Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: मोठी बातमी! ZP निवडणुकीआधी शेतकर्‍यांना ₹२००० तर लाडक्या बहि‍णींना ₹१५०० मिळणार, अपडेट आली समोर

Namo Shetkari and Ladki Bahin Yojana Installment Before ZP Election: शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता झेडपी निवडणुकीआधी जमा केला जाऊ शकतो.

Siddhi Hande

जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना खुशखबर

शेतकऱ्यांना २००० तर लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार

नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार

राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पुढच्या महिन्यात ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, त्याआधीच सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. झेडपी निवडणुकीआधी शेतकरी आणि लाडक्या बहि‍णींसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना २००० रुपये तर लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळू शकतात.

जिल्हा परिषद निवडणुकीआधी आनंदाची बातमी (Good News Before ZP Election)

फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच नमो शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढच्या महिन्यात शेतकरी आणि लाडक्या बहिणी दोघांनाही खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नमो शेतकरीचे ₹२००० खात्यात जमा होणार (Namo Shetkari Yojana installment come before zp election)

राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता शेतकऱ्यांना पुढचा हप्ता देण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा हप्ता दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी कृषी विभागाने अर्थ मंत्रालयाकडे निधी मागीतल्याचेही माहिती समोर आली आहे.

लाडकीला जानेवारीचा हप्ता मिळणार (Ladki Bahin Yojana January Installment Date)

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनादेखील फेब्रुवारी महिन्यात पुढचा हप्ता दिला जाऊ शकतो. जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळीदेखील महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा केला होता. त्यानंतर पुढचा हप्ता फेब्रुवारीत जमा करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

Silver Rate: बापरे! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा! आज १ किलो चांदीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

Maharashtra Live News Update: कल्याण–डोंबिवलीतील 53 नगरसेवक कोकण भवनच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT