिनसेनेला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार, यासारख्या चर्चा सुरू झाल्या. शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्रि‍पदाची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिंदेंची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली. विविध नावे चर्चेत आली. एकनाथ शिंदे यांचे नावही मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत होते. पण विधानसभेच्या निकालानंतर काही दिवसांच्या सस्पेन्स झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला निर्णय जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो मान्य असेल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. एकनाथ शिंदेंच्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जातेय. पण अद्याप देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा बॉस कोण होणार? याची चर्चा सुरू झाली.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? Maharashtra government formation | Key points

शपथविधीची तारीख ठरली, पण मुख्यमंत्री कोण? Maharashtra oath-taking ceremony

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात कोण कोण? याची नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. एकनाथ शिंदे दरे गावात गेलेले आहेत. पण भाजपने शपथविधीची तारीख जाहीर करून टाकली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ट्वीट करत शपथविधी संदर्भात माहिती दिली. महायुतीच्या शपथविधीला नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीची तारीख ठरली, पण मुख्यमंत्री कोण? हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? 'Shinde to take big decision'

शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. काळजीवाहू मुख्यमंत्री रविवारपर्यंत मोठा निर्णय घेतली, असे शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रि‍पदाबाबत बोलताना शिरसाट यांनी सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.

एकनाथ शिंदे जेव्हा विचार करण्याची गरज भासते, तेव्हा ते मूळ गावी दरे येथे जातात. रविवारी संध्याकाळपर्यंत शिंदे मोठा निर्णय घेतली. तो निर्णय राजकीय असू शकतो, असे शिरसाट यांनी सांगितले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय.

पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच Next CM to be from BJP, says Ajit Pawar -

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल. उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचा असेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली.

विधानसभेत महायुीतला मोठं यश Maharashtra election results-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. २८८ जागांपैकी भाजपने १३२, राष्ट्रवादीने ४१ आणि शिवसेनेने ५७ जागांवर यश मिळवले. पाच अपक्षांचा महायुतीला पाठिंबा आहे. दुसरीकडे विरोधकांना ५० पर्यंतही जाता आले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले, तर २३ नोव्हेंबर रोजी नवं सरकार कोणतं? हे स्पष्ट झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT