Maharashtra drought like situation latest update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळा! पावसाअभावी हातची पिकं जाणार; बळीराजाची स्थिती बिकट

Maharashtra Rain Crisis: आता बातमी राज्यावरील दुष्काळाच्या संकटाची, राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय. खरिपाचा हंगाम वाया गेल्यानं शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय. मराठवाडा आणि विदर्भात पिकं जळायला लागलीयत. यावर प्रशासनाने काय मोठा निर्णय घेतलाय? पाहूया एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

  • महाराष्ट्रात पावसाची तूट वाढल्याने अनेक भागांतील खरीप पिकांवर ताण

  • मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक पावसाची तूट

  • पावसाची स्थिती, जलसाठे आणि पिकांची अवस्था यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

बीडमधील बळीराजाचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. वरुणराजा रुसल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नाही. सोयाबीन, कपाशीचे पीक करपलंय. हे विदारक दृश्य पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 50 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने पाठ फिरविल्याने स्थिती गंभीर झालीये. सांगोला तालुक्यात बंडगर वाडी येथील शेतकऱ्याने 2 एकरवरील खरबूजाचं पिक उखडून टाकलंय.

अशीच परिस्थिती तालुक्यात अनेक ठिकाणी आहे. सध्या विविध गावात आठ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातही वीस दिवस पावसाने खंड दिल्याने शेंगा लागलेले सोयाबीन अक्षरशः करपू लागले आहे, अडीच महिन्यापासून सोयाबीनची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतलेल्या शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय. सेनगाव, औंढा, कळमनुरी, वसमत, हिंगोली या पाचही तालुक्यामध्ये सारखीच परिस्थिती आहे. लातूर जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झालीय. अनेक भागांत पिके सुकू लागलीयत. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही देखील गंभीर होण्याची शक्यता निर्माण झालीय.

मराठवाड्यात दुष्काळाचं संकट

मराठवाड्यात पावसाची सरासरी 30% तूट

परभणी (43%), लातूरमध्ये (46%) सर्वाधिक पावसाची तूट

जायकवाडी वगळता अनेक प्रकल्प कोरडे

पावसाळ्यातही 88 टँकरनं पाणीपुरवठा सुरू, 450 गावांत विहिरींचं अधिग्रहण

सप्टेंबरनंतरच्या स्थितीनुसार रब्बी हंगामासाठी नियोजन

नागपूर विभागाची स्थिती

धरणातील सरासरी जलसाठा : 65.80%

गतवर्षीचा जलसाठा : 79.34%

तूट : 13.54 टक्के

अमरावती विभागाची स्थिती

सरासरी जलसाठा : 63.37%

गतवर्षीचा जलसाठा : 81.91%

तूट : 18.54 टक्के

अल नीनोमुळे पाऊस कमी पडले असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होताच. ऑगस्ट, सप्टेंबरमध्येच पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी हताश झालाय. आता दुष्काळाचं संकट गडद झाल्यामुळे सरकार आता काय उपाययोजना करतं याकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT