Mahayuti vs MVA, Maharashtra Election Results 2024 Live Mahayuti vs MVA, Maharashtra Election Results 2024 Live
महाराष्ट्र

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

Mahayuti vs MVA, Maharashtra Election Results 2024 Live : महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. मविआला ५० आमदारांची संख्याही ओलांडता आली नाही.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election results : महायुतीने विधानसभा निवडणुकीत मविआचा सुपडा साफ केला. २८८ पैकी महायुतीने तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत कोणत्याही युती अथवा आघाडीला इतकं स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला न भूतो न भविष्य असं यश दिले. भाजप १३२, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४१ उमेदवार विधानसभेवर गेले आहेत. महायुतीच्या जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षि शाहू आघाडी १ आणि रासपाला एका जागेवर विजय मिळलाय.

लोकसभेला जोमात असलेल्या मविआ विधानसभेला मात्र चारी मुंड्या चीत झाली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षाला मिळून ५० संख्याही गाठता आली नाही. महायुतीमध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक २० जागांवर विजय मिळाला आहे. तर काँगरेस १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागांवरच विजय मिळाला. १२३ जागा लढणाऱ्या मनसेच्या पदरी निराशा पडली, एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता आला नाही. महायुतीचा न भूतो न भविष्य असा विजय झाला आहे. दणदणीत विजया मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले, त्यानंतर राज्याचा गतिमान विकास करणारे सरकार देऊ, अशी ग्वाही तिन्ही नेत्यांनी दिली.

स्ट्राईक रेटमध्ये भाजप सुसाट -

१०१४ च्या मोदी लाटेत स्वबळावर लढताना भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. तर २०१९ मध्ये एकसंध शिवसेनेसोबत युतीत लढताना भाजपला १०५ जागांवर विजय मिळाला होता. २०२४ विधानसभेला भाजपने मित्रपक्षासोबत १५२ जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपने मित्रपक्षासह १३७ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्के इथका राहिलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ८७ जागा लढवल्या होत्या, त्यात त्यांना ५७ जागावर विजय मिळला, त्यांचा स्ट्राईक रेट ६६ इतका राहिला. अजित पवार यांनाही भरघोस यश मिळाले.

मंत्र्‍यांचा दणदणीत विजय -

महायुतीच्या सर्व नेत्यांचा दणदणीत विजय झाला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजान, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, दीपकर केसरकर, शंभूराज देसाई यांना मोठं मताधिक्य मिळालं.

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबरी धक्के बसले आहे. मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना कराा लागला. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, वैभव नाईक यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागलाय. महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआ चारी मुंड्या चीत झाली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा करिष्मा फेल ठरल्याचं निकालावरुन दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT