दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये अग्रीम मदत मिळणार
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या यांनी शेतकऱ्यांना ५००० रुपये कधी मिळणार याची तारीख सांगितली
४ नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार
राज्यात यंदा म्हणावा तसा पाऊस पडला नाही. कमी पाऊस पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशामध्ये सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५००० रुपये अग्रीम रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. पण हे ५००० रुपये खात्यात कधी जमा होणार याची शेतकरी वाट पाहत आहेत. याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची अपडेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची तारीखच सांगून टाकली.
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले की, '४ नोव्हेंबरपूर्वी मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल. ५००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील. राज्यातील दुष्काळी तालुक्यातील जवळपास ९२ लाख शेतकऱ्यांच्या अॅग्रीस्टॅक क्रमांकावरून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ५००० रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. यासाठी वेळखाऊ आणि किचकट ई-केवायसी करावी लागणार नाही. यामुळे मदत मिळवण्यासाठी विलंब होणार नाही. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दुष्काळी भागांचे पंचनामे करताना प्रत्येक शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक क्रमांक आणि बँक खात्याची माहिती घेण्यात आली होती.'
शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत कधी मिळणार? याबाबत देखील कृषिमंत्र्यांनी महत्वाची अपडेट दिली. त्यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला ५००० रुपये दिले जातील. त्यानंतर केंद्र सरकारच्या आपत्ती निवारणातून निधी प्राप्त झाल्यानंतर बाकीची नुकसान भरपाई वितरीत केली जाईल. सध्या सरकारने प्रत्येक विभागाच्या निधीला २० टक्क्यांची कात्री लावली आहे. हा निधी दुष्काळग्रस्तांना मदत आणि दुष्काळ निवारणासाठी वापरला जाणार आहे.'
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीला २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर सरकारने आणखी दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली. राज्यात सध्या ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकार दिवाळीपूर्वी आग्रमी रक्कम म्हणून ५००० रुपये मदत निधी देणार आहे. या दुष्काळग्रस्त भागांचे सध्या पंचनामे सुरू आहेत. या भागातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.