MAHARASHTRA FARM LOAN WAIVER: ₹2 LAKH DEBT RELIEF FOR 56 LAKH FARMERS LIKELY WITHIN 10 DAYS Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Farmer Loan Update News : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! शेतकऱ्यांची कर्जमाफीची अंमलबजावणी पुढील १० दिवसांत होणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केली. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Alisha Khedekar

  • राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता

  • २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अंमलबजावणी पुढील १० दिवसांत होणार

  • योजनेवर सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

  • कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी चौंडी येथे ही महत्त्वाची घोषणा केली

MAHARASHTRA FARM LOAN WAIVER: ₹2 LAKH DEBT RELIEF FOR 56 LAKH FARMERS LIKELY WITHIN 10 DAYS राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफी योजना आता अंतिम टप्प्यात आली असून, येत्या दहा दिवसांत तिची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार अशा सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि साखर उद्योगासमोरील अडचणींमुळे ऊस उत्पादकांना एफआरपीची एकरकमी रक्कम मिळण्यातही अडथळे निर्माण झाले आहेत.

या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत असून आत्महत्यांच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती सोहळा अहिल्यानगरच्या चौंडी गावामध्ये आज पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना मंत्री दत्ता भरणे (Minister Datta Bharne ) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या नावाने ही कर्जमाफी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच तरुण आणि मेंढपाळ समाजासाठीही भविष्यात विविध कल्याणकारी योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT