महाराष्ट्रात नवीन अपर तहसीलदार कार्यालयांची संपूर्ण यादी
फडणवीस सरकारचा नवीन महसूल कार्यालयांबाबत मोठा निर्णय
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत नवीन अपर तहसीलदार कार्यालये
राज्यातील ग्रामीण प्रशासन अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नागपूर आणि नाशिक विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नवीन अपर तहसीलदार कार्यालयांमुळे स्थानिक पातळीवर प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. महसूल विभागाकडून शासन निर्णयही जारी करण्यात आलाय.
चिंचोली खापरखेडा, घोट, सिन्नर, शिरपूर शहर, शहादा, जळगाव शहर, चाळीसगाव आणि पहूर या ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे नवीन कार्यालयांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. .
ग्रामीण भागातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये, तसेच स्थानिक पातळीवर प्रशासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या निर्णयामागील उद्देश आहे. नवीन कार्यालयांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान होण्यास मदत होईल.
नवीन कार्यालयांच्या निर्मितीसाठी संबंधित भागातील लोकसंख्या, क्षेत्रफळ, तालुक्यांची संख्या, आदिवासी व दुर्गम भागातील लोकसंख्या, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर यासह सर्वाधिक दूरच्या गावांपासूनचे अंतर यासह विविध निकषांचा विचार करण्यात आलाय. प्रस्तावित कार्यालये सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या प्रवासाचे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.