sanjay raut twitter
महाराष्ट्र

Maharashtra Election Result: पराभव दिसताच संजय राऊतांनी फोडलं EVM वर खापर.. भन्नाट मिम्स तुफान व्हायरल

Sanjay Raut Viral Memes: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मिम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Ankush Dhavre

Sanjay Raut Memes, Maharahtra Election Result: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचा दबदबा पाहायला मिळाला आहे. सुरुवातीचे काही कल हाती आल्यानंतर, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार अशी चिन्ह आहेत.

महाविकास आघाडीचा पराभव समोर दिसत असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप केले आहेत. सध्या संजय राऊत सोशल मीडियावर ट्रेंडिगला आहेत.

भन्नाट मिम्स व्हायरल

मतमोजणीच्या दिवशी संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी संताप व्यक्त करत लिहिले की, ' बॅलेट पेपरने पुन्हा एकदा निवडणुका व्हायला हव्या...महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही!

असा निकाल लागूच शकत नाही..' यापूर्वी माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांनी महायुतीवर जोरदार आरोप केले होते. ते म्हणाले होते की, निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी म्हटले होते की, त्यांच्या गटाचा एकही आमदार पराभूत होणार नाही. हे त्यांनी कशाच्या भरवशावर म्हटलं होतं?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात मतमोजणी सुरु असताना, संजय राऊत सध्या ट्रेन्ड करत आहेत. त्यांचे मिम्स तुफान व्हायरल होत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले की, ' राऊत सध्या निराश आहेत..' तर आणखी एका युझरने कमेंट करत लिहिले की, 'राहुल गांधींसोबत राहण्याचा परिणाम..'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT