Sharad Pawar vs Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Pawar vs Pawar: पवार कधीच एक होणार नाहीत? वैयक्तिक नव्हे वैचारिक मतभेद: शरद पवार

Pawar vs Pawar: पवार कुटुंबीय कधीच एक होणार नाहीत अशी चिन्ह निर्माण झालीय. कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कधीही कमी होणार नाही हे आम्ही नव्हे तर दस्तुरखुद्द अजित पवारांनीच सांगितलंय. तर पवारांनी साम टीव्हीच्या EXCLUSIVE मुलाखतीत पुन्हा नवी गुगली टाकलीय. त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

Tanmay Tillu

पवार घराण्यातील द्वंद्वामुळे लोकसभेप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण प्रचंड तापलंय. त्यातच राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असं मला वाटत नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय.

हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. याबाबत एका वृत्तपत्राला अजित पवारांनी मुलाखत दिली. काय म्हणालेत अजित पवार पाहूया.

काय म्हणाले अजित पवार?

राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असं वाटत नाही

माझा भाऊही माझ्यावर फार नाराज, तो फारच टोकाचं बोलायला लागलाय. त्याचा स्वभाव असा का झाला, कळायला मार्ग नाही.

घरातला सख्खा पुतण्या उभा, राजकीय भवितव्य पणाला लावलं असं वाटत नाही.

ही लढाई मतदारांच्या हाती, लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला दादा त्या पद्धतीने ते करतील

महाराष्ट्राच्या राजकारणात अभेद्य कूटुंब म्हणून ओळखलं जाणाऱ्या पवार कुटुंब का फुटलं ? कुणी फोडलं हा प्रश्न कायम आहे. मात्र याचवेळी शरद पवारांनी साम टीव्हीला दिलेल्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट exclusive मुलाखतीत अजित पवारांबाबत मोठं विधान करुन पुन्हा गुगली टाकलीये. शरद पवार काय म्हणालेत पाहूया.

लोकसभेनंतर आता पुन्हा विधानसभेच्या मैदानात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे...त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. लोकसभेला ताई अन् विधानसभेला दादा असं सुत्र कायम राहणार की यंदा बारामतीकर युगेंद्र पवारांच्या रुपानं शरद पवारांच्या पाठीशी उभे राहणार हेच पाहायचं.

यंदाची ही निवडणूक राजकीय गणितं कायमची बदलणारी ठरणार असं बोललं जातंय. त्यातून कधीकाळी एकसंध असलेल्या पवार घराण्यात वाढलेली कटूता खरंच कमी होणार की ही दरी कायमची वाढणार हेच पाहायंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT