Chandrabhaga River Flood  Saam tv
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, २२१५ कोटींची मदत जाहीर, फडणवीस सरकारचा निर्णय

2215 crore relief package for farmers in Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त ३० जिल्ह्यातील ३१.६४ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत जाहीर. हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, नाशिक यांचा समावेश.

Ganesh Kavade

Fadnavis cabinet decisions on farmer compensation : राज्यातील शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. पहिल्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते.

शेत पीक नुकसानीसाठी मदत म्हणून राज्यातील ३१.६४ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर कऱण्यात आला आहे. खरीप २०२५ मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार, मदत जाहीर कऱण्यात आली आहे. हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर अन् नाशिकचा समावेश आहे.

हिंगोली

आॅगस्ट महिन्यात बाधित झालेली शेतकऱ्यांना मदत

३.०४ लाख बाधित शेतकऱ्यांची संख्या

बाधित क्षेत्र - हेक्टर २.७१ लाख

हिंगोलीमध्येच बाधित झालेल्या शेतकऱ्यांना २३१.१८ कोटी रुपयांची मदत

बीड

आॅगस्ट महिन्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत

बाधित शेतकऱ्यांची संख्या - १.१४ लाख

५६.७४ कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी मंजूर

धाराशिव

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात

झालेल्या नुकसानीचा मदत जाहीर

धाराशिव जिल्ह्यात बाधित झालेल्या

शेतकऱ्यांची संख्या २.३४ लाख

याबाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

१८९.६१ कोटी रुपयांची मदत

लातूर

आॅगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना मदत जाहीर

बाधित शेतकऱ्यांची संख्या - ३.८० लाख

मदत जाहीर - २.३५ कोटी रुपये

नाशिक

नाशिकात ऑगस्ट महिन्यात झालेल्या

बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार १०८

या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

३.८२ कोटी रुपयांची मदत मंजूर

धुळे

धुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात

बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ७२

या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

२ लाख रुपयांची मदत

नंदुरबार

नंदूरबार जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात

बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या २५

याबाबीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी

१ लाख रुपयांची मदत

जळगाव

जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित

झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजार ३३२

या जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी

९.८६ कोटी रुपयांची मदत

अहिल्यानगर

अहिल्यानगरमध्ये ऑगस्ट महिन्यात बाधित

झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १४०

या शेतकऱ्यांसाठी सरकारच्यावतीने फक्त

६ लाख रुपयांची मदत जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Hidden Gems: जोडीदारासोबत दादरमध्ये फिरताय? मग हे Hidden स्पॉट्स करा नक्की Explore

Ahilyangar Flood : लेकासाठी बाप निसर्गाशी लढला; पुरातूनही वाट काढत दवाखाना गाठला

शेतकऱ्यांनी अडवला मंत्री गिरीश महाजनांचा ताफा | VIDEO

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत धनप्राप्तीसाठी करा हे ७ सोपे उपाय, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: अजित पवार यांनी राजीनामा द्यावा; कोणी अन् का केली मागणी? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT