Inspirational Story of Voting For Washim Election 2024: Young Man Came All Along From Singapur To Vote in Washim Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024 Voting: एका मताचा थक्क करणारा प्रवास; सिंगापूरहून तरूण थेट महाराष्ट्रातील वाशिमला आला

Washim News | Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting: राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. केवळ एका मतासाठी एक तरूण सिंगापूरहून वाशिमध्ये मतदान करण्यासाठी आला आहे.

Rohini Gudaghe

मनोज जयस्वाल साम टीव्ही, वाशिम

आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की, एका मतदानाचं (Voting) महत्त्व किती? याची प्रचिती वाशिममध्ये आली आहे. राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Maharashtra Election) पार पडत आहे. केवळ एका मतासाठी एक तरूण सिंगापूरहून वाशिमध्ये मतदान करण्यासाठी आला आहे. खरं तर या तरूणाचा एका मतासाठी प्रवास थक्क करणारा आहे. केवळ मतदान करण्यासाठी हा तरूण हजारो किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील वाशिमला आला आहे.

एका मतदानाचे महत्त्व किती आहे. याची प्रचिती वाशिम आलेल्या एका मतदारानी मतदान करून व्यक्त केली आहे. वाशिम येथील रहिवासी असलेला सिंगापूरला हा तरूण नोकरीनिमित्त मागील आठ वर्षापासून राहतो. केवळ आज मतदानासाठी (Lok Sabha 2024) तो वाशिमला आला होता. यावरून एका मताची किंमत किती जास्त आहे, याची सर्वांनाच कल्पना येत आहे.

वाशिमचा एक रहिवासी सिंगापूरला मागील नऊ वर्षांपासून राहात आहे. तो आज मतदानासाठी वाशिममध्ये आला आहे. त्यानी वाशिममध्ये येऊन मतदान केलं आहे. तो सिंगापूरला नोकरीच्या निमित्ताने राहतो. ते केवळ (Washim News) एका मतासाठी वाशिमला आला आहे. हा तरूण मास्टर्स करण्यासाठी सिंगापूरला गेला होता. त्यानंतर तो नोकरीच्या निमित्ताने तिथेच राहत आहे.

साम टीव्हीशी संवाद साधताना हा तरूण म्हणाला की, मतदान हे देशासाठी खूप महत्वाचे आहे. मला माझ्या देशासाठी खूप अभिमान आहे. मी सगळ्यांना सांगेन की मतदान करा. ज्याला कुणाला मत द्यायचं त्याला द्या, पण मतदान (Maharashtra Politics) करा. पुढील ५ वर्षे काय होणार भारतासाठी हे तुम्ही ठरवणार आहात. तुम्ही कुठेही असेल तर आपलं मत नक्की द्या. ज्याला कुणाला द्यायचं त्याला द्या. मी भारतात फक्त एक मत देण्यासाठी आलो (Lok Sabha Election) आहे.

मतदान करणं खूप गरजेचं आहे. मी ज्या कुणाला मत देणार आहे. त्याने पुढे जाऊन वाशिमचं भलं केलं पाहिजे. भारतासाठी काही केलं पाहिजे, मी यासाठी आलो आहे असं या तरूणानी सांगितलं आहे. एका मतदानाचा अभिमान किती मोठा आहे, हे या तरूणाने सिंगापूरवरून मतदानाला येऊन (Washim From Singapore For Voting) स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT