Long queues at petrol pumps in Maharashtra as fuel shortage sparks panic among citizens AI
महाराष्ट्र

अमरावती-नागपूर महामार्गावरील सर्व पेट्रोल पंप बंद, शिर्डीतही अवस्था गंभीर, कुठं नेमकी काय स्थिती?

Fuel Shortage In Maharashtra Due To Gulf Tensions: आखाती तणावामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्याने महाराष्ट्रात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. शिर्डी आणि अमरावतीत पेट्रोल पंप बंद असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Omkar Sonawane

आखाती देशातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच कच्चा तेलाचा पुरवठा कमी होत असल्याने पेट्रोल आणि डिझेल देखील बंद होणार अशी भीती देखील लोकांना बसल्याने राज्यात पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे, इंधन मिळणार नाही या भीतीने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

शिर्डीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. इंधन मिळणार नाही या भीतीने वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे काही ठिकाणी पंपचालकांनी भरणा थांबवला आहे. अनेक पंपांवर इंधन पूर्णतः संपल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच शिर्डीत सुरू असलेल्या रामनवमी उत्सवामुळे भाविकांची मोठी गर्दी असून, परतीच्या प्रवासाची चिंता अधिक वाढली आहे. काही वाहनधारकांनी तर गाड्यांमध्ये इंधन संपल्याने पंपासमोरच वाहने उभी केली आहेत.

दरम्यान अमरावतीतही परिस्थिती गंभीर बनली आहे. अमरावती-नागपूर महामार्गावरील तसेच शहरातील अनेक पेट्रोल पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. पंपाबाहेर ‘पेट्रोल बंद’चे फलक लावण्यात आले असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अत्यावश्यक सेवांनाही याचा फटका बसत असून, ॲम्बुलन्स सेवाही अडचणीत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT